Daniel Balaji Death :  दाक्षिणात्य सिनेसृष्टीतला (South Industry) सुप्रसिद्ध कलाकार डॅनियल बालाजीचे (Daniel Balaji) वयाच्या 48 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटकाने निधन झाले आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत शोककळा सध्या पसरली आहे. नुकतेच दक्षिणेतील लोकप्रिय कॉमेडियन लक्ष्मीनारायण शेषू यांचेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.चित्रपटसृष्टी अजून या धक्क्यातून सावरली नव्हती की आता डॅनियल बालाजीच्या आकस्मिक निधनाने मोठा धक्का बसला आहे. 


डॅनियल बालाजीच्या छातीत दुखत होते. त्यानंतर त्याला 29 मार्च रोजी चेन्नई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार देखील सुरु होते. पण सर्व प्रयत्न करण्यात आले पण डॅनियलचं निधन झालं. शुक्रवार 29 मार्च रोजी त्याने अखेरचा श्वास घेतला. डॅनियल बालाजीच्या आकस्मिक निधनाने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. डॅनियल बालाजीच्या पार्थिवावर 29 मार्च रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान दाक्षिणात्य सिनेसृष्टीतूनही डॅनियलच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. 


श्रीधर पिल्लई यांनी ट्वीट करत दिली माहिती


चित्रपट विश्लेषक श्रीधर पिल्लई यांनी ट्वीट करत डॅनियलच्या निधनाची बातमी दिली. त्यांनी लिहिले, '48 वर्षीय डॅनियल बालाजी, जो एक चांगला अभिनेता होता, रात्री उशिरा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.वेट्टय्याडू विलायाडू आणि पोल्लाधवन मधील त्याचा आवाज आणि अभिनय कोण विसरू शकेल?






डॅनियलच्या अभिनयाचा प्रवास


डॅनियलने ‘एप्रिल मधाथिल’ या तमिळ चित्रपटातून 2002 मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण केलं. गौतम मेनन आणि सुर्या-ज्योतिका यांच्या ‘काखा काखा’ने चित्रपटामुळे त्याला विशेष प्रसिद्धी मिळाली. वेत्री मारनच्या ‘पोल्लाधवन’मध्येही खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. विजयच्या ‘बिगिल’ सिनेमांमध्ये काम केलं होतं. ‘आरियावन’ हा त्याचा शेवटचा सिनेमा होता.






ही बातमी वाचा : 


'देवीचा फोटो असलेला केक कापणार?' 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेच्या सेलिब्रेशनवर प्रेक्षकांचा आक्षेप; झी मराठीकडून स्पष्टीकरण