News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट खेळ
X

सोशल साईट्सवर ट्रेण्ड होणारं #‎amarphotostudio काय आहे?

FOLLOW US: 
Share:
मुंबई : #‎amarphotostudio हा हॅशटॅग सध्या सोशल नेटवर्किंग साईट्सवर चांगलाच लोकप्रिय झाला आहे. सामान्य यूझर्सपासून मराठीतले सुप्रसिद्ध कलाकारही आपले लहानपणीचे किंवा नजीकच्या काळातले पासपोर्ट साईझ फोटो शेअर करताना दिसत आहेत.   अनेक जण मजा म्हणून हे फोटो अपलोड करत असतानाच हा ट्रेण्ड सुरु झाला. आपला फोटो शेअर करुन आपल्या मित्रमैत्रीणींना टॅग करुन चॅलेंज पुढे सुरु ठेवायचं, अशी ही पद्धत. मात्र #‎amarphotostudio या हॅशटॅगने शेअर करण्यामागचं कारण कित्येकांना माहितच नाही.   अल्पावधीतच तरुणाईची मनं जिंकणाऱ्या 'दिल दोस्ती दुनियादारी'चे लोकप्रिय कलाकार पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मात्र टीव्ही मालिका नाही, तर 'अमर फोटो स्टुडिओ' या नाटकाच्या माध्यमातून. 'सुबक' निर्मित, 'कलाकारखाना' प्रस्तुत 'अमर फोटो स्टुडिओ' ही नव्या नाट्यकृती लवकरच रंगमंचावर येत आहे.   अमेय, सुव्रत, सखी या तिघांनी मिळून आणलेल्या कलाकारखाना या संस्थेतर्फे सध्या फेसबुक यासारख्या सोशल नेट्वर्किंग साइटवर अमर फोटो स्टुडीओ ही अॅक्टिव्हीटी जोशात सुरु आहे.  अभिनेता सुनील बर्वे यांनी चार वर्षांपूर्वी‘हर्बेरिअम’ हा आगळावेगळा उपक्रम सुरु केला.   अभिनेता सुनील बर्वे यांच्या ‘सुबक’ची निर्मिती असलेल्या या उपक्रमाला नाट्यरसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. यात ‘सुर्याची पिल्ले’, झोपी गेलेला जागा झाला’, ‘हमीदाबाईची कोठी’,‘लहानपण देगा देवा’ आणि ‘आंधळं दळतंय’ या पाच जुन्या गाजलेल्या नाटकांचे नव्या संचात सादरीकरण करुन नाटय रसिकांना एक अनोखी मेजवानी दिली.   आता ‘सुबक’ची अमर फोटो स्टुडिओ ही नवीकोरी कलाकृती घेऊन सुनील बर्वे पु्न्हा येत आहेत. अमेय वाघ, सुव्रत जोशी, सखी गोखले, पूजा ठोंबरे, सिद्धेश पूरकर ही लोकप्रिय कलाकार मंडळी यात एकत्र आली आहेत. मनस्विनी लता रवींद्र यांचे लेखन असणाऱ्या या नाटकाचे दिग्दर्शन निपुण धर्माधिकारी करीत आहेत. नाटकाचं नावच उत्सुकता वाढवणारं असून त्याचा विषय अजून गुलदस्त्यात आहे. मात्र रसिक प्रेक्षकांसाठी ती एक अफलातून ट्रीट असल्याचं म्हटलं जात आहे. चेतन डांगे लिखित यातील गीतांना गंधार संगोराम यांचे पार्श्वसंगीत असणार आहे. या नाटकाची संकल्पना घेऊन अमेय वाघ, सुव्रत जोशी, सखी गोखले हे कलाकार सुनील बर्वे यांच्या कडे गेले त्यांनाही हा विषय आवडला आणि तरुणाईला प्रोत्साहन द्यावं या हेतूने सुनील बर्वे यांनी या कलाकृतीला पाठिंबा दिल्याचे म्हटले आहे.
Published at : 28 Jul 2016 01:26 PM (IST) Tags: drama नाटक theatre

आणखी महत्वाच्या बातम्या

Drashti Dhami Announce Pregnancy : लग्नाच्या 9 वर्षांनंतर अभिनेत्रीच्या आयुष्यात सुखाचा क्षण, चिमुकल्या पावलांनी नवा पाहुणा येणार, 38 व्या वर्षी आई होणार

Drashti Dhami Announce Pregnancy : लग्नाच्या 9 वर्षांनंतर अभिनेत्रीच्या आयुष्यात सुखाचा क्षण, चिमुकल्या पावलांनी नवा पाहुणा येणार, 38 व्या वर्षी आई होणार

Premachi Goshta Serial Update : हर्षवर्धनच्या जाळ्यात अडकणार सावनी, काय करणार सागर-मुक्ता; 'प्रेमाची गोष्ट'मध्ये आज काय पाहणार?

Premachi Goshta Serial Update :  हर्षवर्धनच्या जाळ्यात अडकणार सावनी, काय करणार सागर-मुक्ता; 'प्रेमाची गोष्ट'मध्ये आज काय पाहणार?

Marathi Serial Updates Drama Juniors: 'ड्रामा ज्युनियर्स'च्या ऑनएअरची वेळ ठरली, 'झी मराठी'वरील कोणत्या मालिकेची बदलणार वेळ?

Marathi Serial Updates Drama Juniors: 'ड्रामा ज्युनियर्स'च्या ऑनएअरची वेळ ठरली, 'झी मराठी'वरील कोणत्या मालिकेची बदलणार वेळ?

Marathi Serial Update : 'संजनाची तक्रार करुन काय होणार, 300 शब्दांचा निबंध लिहून सुटेल ती'; आई कुठे... च्या नव्या प्रोमोवर प्रेक्षक संतापले 

Marathi Serial Update : 'संजनाची तक्रार करुन काय होणार, 300 शब्दांचा निबंध लिहून सुटेल ती'; आई कुठे... च्या नव्या प्रोमोवर प्रेक्षक संतापले 

Premachi Goshta Serial Update : सागर-मुक्ता सावनीला सांगणार हर्षवर्धनचे सत्य, 'प्रेमाची गोष्ट' मध्ये आज काय पाहाल?

Premachi Goshta Serial Update :  सागर-मुक्ता सावनीला सांगणार हर्षवर्धनचे सत्य, 'प्रेमाची गोष्ट' मध्ये आज काय पाहाल?

टॉप न्यूज़

Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला

Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला

पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस

पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस

Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल

Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार