एक्स्प्लोर

Appi Amchi Collector Serial Track: अमोल समोर अर्जुन-अप्पीनं लपवलेलं सत्य येणार? 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेला अनपेक्षित वळण

Appi Amchi Collector Serial Track: झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'अप्पी आमची कलेक्टर'ला अनपेक्षित वळण मिळणार, अमोल समोर अर्जुन-अप्पीनं लपवलेलं सत्य येणार?

Appi Amchi Collector Serial Track: 'अप्पी आमची कलेक्टर' (Appi Amchi Collector) मध्ये नव्या वर्षात खूप घडामोडी घडणार आहे. अमोल आपल्या आई-वडिलांच्या लग्नाच्या आठवणींचा संग्रह एका स्क्रॅपबुकमध्ये जपून ठेवतो. ज्यामुळे अप्पी आणि अर्जुन भावूक होतात. अमोल आपला जीव वाचवल्याबद्दल गणपती बाप्पाला प्रार्थना करतो आणि आभार मानतो. अप्पीनं रुग्णालयातील फसव्या नोकरीच्या प्रथांचा तपास करण्याचा निर्णय घेतल्यानं तणाव निर्माण होतो. अमोलची तब्येत हळूहळू सुधारतेय आणि कुटुंब एकत्र येऊन आनंद साजरा करतायत. 

अमोल पपेरमध्ये संकल्पचा फोटो पाहतो, ज्यामुळे एक नवं गूढ निर्माण होतं. अमोल आपल्या आजारात मदत करणाऱ्या सगळ्यांचे, कुटुंब आणि वैद्यकीय टीमचे, आभार मानण्याचा निर्णय घेतो. कुटुंब अप्पीच्या सत्कार सोहळ्याची तयारी करत असतानाच, संकल्पच्या भूमिकेबद्दल अमोलला सत्य सांगण्याची चिंता सतावते. सत्कार सोहळ्यात अप्पी तिच्या सहकाऱ्यांचे आणि कुटुंबाच्या समर्थनाबद्दल मनापासून आभार मानते. अनपेक्षितपणे, गायतोंडे अमोलला त्याच्या खंबीरपणाबद्दल दुसरा सन्मान जाहीर करतो. अमोल मंचावर जातो आणि आपल्या पालकांबद्दल, डॉक्टरांबद्दल, आणि कुटुंबाबद्दल मनोगत व्यक्त करतो. त्याचं भाषण सर्वांना भावतं. 

View this post on Instagram
 
A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

अमोलचा कलेक्टर ऑफिसमध्ये त्याच्या आजाराशी लढण्याच्या धैर्याबद्दल सन्मान केला जातो, तर अप्पीला घरच्या अडचणी असूनही तिची जबाबदारी चोख बजावल्याबद्दल कौतुक होतं. सोहळ्यात अमोल त्याला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार मानतो आणि माणिक (संकल्प) याचा उल्लेख करतो, ज्यामुळे कुटुंबात तणाव निर्माण होतो. बापू आणि विनायक अमोलला संकल्पबद्दल सत्य सांगण्याचा निर्णय घेतात. मात्र, अमोलच्या नाजूक प्रकृतीची काळजी घेऊन अप्पी आणि अर्जुन याला विरोध करतात. सत्कार सोहळ्याचे फोटो स्क्रॅपबुकमध्ये लावताना, अमोलला नव्या वर्षाचा संकल्प लिहायची कल्पना येते. तो कुटुंबातील सर्व सदस्यांचे संकल्प गोळा करतो आणि आपली वही वही देवासमोर ठेवतो आणि सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करतो. नववर्षाच्या पूर्वसंध्येला अमोल घरीच कार्यक्रम आखतो, आणि दीप्या आणि मोनाला अप्पी अर्जुनसोबत डांससाठी एकत्र आणतो. वर्ष संपताना, अमोल सगळ्यांच्या आनंदासाठी प्रार्थना करतो आणि कुटुंब आनंदाने नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होतं.

