झी मराठीच्या 'लक्ष्मी निवास' मालिकेचा मुहूर्त ठरला, 'या' दिवशी अन् 'या' वेळाला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Marathi Serial : झी मराठी वाहिनीवर लवकरच लक्ष्मी निवास ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतीच या मालिकेची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.
Marathi Serial : झी मराठीवर (Zee Marathi) सध्या नव्या मालिकांचा प्रवाह सुरु आहे. नुकतीच 'लक्ष्मी निवास' ( Lakshmi Niwas) या मालिकेची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता या मालिकेची वेळही जाहीर करण्यात आली आहे. येत्या 23 डिसेंबरपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे आता कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.
लक्ष्मी निवास या मालिकेत हर्षदा खानविलकर आणि तुषार दळवी हे मुख्य भूमिकेत आहेत. एका साध्या जोडप्याची ही गोष्ट आहे. त्यामुळे ही मालिका कधीपासून सुरु होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली होती. आता या मालिकेची तारीख आणि वेळही जाहीर करण्यात आली आहे. येत्या 23 डिसेंबरपासून रात्री 8 वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मालिकेचा नवा प्रोमो समोर
मालिकेचा नवा प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे. यामध्ये निवृत्तीची स्वप्न बघणारे श्रीनिवास हे त्या पैशांमधून घर बांधण्याची स्वप्न बघत असतात. मुलांच्या तक्रारी आणि मुलींची लग्न यामध्ये श्रीनिवास अडकले असल्याचं पाहायला मिळतंय. वडिलांच्या निवृत्तीच्या पैशांची मुलं वाट बघत आहेत. श्रीनिवास लक्ष्मीला म्हणतात की, मुलांना वाटतं की आता मी रिटायर झालोय. मी काही कामाचा नाही...त्यावर लक्ष्मी श्रीनिवासला सांगते की, तुम्ही या मुलांना घडवलं आहे मग तुम्ही एक घर नाही बांधू शकणार? आपण दोघं मिळून घरंही बांधू आणि लेकींची लग्नही करु..एकमेकांच्या साथीने आणि आपल्या माणसांच्या सोबतीनेच बनतं लक्ष्मी निवास..
मालिकेचा हा प्रोमो नुकताच समोर आलेला आहे. झी मराठीच्या पेजवरुन हा प्रोमो शेअर करण्यात आलाय. त्यावर आई-बाबा म्हणून कर्तव्य निभावणार की स्वतःची स्वप्न पूर्ण करणार? असं कॅप्शन देण्यात आलं आहे.
View this post on Instagram