एक्स्प्लोर

Telly Masala : निक्कूताई घरात पडणार एकटी ! ते 'महाभारता'त द्रौपदीच्या भूमिकेत दिसली असती जुही चावला;मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli Aarya Jadhav : आर्याला फुटलीय आनंदाची उकळी, अरबाजच्या ग्रुपमध्ये दुफळी; निक्कूताई घरात पडणार एकटी !

 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन (Bigg Boss Marathi New Season) चांगलाच धुमाकूळ घालत आहे. वीकेंडला पार पडलेला 'भाऊचा धक्का' चांगलाच गाजला आहे. आता या आठवड्यात सदस्य का धमाका करणार याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. रविवारी झालेल्या 'भाऊच्या धक्क्या'नंतर निक्की तांबोळी (Nikki Tamboli) आता एकटी पडली असल्याचे चित्र आहे. तर, याचा फायदा कोण घेणार, बिग बॉसच्या घरात एकटीच प्रवास पू्र्ण करणार का हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Juhi Chawla : 'महाभारता'त द्रौपदीच्या भूमिकेत दिसली असती जुही चावला, या गोष्टीमुळे सोडली मालिका...

 छोट्या पडद्यावर रामानंद सागर यांच्या 'रामायण' (Ramayana) मालिकेप्रमाणेच बी. आर. चोप्रा यांची 'महाभारत' (Mahabharat) ही मालिकादेखील चांगलीच गाजली. या दोन्ही मालिका टीव्ही इंडस्ट्रीत कल्ट मालिकांपैकी एक ओळखल्या जातात.  आजही लोक या दोन्ही मालिकांचे चाहते आहेत.  युट्युबवरही या मालिकांच्या एपिसोडला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.  'रामायण', 'महाभारत' या मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांना मालिकेतील व्यक्तिरेखांच्या नावाने आजही ओळखले जाते. 'महाभारत' या मालिकेत द्रौपदीच्या भूमिकेत रुपा गांगुली यांच्याऐवजी अभिनेत्री जुही चावला (Juhi Chawla) झळकली असती. जुही चावलानेच याचीच माहिती दिली. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Aamir Khan : आमिर खान तिसऱ्यांदा लगीनगाठ बांधणार? लग्न करण्याच्या प्रश्नावर 'मिस्टर परफेक्शनिस्ट'ने मौन सोडले

बॉलीवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' अभिनेता आमिर खान (Aamir Khan)  हा आपल्या चित्रपटांमुळेच नाही तर त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतो. आमिर खान आणि किरण राव यांनी 2021 मध्ये परस्पर संमतीने संसारात काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आमिर खान याच्या तिसऱ्या विवाहाची चर्चा रंगली होती. त्याचे नाव बॉलिवूड अभिनेत्रीसोबतही जोडण्यात आले होते. त्यामुळे आमिर खान तिसऱ्यांदा लग्नगाठ बांधणार का, याची चर्चा सुरू झाली होती. आपल्या विवाहाच्या चर्चेवर मौन सोडले आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या सदस्यांवर आलंय मोठं संकट, घरात मानकाप्याची दहशत

Bigg Boss Marathi Season 5 Day 30 : 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi New Season) घरातून रविवारी इरिना रूडाकोवा बाहेर पडली. मागील चार आठवड्यांपासून सुरू असलेला हा खेळ आता पाचव्या आठवड्यात सुरू झाला आहे. बिग बॉस मराठीच्या पाचव्या आठवड्याची सुरुवात ही एका संकटाने होणार आहे. या संकटामुळे मात्र घरातील सदस्यांची झोप  उडणार आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Kangana Ranaut On Farmers Protest : कंगना रणौत पुन्हा बरळली, शेतकरी आंदोलनात महिलांवर अत्याचार, अनेकांना संपवलं असल्याचा आरोप

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी कायम चर्चेत असलेल्या भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. दिल्लीच्या सीमेवर झालेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान (Farmers Protest) बलात्कार आणि हत्या झाल्याचा आरोप कंगनाने केला आहे. दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत तिने हा धक्कादायक आरोप केला आहे. तिच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. याआधी  तिने शेतकरी आंदोलनावर केलेल्या वक्तव्यामुळे तीला खासदार झाल्यानंतर विमानतळावर CISF जवानाने कानशिलात लगावली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा कंगनाने शेतकरी आंदोलनावर भाष्य केले आहे. तिच्या या वक्तव्यावर शेतकरी संघटनांनी संताप व्यक्त केला आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Dahi handi Celebration In Marathi TV Serial : छोट्या पडद्यावर दिसणार दहीहंडीची धामधूम; मालिकांमध्ये गोपाळकाल्याचा उत्साह

 कृष्णजन्माष्टमी हा सण महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा पारंपरिक सण आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी मध्यरात्री साजरी केली जाते. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच गोपाळकाल्याच्या दिवशी उंचावर बांधलेल्या हंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये स्पर्धा लागते. छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये दहिहंडीचा (Dahi Handi)  उत्साह दिसणार आहे. मालिकांमध्ये दहीहंडीच्या अनुषंगाने कथानक दिसणार आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

VIP Treatment In Jail : एका हातात ड्रिंक, दुसऱ्या हातात सिगारेट... हत्या प्रकरणातील आरोपी अभिनेत्याला व्हिआयपी ट्रिटमेंट

 हत्या प्रकरणात तुरुंगात असलेला कन्नड अभिनेता दर्शन थुगुडेपा याची चांगलीच बडदास्त ठेवली जात असल्याचे समोर आले आहे. तुरुंगात व्हिआयपी ट्रिटेमेंट घेणाऱ्या दर्शनचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. दर्शनला सध्या सध्या बेंगळुरुतील परप्पना अग्रहारा सेंट्रल जेलमध्ये हत्या प्रकरणात ठेवण्यात आले आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget