एक्स्प्लोर

Telly Masala : छोट्या पडद्यावर येणार नवी पौराणिक मालिका ते कंगना रणौतने साधला जया बच्चन यांच्यावर निशाणा;  जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या 

Telly Masala : आज दिवसभरातील मनोरंजनसृष्टीत घडलेल्या बातम्यांबद्दल जाणून घ्या...

Telly Masala : मालिका आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये दररोज वेगवेगळ्या घडामोडी घडत असतात. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Marathi Serial Devdatta Nage : छोट्या पडद्यावर येणार नवी पौराणिक मालिका; भगवान शिवशंकराच्या भूमिकेत दिसणार प्रसिद्ध अभिनेता...

'विठुमाऊली' आणि 'दख्खनचा राजा' जोतिबाच्या यशानंतर स्टार प्रवाह वाहिनी नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहे. ‘उदे गं अंबे... कथा साडेतीन शक्तिपीठांची’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात साडेतीन शक्तिपीठांपैकी कुठल्या ना कुठल्या देवीचं कुलदेवता म्हणून पूजन केलं जातं. ही आदिशक्ती आईप्रमाणे कुटुंबाचं रक्षण करते. पण आपल्या कुटुंबासाठी पूजनीय असलेल्या या आईसमान देवीचं महात्म्य आणि इतिहास सर्वांना माहित असतोच असं नाही. तो इतिहास सविस्तरपणे आणि रोचक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न उदे गं अंबे...कथा साडेतीन शक्तिपीठांची या पौराणिक मालिकेतून करण्यात येणार असल्याचे स्टार प्रवाहकडून सांगण्यात आले. या मालिकेत भगवान शिवशंकरच्या भूमिकेत देवदत्त नागे (Devdatta Nage) दिसणार आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Kangana Ranaut On Jaya Bachchan : कंगना रणौतने साधला जया बच्चन यांच्यावर निशाणा, ''त्यांना कधीकधी...''

Kangana Ranaut On Jaya Bachchan : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा (Kangana Ranaut) 'एमर्जन्सी' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकल्याने पुढे ढकलण्यात आला आहे. हा चित्रपट आता 6 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार नाही. मात्र तिची वादग्रस्त वक्तव्ये थांबत नाहीत. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांवर तिने वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. तर, दुसरीकडे भारतीय स्वातंत्र्यलढा, राजकीय नेते, शेतकरी आंदोलनाबाबतही तिने वाद निर्माण करणारी वक्तव्ये केली आहेत. कंगणाने आता ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन (Jaya Bachchan) यांच्यावर निशाणा साधला आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Bigg Boss Marathi Arbaz Patel :  निक्कीसोबतची जवळीक वाढली, अरबाजच्या कथित गर्लफ्रेंडची पोस्ट व्हायरल, म्हणाली, '''त्याच्याबद्दल आता मला...''

 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi) घरात दर आठवड्याला नवीन समीकरणे तयार होताना दिसत आहे. बिग बॉसच्या घरात सगळे सदस्य आपला खेळ दाखवू लागले आहेत. तर, दुसरीकडे खेळाशिवाय घरातील सदस्य अरबाज पटेल (Arbaz Patel) आणि निक्की तांबोळी (Nikki Tamboli) यांचे सूत जुळलं असल्याची चर्चा सुरू आहे. तर, दुसरीकडे अरबाजची कथित गर्लफ्रेंडने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. तिच्या या पोस्टने आता नव्याने चर्चांना उधाण आले आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Marathi Serial Updates Star Pravah : आई आणि बाबा रिटायर होत आहेत; निवेदिता सराफ-मंगेश कदम यांची जोडी नव्या मालिकेत दिसणार

सध्या छोट्या पडद्यावर नव्या मालिकांची लाट आल्याचे चित्र दिसत आहे. टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर राहण्यासाठी मराठी वाहिन्यांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मागील काही महिन्यात नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. त्यातील काही मालिकांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.  मागील 200 आठवडे टीआरपीमध्ये आघाडीवर असणाऱ्या 'स्टार प्रवाह' आता आणखी एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणणार आहे. या मालिकेत दिग्गज कलाकार निवेदिता सराफ आणि  मंगेश कदम ही जोडी दिसून येणार आहे.  

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Santosh Juvekar : 'हा माथेफिरू दिग्दर्शक...', संतोष जुवेकरची अनुराग कश्यपसाठी पोस्ट 

 मोरया, झेंडा, रेगे या सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता संतोष जुवेकर (Santosh Juvekar) आता त्याच्या बॉलीवुड पदार्पणासाठी सज्ज झालाय. इतकच नव्हे तर त्याने नुकतच बॉलीवुडचा प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबत काम करण्याची संधी मिळाली. अनुरागचे सिनेमे हे अनेक विषयांवर भाष्य करणारे असतात. त्यामुळे त्याच्यासोबत काम करण्याची प्रत्येक कलाकाराची इच्छा असतेच. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
Embed widget