Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या सदस्यांवर आलंय मोठं संकट, घरात मानकाप्याची दहशत
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या पाचव्या आठवड्याची सुरुवात ही एका संकटाने होणार आहे. या संकटामुळे मात्र घरातील सदस्यांची झोप उडणार आहे.
Bigg Boss Marathi Season 5 Day 30 : 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi New Season) घरातून रविवारी इरिना रूडाकोवा बाहेर पडली. मागील चार आठवड्यांपासून सुरू असलेला हा खेळ आता पाचव्या आठवड्यात सुरू झाला आहे. बिग बॉस मराठीच्या पाचव्या आठवड्याची सुरुवात ही एका संकटाने होणार आहे. या संकटामुळे मात्र घरातील सदस्यांची झोप उडणार आहे.
भाऊचा धक्क्यावर शोचा होस्ट रितेश देशमुख याने बिग बॉस मराठीच्या घरातील हा पाचवा आठवडा खास असणार असल्याचे म्हटले होते. या आठवड्यात घरातील सदस्यांची झोप उडणार असल्याचे संकेत रितेश देशमुखने दिले. त्यामुळे हा आठवडा घरातील सदस्यांसाठी आव्हानात्मक ठरणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. 'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो घाबरवणारा आहे. प्रोमोमध्ये बिग बॉस म्हणत आहेत,"सावधान... या घरावर आलंय एक मोठं संकट... तो आलाय.. मानकाप्या...". प्रोमोमध्ये घरातील सर्व सदस्यांची झोप उडालेली असून ते चांगलेच घाबरलेले दिसत आहेत. तसेच घरात एका आरश्यावर लिहिलेलं आहे,"एकटं फिरू नका...नाहीतर..मानकाप्या", असा मजकूर लिहिला आहे.
View this post on Instagram
या मानकाप्याचे भूत कॅप्टन्सीचा टास्क असण्याची शक्यता आहे. आता, कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये कोणता सदस्य बाजी मारणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. मागील आठवड्यात घरातील समीकरणात बदल झाला आहे. भाऊच्या धक्क्यावर 'चक्रव्यू'मुळे (ChakraView) टीम ए मध्ये काहीसं तणावाचे वातावरण झाले आहे. आपल्या पाठिमागे सुरू असणारी निंदानालस्ती आणि होणारा कट पाहून निक्की दुखावली गेली आहे. तिने भाऊच्या धक्क्यावर टीम ए मधील सदस्यांना इशारा दिला आहे. तर, रितेश देशमुखने शनिवारी जान्हवी किल्लेकरला तिच्या वर्तवणुकीमुळे तिला तुरुंगाची शिक्षा सुनावली आहे. तर, दुसरीकडे टीम ए मध्ये आर्या आणि अभिजीत यांचे जमत नाही. मागील आठवड्यात आर्या काहीशी एकटी पडली असल्याचे दिसून आले. आता बिग बॉसच्या घरात य़ा आठवड्यात नवी समीकरणे जुळणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आता आजपासून घरातील सर्वच सदस्य डेंजर झोनमध्ये असणार आहेत. आता यातून घरातील सदस्य आपला कसा मार्ग काढणार याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. आपल्या खेळीने इतरांना घाबरवणारे सदस्य आता स्वत:चं भित्रे झालेले आहेत.