आता काय होईल? जेव्हा अमोल समोर अर्जुन-अप्पीनं लपवलेलं सत्य येईल? नव्या वर्षातली अमोलची प्रार्थना पूर्ण होईल? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan bhujbal & Devendra Fadnavis : मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराजी; फडणवीस अन् भुजबळांकडून एकमेकांचं तोंडभरून कौतुक; चर्चांना उधाण
मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराजी; फडणवीस अन् भुजबळांकडून एकमेकांचं तोंडभरून कौतुक; चर्चांना उधाण
Shubman Gill : तू खेळ, तुला कोण काय बोलणार नाही! कॅप्टनला बाहेर बसवून संघात घेतलेल्या गिलला शाब्दिक डावपेचात चारी बाजूने घेरत क्षणात गेम केला
Video : तू खेळ, तुला कोण काय बोलणार नाही! कॅप्टनला बाहेर बसवून संघात घेतलेल्या गिलला शाब्दिक डावपेचात चारी बाजूने घेरत क्षणात गेम केला
खर्च कोणी केला, कोणत्या सीटवर बसला, किती बॅगा घेऊन जाणार? परदेशात जाताना 19 प्रकारची माहिती द्यावी लागणार!
खर्च कोणी केला, कोणत्या सीटवर बसला, किती बॅगा घेऊन जाणार? परदेशात जाताना 19 प्रकारची माहिती द्यावी लागणार!
''शरद पवार अन् सुप्रिया सुळेंनी घरी बसावं, शेतीबाडी पाहावी, त्यांच्या वांग्याला बरेच पैसे मिळालेत''
''शरद पवार अन् सुप्रिया सुळेंनी घरी बसावं, शेतीबाडी पाहावी, त्यांच्या वांग्याला बरेच पैसे मिळालेत''
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbra Marathi vs Hindiमराठी बोलायला सांगणाऱ्या तरुणाला माफी  मागण्याची वेळ Avinash Jadhav संतापलेSupriya Sule PCनैतिकतेच्या पातळीवर धनजंय मुंडे राजीनाम्याबाबत निर्णय व्हावा सुप्रिया सुळेंचं वक्तव्यChandrashekhar Bawankule : 'आमच्यासाठी आनंदाचा दिवस, सामना कधीतरी चांगल लिहिल याची वाट पाहत होतो'Sanjay Raut PC | गडचिरोलीवरून फडणवीसांचं कौतुक एकनाथ शिंदेंना टोला, काय म्हणाले संजय राऊत?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan bhujbal & Devendra Fadnavis : मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराजी; फडणवीस अन् भुजबळांकडून एकमेकांचं तोंडभरून कौतुक; चर्चांना उधाण
मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराजी; फडणवीस अन् भुजबळांकडून एकमेकांचं तोंडभरून कौतुक; चर्चांना उधाण
Shubman Gill : तू खेळ, तुला कोण काय बोलणार नाही! कॅप्टनला बाहेर बसवून संघात घेतलेल्या गिलला शाब्दिक डावपेचात चारी बाजूने घेरत क्षणात गेम केला
Video : तू खेळ, तुला कोण काय बोलणार नाही! कॅप्टनला बाहेर बसवून संघात घेतलेल्या गिलला शाब्दिक डावपेचात चारी बाजूने घेरत क्षणात गेम केला
खर्च कोणी केला, कोणत्या सीटवर बसला, किती बॅगा घेऊन जाणार? परदेशात जाताना 19 प्रकारची माहिती द्यावी लागणार!
खर्च कोणी केला, कोणत्या सीटवर बसला, किती बॅगा घेऊन जाणार? परदेशात जाताना 19 प्रकारची माहिती द्यावी लागणार!
''शरद पवार अन् सुप्रिया सुळेंनी घरी बसावं, शेतीबाडी पाहावी, त्यांच्या वांग्याला बरेच पैसे मिळालेत''
''शरद पवार अन् सुप्रिया सुळेंनी घरी बसावं, शेतीबाडी पाहावी, त्यांच्या वांग्याला बरेच पैसे मिळालेत''
Devendra Fadnavis : सामनातून मुख्यमंत्र्यांचं भरभरून कौतुक, देवेंद्र फडणवीसांची दोन शब्दात प्रतिक्रिया!
सामनातून मुख्यमंत्र्यांचं भरभरून कौतुक, देवेंद्र फडणवीसांची दोन शब्दात प्रतिक्रिया!
भाजप राज्यात भाकरी फिरवणार, दोन महिन्यात खुर्ची बदलणार; संघटन पर्व संपताच महाराष्ट्रात नवा चेहरा
भाजप राज्यात भाकरी फिरवणार, दोन महिन्यात खुर्ची बदलणार; संघटन पर्व संपताच महाराष्ट्रात नवा चेहरा
शरद पवारांवर आरोप झाले तेव्हा त्यांनी राजीनामा दिला होता, सुप्रिया सुळेंचा धनंजय मुंडेंना टोला
शरद पवारांवर आरोप झाले तेव्हा त्यांनी राजीनामा दिला होता, सुप्रिया सुळेंचा धनंजय मुंडेंना टोला
Beed Guardian Minister: बीडचं पालकमंत्रीपद कोणाला मिळणार? अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
बीडचं पालकमंत्रीपद कोणाला मिळणार? अजित पवार मुंबईत येताच निर्णय होणार
Embed widget