एक्स्प्लोर

अभिनेते योगेश सोमणांचं मोहन जोशींना खरमरीत पत्र

तुम्ही तर 'मीडिया में छा गये बॉस' असा टोमणा योगेश सोमणांनी मोहन जोशींना मारला आहे

मुंबई : लेखक, अभिनेते योगेश सोमण आणि नाट्यपरिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांच्यात वाद रंगल्याची चिन्हं आहेत. योगेश सोमण यांनी खरमरीत पत्र लिहून आनंद, खेद, दुःख, संताप व्यक्त केला आहे. मोहन जोशी यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याच्या निमित्ताने सोमण यांनी तिरकस पत्र लिहिलं आहे. 15 वर्षांची अध्यक्षीय कारकीर्द असताना आपला उमेदवारी अर्ज बाद कसा झाला, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. साधा उमेदवारी अर्ज भरता येत नसेल, तर असाच भोंगळ कारभार परिषदेत केला जात होता का? असा सवालही योगेश सोमण यांनी उपस्थित केला आहे. प्रसाद कांबळी यांचा मार्ग मोकळा झाला, अशा एकांगी बातम्या काही माध्यमं देत असल्याचं सांगताना कालपासून तुम्ही तर 'मीडिया में छा गये बॉस' असा टोमणाही सोमणांनी मारला आहे. मोहन जोशी यांच्या अध्यक्षपदावरुन गेली काही वर्ष वाद रंगला आहे. अभिनेते योगेश सोमण जवळपास 30 वर्ष कलाक्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी अजय देवगन-तब्बू यांच्यासोबत 'दृश्यम' या गाजलेल्या हिंदी चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्याशिवाय दिल्या घरी तू सुखी राहा, नांदा सौख्यभरे, अंजली यासारख्या मराठी मालिकांमध्येही त्यांनी काम केलं आहे. 'इफ्फी'मधून रवी जाधव दिग्दर्शित 'न्यूड' चित्रपटाला बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर इतर मराठी सिनेमांनी महोत्सवातून माघार घेण्याचं ठरवलं होतं. मात्र योगेश यांचं दिग्दर्शन आणि निर्मिती असलेला ‘माझं भिरभिर’ हा सिनेमा इफ्फीत दाखवण्याची भूमिका त्यांनी घेतली होती. काय आहे पत्र? प्रति, श्री मोहन जोशी मा. अध्यक्ष, नाट्यपरिषद. विषय - आनंद, खेद, दुःख, संताप सारेच व्यक्त करणे. महोदय, आज वर्तमानपत्रातून तुमचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याच्या बातम्या वाचल्या ( म्हणजे कालपासून मीडिया में छा गये बॉस ) आणि माझी मलाच गंमत वाटली, म्हणजे काही दिवसांपूर्वी आपल्याला संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला किंवा विष्णुदास भावे पुरस्कार मिळाला, या ही बातम्या वाचल्या तेव्हा आनंद झाला तो व्यक्तही केला. आता कसं व्यक्त होऊ? 15 वर्षांची आपली अध्यक्षीय कारकीर्द, एकसे एक हुशार माणसं आपल्या भोवती, साधा उमेदवारी अर्ज आपल्याला भरता येऊ नये? तुमच्या सकट सगळे सेम चूक करतात? मोहनराव मग आता शंका मनात येऊ लागते की असाच भोंगळ कारभार परिषदेत केला जात होता का? असो कालपासून आपण अस्वस्थ असाल, आपल्या दुःखावर डागण्या द्यायची माझी अजिबात इच्छा नाही. मोहनराव आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा. अभिनेते म्हणून आपण आदरणीय आहातच. आता वेळ मिळाल्यास आपण माझ्या प्रशिक्षणाच्या विविध उपक्रमात सहभागी व्हावेत ही विनंती. एक महत्वाची गोष्ट, याही वेळी चुकीच्या माहितीवर बातम्या देण्याची प्रथा काही माध्यमांनी चालू ठेवलीच आहे - बाद झालाय तो उमेदवारी अर्ज अध्यक्षपदाचा अर्ज नव्हे आणि फक्त मुंबई पुरती ही निवडणूक नाही महाराष्ट्रभरातून जवळ जवळ 40 उमेदवार निवडून येणार आहेत, ते ठरवणार आहेत अध्यक्ष कोण होणार ते. थोडक्यात प्रसाद कांबळी यांचा मार्ग मोकळा झाला वगैरे एकांगीबातम्या देऊ नयेत. धन्यवाद आपला, योगेश सोमण

