Varsha Usgaonkar : 'तंगड्या वर करुन झोपता...', निक्कीच्या 'त्या' वक्तव्यावर वर्षाताई बरसल्या, म्हणाल्या...
Varsha Usgaonkar : निक्कीने वर्षाताईंसाठी घरात जी भाषा वापरली त्यावर आता वर्षा उसगांवकरांचीही प्रतिक्रिया समोर आलेली आहे.
Varsha Usgaonkar : निक्की तांबोळीने (Nikki Tamboli) पहिल्याच आठवड्यात बिग बॉसच्या घरातील (Bigg Boss Marathi new Season) स्पर्धकांचा पाणउतारा करायला सुरुवात केली होती. त्यातच तिने अभिनेत्री वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) यांच्यासाठी वापरलेल्या शब्दांवर सोशल मीडियावरही प्रेक्षक आणि कलाकारांनीही तीव्र संताप व्यक्त केला. तसेच भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊनेही (Ritiesh Deshmukh) तिची चांगलीच शाळा घेतली. इतकच नव्हे तर तिला वर्षाताईंची माफी देखील मागायला सांगितली होती.
दरम्यान ग्रँड फिनालेच्या दारावर वर्षा उसगांवकरांचा बिग बॉसच्या घरातला प्रवास संपला. त्यामुळे आता घरातून बाहेर आल्यानंतर वर्षाताईंनी घरातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. तसेच त्यांनी निक्कीने त्यांच्यासाठी वापरलेल्या शब्दांवरही तीव्र संताप व्यक्त केला आहे.
वर्षा उसगांवकरांनी व्यक्त केला तीव्र संताप
वर्षा उसगांवकरांनी राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये यावर भाष्य केलं आहे. वर्षा उसगांवकरांनी म्हटलं की, 'ती जेव्हा मला म्हणाली ती तुम्ही तंगड्या वर करुन झोपता, ते निश्चितच मला खटकलं. मला असं वाटलं की, काय ही मुलगी बोलतेय. अशा प्रकारची भाषा वापरायची, हे वर्षा उसगांवकर म्हणून नाही तर एक ज्येष्ठ व्यक्ती म्हणून ते खटकलं.'
तसेच वर्षा उसगांवकरांनी म्हटलं की, निक्कीच्या बाबतीत तुमचं रोखठोक मत काय? यावर वर्षा उसगांवकरांनी म्हटलं की, मला घरात जातानाच रितेशने विचारलं होतं की, की वर्षा उसगांवकर म्हणून तुम्हाला काय अपेक्षा आहेत. त्यावर मी त्यांना सांगितलं होतं की, मी वर्षा उसगांवकर म्हणून नाही तर कोरी पाटी होऊन जाणार आहे. पण त्यांच्यातली एक ज्येष्ठ व्यक्ती म्हणून जो मान देण्यात यावा तेवढाच मान मला अपेक्षित आहे आणि तो जेव्हा ठेवला जात नाही तेव्हा वाईट वाटतं.
View this post on Instagram
View this post on Instagram
ही बातमी वाचा :
Genelia Deshmukh : मध्यरात्रीच रितेशने जेनेलियासोबत ब्रेकअप केलं अन्... नेमकं काय घडलं होतं?