Utkarsh Shinde : 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात कोण असेल? उत्कर्ष शिंदेला लागली उत्सुकता
Bigg Boss Marathi : 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वाची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
Bigg Boss Marathi : 'बिग बॉस मराठी'चं चौथं (Bigg Boss Marathi 4) पर्व अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. त्यामुळे या वादग्रस्त कार्यक्रमाची आता चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वाबद्दल मास्टमाईंड उत्कर्ष शिंदे (Utkarsh Shinde) म्हणाला,"नव्या पर्वात ऑलराऊंडर, टास्क मास्टर, मास्टरमाईंड कोण असेल याची मला उत्सुकता आहे".
बिग बॉसच्या नव्या पर्वाबद्दल उत्कर्ष शिंदे म्हणाला,"बिग बॉसच्या नव्या पर्वाची मला प्रचंड उत्सुकता आहे. या पर्व नविन काहीतरी पाहायला मिळणार आहे. हा कार्यक्रम स्क्रिप्टेड नसल्याने व्यक्ती तितक्या प्रकृती पाहायला मिळणार आहेत. आपण जे खेळून आलो आहोत ते पाहायला मला आवडेल".
बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वातील स्पर्धकांना उत्सकर्षने दिला सल्ला
बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वातील स्पर्धकांना उत्कर्ष म्हणाला आहे,"बिग बॉस मराठीचा खेळ तुम्ही कसा खेळणारा आहात हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे दृष्टीकोण ठरवा आणि त्याप्रमाणे खेळ खेळा. या खेळात 24 तास अॅक्टिव्ह राहणं गरजेचं आहे. बिग बॉसमध्ये गेल्यावर तुम्हाला प्रेमच मिळेल हा समज चुकीचा आहे. कोण काय म्हणतं, कोण कसं दिसतं यापेक्षा तुम्हाला काय करायचं आहे हे महत्त्वाचं आहे".
'बिग बॉस मराठी'मुळे आयुष्य बदललं : उत्कर्ष शिंदे
'बिग बॉस मराठी'बद्दल उत्कर्ष म्हणाला,'बिग बॉस मराठी'मुळे माझ्या आयुष्यात खूप फरक पडला आहे. गायक म्हणून लोकप्रिय होतोच. पण आता अभिनेता म्हणून एक नवी ओळख मिळाली आहे. बिग बॉसमुळे मला एक वेगळाच आत्मविश्वास मिळाला आहे. हा कार्यक्रम जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक फॉलो करतात. त्यामुळे मला असं वाटतं की, या कार्यक्रमामुळे मला चांगलं काम करण्याची संधी मिळाली आहे. हा माझ्यासाठी नक्कीच एक चांगला मंच ठरला आहे".
'बिग बॉस मराठी'च्या घरात लोककलावंत असावेत : उत्कर्ष शिंदे
'बिग बॉस मराठी'च्या घरात लोककलावंताना बघायला आवडेल असं उत्कर्ष शिंदे म्हणाला आहे. 'बिग बॉस मराठी'मध्ये नामवंत कलाकार नेहमीच येतात. पण लोककलावंतांनादेखील संधी मिळायला हवी. लोककलावंत आणि नामांकित कलाकार एकत्र कसं खेळतील याची मला उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या