एक्स्प्लोर
आयपीएलकडे प्रेक्षकांची पाठ, 'नागिन' मालिका अव्वल

मुंबई : महाराष्ट्रातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचे सामने राज्याबाहेर खेळवण्यावरुन खडाजंगी सुरु आहे. मात्र ज्यावरुन इतके वाद होत आहेत, त्या आयपीएलला फारसा टीआरपी नसल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे कलर्स वाहिनीवरील 'नागिन' मालिकेलाही आयपीएलपेक्षा चांगले रेटिंग्स मिळत आहे. टी 20 विश्वचषकामुळे नागिन मालिका गेल्या काही काळापासून दुसऱ्या क्रमांकावर होती. मात्र या मालिकेने आता पुन्हा पहिल्या क्रमांकावर उडी घेतली आहे.
दुसऱ्या क्रमांकावर स्टार प्लस वाहिनीवरील 'ये है मोहब्बते' ही मालिका, तर झी टीव्हीवरील 'कुमकुम भाग्य' ही मालिका तिसऱ्या क्रमांकावर आहे. ये है मोहब्बते मध्ये विमान हायजॅकिंगच्या कथेतून सात वर्ष एकमेकांपासून दुर असलेल्या रमण आणि इशिता या मुख्य जोडीला पुन्हा एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. बार्क संस्थेने दिलेल्या रेटिंग्जच्या आधारे ही आकडेवारी काढण्यात आली आहे. आजपासून कपिल शर्माचा नवा शो सोनी वाहिनीवर रुजू होत आहे. त्यामुळे याचा परिणाम लवकरच पाहायला मिळू शकतो.
दुसऱ्या क्रमांकावर स्टार प्लस वाहिनीवरील 'ये है मोहब्बते' ही मालिका, तर झी टीव्हीवरील 'कुमकुम भाग्य' ही मालिका तिसऱ्या क्रमांकावर आहे. ये है मोहब्बते मध्ये विमान हायजॅकिंगच्या कथेतून सात वर्ष एकमेकांपासून दुर असलेल्या रमण आणि इशिता या मुख्य जोडीला पुन्हा एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. बार्क संस्थेने दिलेल्या रेटिंग्जच्या आधारे ही आकडेवारी काढण्यात आली आहे. आजपासून कपिल शर्माचा नवा शो सोनी वाहिनीवर रुजू होत आहे. त्यामुळे याचा परिणाम लवकरच पाहायला मिळू शकतो. आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
निवडणूक
मुंबई























