एक्स्प्लोर
'सेक्रेड गेम्स'च्या दुसऱ्या सीजनमध्ये हे नवे चेहरे दिसणार
सोमवारी नेटफ्लिक्स इंडियाच्या ट्विटर पेजवरुन दुसऱ्या सीजनचा टीझर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमो मध्ये दोन नवी पात्र दिसत आहेत ती म्हणजे कल्की आणि रणवीर शौरी.
मुंबई: संपूर्ण भारताला वेड लावणाऱ्या नेटफ्लिक्सच्या 'सेक्रेड गेम्स' या वेबसिरीजच्या दुसऱ्या सीजनची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. नेटफ्लिक्स इंडियाने त्यासंदर्भात ट्वीट करुन माहिती दिली आहे. सोमवारी नेटफ्लिक्स इंडियाच्या ट्विटर पेजवरुन दुसऱ्या सीजनचा टीझर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमो मध्ये दोन नवी पात्र दिसत आहेत ती म्हणजे कल्की आणि रणवीर शौरी. कल्की केकला आणि रणवीर शौरी यांचा सेक्रेज गेम्स मधील सहभाग चाहत्यांसाठी अत्यंत सरप्राईजींग ठरला आहे. सोशल मिडीया वर नवीन प्रोमो वायरल होत आहे.
सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि पंकज त्रिपाठीसोबतच कल्की आणि रणवीर शौरी यांचादेखील टीजरमध्ये समावेश आहे. “इस खेल का असली बाप कौन है?” असा प्रश्न प्रोमोमध्ये विचारण्यात आला आहे. कल्की स्वत: सेक्रेड गेम्स या शो ची मोठी फॅन असल्याचं तिने सांगितलं. कल्की या सीजनमध्ये ‘बत्या’ या नावाचं पात्र साकारणार आहे, रणवीर शौरी हा ‘शाहिद खान’ म्हणून आपल्यासमोर येणार आहे.
सेक्रेड गेम्सच्या पहिल्या सीजनचं दिग्दर्शन अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी यांनी केलं होतं. पहिला सीजन संपल्यानंतर पुढे काय होणार या प्रश्नाने सर्व प्रेक्षकांना व्याकुळ केले होते. आता दुसरा सीजन रिलीज कधी होणार याबद्दल काही माहिती मिळाली नसली तरी प्रोमो मध्ये नवे चेहरे दिसल्याने प्रेक्षकांची उत्सुकता नक्कीच वाढली आहे. पहिल्या सीजनने प्रेक्षकांची उत्कंठा ताणून धरली आहे, त्यामुळे दुसऱ्या सीजनकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत. दुसरा सीजन प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खरा उतरतो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
मुंबई | 'सेक्रेड गेम्स' फेम एलनाज नौरोजीचे दिग्दर्शक विपुल शाहांवर लैंगिक शोषणाचे आरोप
पच्चीस दिन है तुम्हारे पास!
सेक्रेड गेम्समध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीने साकरलेला गणेश गायतोंडे पुन्हा एकदा पाहण्यासाठी चाहते अक्षरशः वेडे झाले आहेत. पहिल्या सीजनमध्ये गणेश गायतोंडेने सरताजला सांगितले होते की, "पच्चीस दिन में सब मर जायेंगे, बस त्रिवेदी बचेगा." त्यामुळे दुसऱ्या सीजनमध्ये त्रिवेदी हे पात्र आपल्याला प्रमुख भूमिकेत पहायला मिळणार आहे. तसेच पंकज त्रिपाठीदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
Iss khel ka asli baap kaun? pic.twitter.com/epvUzWm4OL
— Sacred Games (@SacredGames_TV) May 6, 2019
Season 2 is coming. Put your chattris in the air. #SacredGamesS2 pic.twitter.com/1ACW0eVGDe
— Netflix India (@NetflixIndia) May 6, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
कोल्हापूर
सोलापूर
Advertisement