Dahi handi Celebration In Marathi TV Serial : छोट्या पडद्यावर दिसणार दहीहंडीची धामधूम; मालिकांमध्ये गोपाळकाल्याचा उत्साह
Dahi handi Celebration In Marathi TV Serial : छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये दहिहंडीचा उत्साह दिसणार आहे. मालिकांमध्ये दहीहंडीच्या अनुषंगाने कथानक दिसणार आहे.
Dahi handi Celebration In Marathi TV Serial : कृष्णजन्माष्टमी हा सण महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा पारंपरिक सण आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी मध्यरात्री साजरी केली जाते. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच गोपाळकाल्याच्या दिवशी उंचावर बांधलेल्या हंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये स्पर्धा लागते. छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये दहिहंडीचा (Dahi Handi) उत्साह दिसणार आहे. मालिकांमध्ये दहीहंडीच्या अनुषंगाने कथानक दिसणार आहे.
'शिवा' मालिकेतही दहीहंडीच्या अनुषंगाने कथानक दिसणार आहे. 'शिवा' च्या लग्नानंतरच्या पहिल्या दहीहंडी उत्सवासाठी शिवाला आपल्या वस्तीत जायचंय पण सीताई शिवाला दहीहंडीसाठी वस्तीत जायला नकार देते. भाऊ सीताईची समजुत घालतात तरीही सीताई नकार देते . शिवा गोपाळकाल्याच्या पूजेची तयारी सुरु करते. पाना गँग शिवा दहीहंडीसाठी नसणार म्हणून उदास आहे. आशु, शिवाला वस्तीत घेऊन जाण्यासाठी एक आयडिया देतो. घरात टेप रेकॉर्ड लावून आशु, शिवाला दहीहंडीसाठी घेऊन जातो. यादरम्यान कीर्ती आणि सुहासला याचा सुगावा लागतो. शिवा तीच्या शिवा लुक मध्ये दहीहंडी फोडण्यासाठी येते. कीर्ती आणि सुहास पिंट्याशेठला पैसे देउन शिवाला दुखापत करण्यास सांगतात. आता हंडी फोडताना खरंच शिवाला दुखापत होईल ? की आशु तिच्या मदतीला धावून येईल हे दहीहंडी विशेष भागात प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
View this post on Instagram
'तुला शिकवीन चांगलाच धडा' मध्ये सुर्यवंशीच्या घरात गोकुळाष्टमीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. चारुहास आणि अक्षरा साग्रसंगीत पुजा मांडतात. श्रीकृष्णाचा पाळणा हलवला जातो. अक्षराला ह्या सोहळ्यात काही बायकां बाळ होण्यावरुन चिडवतात. पण, चारुलता बायकांना चांगलीच समज देते. चारुलताने पाठीशी उभं राहणं अक्षराला भावनिक करत. भुवनेश्वरी आणि चारुलतामध्ये किती फरक आहे ह्याची जाणीव अधिपतीला सोडून सगळ्यांनाच होते. अधिपती ही दहीहंडी फोडण्यासाठी उत्सुक होऊन तयार होतो पण चारुलता त्याला इतक्या उंच थरावर दही हंडी लावून फोडणे बरे नाही असा सल्ला देते. अधिपती चारुलताच बोलणं न ऐकताच निघून जातो. अधिपतीसाठी दहीहंडीच्या इथे कट रचला गेला आहे ज्यांनी त्याला हंडी फोडताना दुखापत होऊ शकते. अधिपतीच्या जीवाला धोका आहे हे त्याला कळेल का? हे मालिकेत पाहायला मिळणार आहे.
'नवरी मिळे हिटलरला' मध्ये लीला एजेने दिलेले पैसे फेडण्यासाठी म्हणून दडीहंडी खेळायचं ठरवते. जी हंडी फोडण्यासाठी लीला गेलेय त्या हंडीला मोठं बक्षिसं आहे. तिथे एजेच प्रमुख पाहुणा असणार आहे, याची लीलाला जाणीव नाही. लीला एजेला न सांगता दडीहांडीसाठी आलेली आहे. त्यामुळे लीलाला ती हंडी फोडताना पाहून एजेला धक्का बसतो.लीलाच्या काळजीपोटी एजे तिला खूप रागावतो. पण हे तिने का केलं आहे कळताच तो लीलाच्या घरी जाऊन साळुंखेचं कर्ज फेडतो. एजे तिची आणि तिच्या माहेरच्या माणसांची इतकी काळजी करतो आहे हे पाहून लीलाच्या मनात एजे बद्दल आणखी आदराची भावना जागी होते. आता, गोपाळकाल्याच्या निमित्ताने लीला-एजे मध्ये प्रेमाच्या नात्याची सुरुवात होईल का, हे मालिकेत पाहायला मिळणार आहे.