Imran Khan to Stay in Karan Johar Flat : आमिर खानचा (Amir Khan) पुतण्या आणि अभिनेता इम्रान खान (Imran Khan) त्याची गर्लफ्रेंड लेखा वॉशिंग्टनसोबत वांद्रे (Bandra) येथे शिफ्ट होत आहे. त्याने करण जोहरचा (Karan Johar) फ्लॅट भाड्याने घेतला आहे. त्याच्या या इमारचीच्या आसपास अनेक सेलिब्रेटी राहतात. तसेच इम्रान खानचा मामा म्हणजेच आमिर खानही त्याच्या जवळच राहतो. पण या घराच्या भाड्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या घराचं महिन्याचं भाड एकूनच तुम्ही थक्क व्हाल. 


लेखा वॉशिंग्टनसोबत भाड्याने घर घेण्यापूर्वी इम्रान खान बांद्रा येथील पाली हिल येथील त्यांच्या बंगल्यात राहत होता. वांद्रे अपार्टमेंट समुद्राच्या समोर एका मोठ्या इमारतीच्या शेजारी आहे. येथे त्याचा मामा, बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान याने देखील यापूर्वी एक अपार्टमेंट भाड्याने घेतले होते. 'मनीकंट्रोल डॉट कॉम'च्या वृत्तात म्हटले आहे की, इम्रान आणि लेखा आता प्रसिद्ध कार्टर रोडवरील क्लिफपेट येथील तीन मजली अपार्टमेंटमध्ये राहणार आहेत. याचं महिन्याचं घरभाडं हे जवळपास 9 लाख रुपये इतकं आहे. 






वांद्र्यात राहतात अनेक सेलिब्रिटी


रिअल इस्टेट डेटाबेस प्लॅटफॉर्म Zapkey वरून मिळालेल्या अहवालानुसार, अभिनेता शाहरुख खान, सलमान खान, जॉन अब्राहम आणि माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांसारख्या सेलिब्रिटींसह वांद्रे हे सेलिब्रिटींचे आवडते ठिकाण आहे. लेखा वॉशिंग्टन यांचे पहिले लग्न पत्रकार पाब्लो चॅटर्जी यांच्याशी झाले होते, जो प्रसिद्ध थिएटर कलाकार धृतिमान चॅटर्जी यांचा मुलगा आहे.इम्रान खानने नुकतेच लेखा वॉशिंग्टनसोबतच्या नात्याला दुजोरा दिला आहे. यापूर्वी त्याने 2019 मध्ये पहिली पत्नी अवंतिका मलिक हिला घटस्फोट दिला होता. त्यानंतर आता इम्रान आणि वॉश्गिंटन हे दोघेही करण जौहरच्या फ्लॅटमध्ये राहणार आहेत. 






ही बातमी वाचा : 


Orry Viral Video : 'भर कार्यक्रमात त्यानं साधं हात मिळवायला दिला नकार', कंटेट क्रिएटरचा आरोप; 'मानहानीची तक्रार करेन', ओरीची धमकी