Marathi Serial : प्रेक्षकांवर जरा तरी दया दाखवा... 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेवर प्रेक्षक परत भडकले
Marathi Serial : पुन्हा कर्तव्य आहे मालिकेवर प्रेक्षकांनी पुन्हा एकदा तीव्र नाराजी व्यक्त केली असल्याचं पाहायला मिळतंय.
Marathi Serial : झी मराठीवरील (Zee Marathi) मालिका हा प्रेक्षकांच्या फरा जिव्हाळ्याचा विषय आहे. वाहिनीवर होऊन गेलेल्या अनेक मालिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत आणि त्या त्यांच्या पसंतीस देखील पडतता. पण सध्या झी मराठीवर सुरु असलेल्या मालिकांवर प्रेक्षकांची बराच रोष व्यक्त केला जातोय. 'पुन्हा कर्तव्य आहे' (Punha Kartvya Ahe) या मालिकेवरही प्रेक्षकांची अशीच काहीशी नाराजी असल्याचं पाहायला मिळतंय.
काही महिन्यांपूर्वी वाहिनीवर पुन्हा कर्तव्य आहे ही मालिका सुरु आहे. एक नवी गोष्ट या मालिकेतून दाखवण्यात आली आहे. पण ही गोष्ट प्रेक्षकांच्या काही केल्या पसंतीस उतरत नसल्याचं चित्र आहे. वसुंधरा आणि आकाशच्या आयुष्यात येणारी नवी वादळं, त्यात त्यांच्या मुलांची दाखवण्यात आलेली मानसिकता या सगळ्या गोष्टी या मालिकेतून दाखवण्यात आल्यात. नुकतच या मालिकेचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. त्यावरही प्रेक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय.
मालिकेचा नवा प्रोमो काय?
मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये आकाशची आई जयश्री ही वसुंधराला मला नातू हवा आहे, असं सांगते. त्यावर वसुंधरा आम्हाला आधीच तीन मुलं आहेत म्हणते. पण त्यावर जयश्री म्हणते की, तुम्हाला दोन मुलीच आहेत. त्यामुळे मला माझ्या आकाशचा मुलगा हवाय. तुला लग्न करुन इथे कशाला आणलंय. मला ठाकूरांचा वारस हवा आहे. तुझा बनी ठाकूरांचा वारस कधीच होऊ शकत नाही. त्यामुळे आता जयश्रीच्या मागणीमुळे वसुंधराच्या मनातील गुंता आणखी वाढणार आहे.
View this post on Instagram
मालिकेवर प्रेक्षक संतापले
दरम्यान मालिकेच्या या नव्या प्रोमोवर प्रेक्षकांनी कमेंट्स करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एकाने कमेंट करत म्हटलं की, आता नवीन ट्रेंड आलाय, सगळ्या मालिकेत सासू विलन झालीये. काहीही दाखवता. प्रेक्षकांवर जरा दया करा. एकाने कमेंट करत म्हटलं की, जगं कुठे गेलंय... आणि सिरियलमध्ये काय दाखवता. तसेच एकाने कमेंट करत हे अतिशय बकवास आहे, असं म्हटलं.