महत्त्वाच्या बातम्या

Suchitra Bandekar on Pooja Birari: 'पूजाला म्हटलं ऑडिशन देऊन बघते का? ती म्हणाली..', सुचित्रा बांदेकरांनी सांगितला ऑडिशनचा किस्सा
'पूजाला म्हटलं ऑडिशन देऊन बघते का? ती म्हणाली..', सुचित्रा बांदेकरांनी सांगितला ऑडिशनचा किस्सा
Jai Jai Swami Samarth: एका बाजूला संसार, तर दुसऱ्या बाजूला स्वामीभक्ती! रुहीसमोर मोठं संकट, स्वामी कसा दाखवणार मार्ग?
एका बाजूला संसार, तर दुसऱ्या बाजूला स्वामीभक्ती! रुहीसमोर मोठं संकट, स्वामी कसा दाखवणार मार्ग?
Yetech Aata Mi Naandayla: '50 ATKT अन् गावभर लागले नापासाचे होर्डिंग्ज' अभिनेता हर्षद अतकारीने सांगितला मजेशीर किस्सा
'50 ATKT अन् गावभर लागले नापासाचे होर्डिंग्ज' अभिनेता हर्षद अतकारीने सांगितला मजेशीर किस्सा
Bigg Boss 20 Actress: 'बिग बॉस 20'फेम अभिनेत्रीचा शॉकिंग खुलासा, चुलत भावानेच 'नको तिथे स्पर्श केला'; प्रेग्नेंसीच्या भीतीने खाल्ली पपई
'बिग बॉस 20'फेम अभिनेत्रीचा शॉकिंग खुलासा, चुलत भावानेच 'नको तिथे स्पर्श केला'; प्रेग्नेंसीच्या भीतीने खाल्ली पपई

व्हिडीओ

Rahul Gandhi Fail To Convince DMK : डिलिमिटेशनचा 'खेळ', मिशन चेन्नई फेल! | Special Report ABP Majha
Majha Katta Sanjay Mone Ashok Mulye : ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये, अभिनेता संजय मोने माझा कट्ट्यावर
Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delimitation : कोणत्याही ठोस आश्वासनाशिवाय संपली इंडिया आघाडीची बैठक, शरद पवारांनी नेत्यांची मत जाणून घेतली, सूत्रांची माहिती
शरद पवार आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक ठोस आश्वासनाशिवाय संपली, दिल्लीत सुप्रिया सुळेंची खासदारांसोबत बैठक
Live सामन्यात भयंकर राडा, इंग्लंडचा जेमी ओव्हरटन ऑस्ट्रेलियाच्या मिशेल मार्शला भिडला, मैदानावर वाद कशामुळं?
Live सामन्यात भयंकर वाद, इंग्लंडचा जेमी ओव्हरटन ऑस्ट्रेलियाच्या मिशेल मार्शला भिडला
Parth Pawar : तुमचा हेतू कितीही चांगला असू द्या पण साप हा साप असतो, पार्थ पवारांच्या इन्स्टाग्राम स्टेटसचा व्हिडिओ चर्चेत
तुमचा हेतू कितीही चांगला असू द्या पण साप हा साप असतो, पार्थ पवारांच्या इन्स्टाग्राम स्टेटसचा व्हिडिओ चर्चेत
ह्रदयद्रावक दुर्घटना... ठाण्यात दुचाकीवरील तरुणी ठार, धुळ्यात वीजेच्या धक्क्याने 14 वर्षीय युवकाचा मृत्यू
ह्रदयद्रावक दुर्घटना... ठाण्यात दुचाकीवरील तरुणी ठार, धुळ्यात वीजेच्या धक्क्याने 14 वर्षीय युवकाचा मृत्यू
शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात तत्कालीन शिक्षण उपसंचालकास अटक; 6 दिवसांची पोलीस कोठडी
शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात तत्कालीन शिक्षण उपसंचालकास अटक; 6 दिवसांची पोलीस कोठडी
राहुल गांधींची गळाभेट, नेत्यांचे स्वागत, पण भूमिका ठाम; डिलिमिटेशन विधेयकास DMK चा पाठिंबा, भेटीनंतर स्टॅलिन म्हणाले...
राहुल गांधींची गळाभेट, नेत्यांचे स्वागत, पण भूमिका ठाम; डिलिमिटेशन विधेयकास DMK चा पाठिंबा, भेटीनंतर स्टॅलिन म्हणाले...
Gold Silver Rate : सोने उच्चांकावरुन 68 हजार रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात देखील 2.67 लाख रुपयांची घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर 
सोने उच्चांकावरुन 68 हजार रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात देखील 2.67 लाख रुपयांची घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर
Rohit Pawar : डिलिमिटेशनला विरोध असल्याचं आजच स्पष्ट करा, रोहित पवारांंचं सुप्रिया सुळेंना पत्र, धैर्यशील मोहिते पाटील आणि बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया समोर
रोहित पवारांच्या पत्रावर धैर्यशील मोहिते पाटील आणि बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया समोर, दोन्ही खासदार म्हणाले...
Embed widget