Call Forwarding : सरकारनं कॉल फॉरवर्डिंग सेवा (call forwarding service) बंद करण्याच्या सूचना दूरसंचार कंपन्यांना (Telecom companies) दिल्या आहेत. येत्या 15 एप्रिलपासून ही सेवा बंद होणार आहे. सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांवर आळा घालण्यासाठी सरकारनं यासंदर्भात सूचना केल्या आहेत. ही सुचना USSD वर आधारीत कॉल फॉरवर्डिंगसाठी आहे. 


15 एप्रिलपासून कॉल फॉरवर्डिंग सेवा बंद होणार


15 एप्रिलपासून कॉल फॉरवर्डिंग सेवा बंद होणार आहे. मात्र, ही सेवा बंद करताना यासाठी पर्यायी सेवा उपलब्ध करुण देण्याच्या सूचना देखील सरकारमं दूरसंचार कंपन्याना दिल्या आहेत. दूरसंचार कंपन्यांकडून USSD आधारित अनेक सेवा प्रदान केल्या जातात. यामध्ये IMEI सुविधेपासून ते बॅलन्स चेक करण्यापर्यंतच्या सुविधांचा समावेश आहे. यातीलच एक सेवा म्हणजे कॉल फॉरवर्डिंगची सुविधा. मात्र, ही सुविधा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


पर्यायी व्यवस्था उपलब्ध करुन देण्याच्या दूरसंचार कंपन्यांना सूचना


फोनच्या संदर्भातत सायबर फसवणूक आणि सायबर गुन्हे होण्याची सरकारला भीती आहे, त्यामुळं सरकारनं USSD आधारीत कॉल फॉरवर्डिंगची सेवा बंद करण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान, जरी सरकारनं दुरसंचार कंपन्यांना कॉल फॉरवर्डिंगची सेवा बंद करण्यास सांगितले असले तरी देखील पर्यायी व्यवस्था उपलब्ध करुन देण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. ग्राहकांच्या संमतीशिवाय कोणत्यही प्रकारे कॉल फॉरवर्डिंगची सेवा सक्रिय करतायेणार नाही असं दुरसंचार कंपन्यांना सांगण्यात आलं आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Call Forwarding Scam : चुकूनही *401# डायल करू नका; आयुष्यभराची कमाई पाण्यात गेलीच म्हणून समजा!