'सावळ्याची जणू सावली' मालिकेत ट्वीस्ट अँड टर्न्स; कॉन्सर्टमध्ये सावलीनं सारंगसमोर व्यक्त केल्या मनातल्या भावना, तर अस्मीची पुन्हा एन्ट्री
Savalyachi Janu Savali Serial Track : सारंग आणि सावलीची मैत्री फुलताना अस्मीच्या येण्यानं कोणतं वादळं येणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Savalyachi Janu Savali Serial Track : 'सावळ्याची जणू सावली' (Savalyachi Janu Savali) मालिकेत सारंग आणि सावलीची मैत्री फुलताना दिसत आहे. यासाठी सारंग एक खास गिफ्ट सावलीला देतो, ज्यामुळे त्यांचं नातं आणखी घट्ट होतं. अशातच आता सारंगच्या आयुष्यात अस्मीची पुन्हा एन्ट्री होणार आहे. त्यामुळे आता सारंग आणि सावलीची मैत्री फुलताना अस्मीच्या येण्यानं कोणतं वादळं येणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अमृता आणि बबलू सारंग आणि सावलीच्या वागण्यात बदल जाणवून त्यांची सावलीची छेड काढतात, सावलीला सारंगसोबत असताना वेगळं वाटायला लागतं, पण ती स्वतःच्या भावना व्यक्त करू शकत नाही. सोहम तारासाठी एका स्पेशल कॉन्सर्टमध्ये, अनोख्या पद्धतीनं ग्रँड प्रपोजल करायचा विचारात आहे. सारंगला या इव्हेंटबद्दल समजतं आणि तो स्वतः भैरवीला विनंती करतो की, सावलीला त्या दिवशी सुट्टी द्यावी. भैरवी त्याला नकार देऊ शकत नाही. सारंग सावलीला कॉन्सर्टला घेऊन असल्याचं सांगतो. त्याची इच्छा आहे की, सावलीनं संपूर्ण कार्यक्रम त्याच्या सोबतच राहावं.
बबलू आणि अमृता सावलीला सांगतात की, तिनं याच कॉन्सर्टमध्ये सारंगसमोर आपलं प्रेम व्यक्त करावं. भैरवी सावलीला तिच्या कम्फर्ट झोनच्या बाहेरचं वेगळं गाणं गाण्याचं चॅलेंज देते, ज्यामुळे ती संभ्रमात पडते. सारंग सावलीला कॉन्सर्टला घेऊन जातो, पण सारंगची इच्छा आहे की, तिनं शेवटपर्यंत त्याच्यासोबतच राहावं. पण कार्यक्रम सुरू असताना परफॉर्मन्सच्या तयारीसाठी सावली गुपचूप बॅकस्टेज जाते. मंचावर गाणं गात असताना सावलीला आपल्याच भावनांचा उलगडा होता.
View this post on Instagram
सारंगला गर्दीत अस्मी दिसते आणि तो तिला शोधण्याचा प्रयत्न करतो. सावली त्याच्या वागण्यानं काळजीत पडते. यातच अचानक लाईट जातात आणि त्याला जुना अपघात आठवून भीतीचा झटका बसतो. सारंगची अवस्था पाहून हादरलेली सावली मागचा पुढचा विचार न करता, सारंगला घट्ट मिठी मारते, त्याला शांत करताना भावनांच्या भरात ती त्याच्या समोर अशा गोष्टीची कबुली देते, जी ऐकून सारंग काय बोलेल याची कल्पनाच करता येणार नाही.
दरम्यान, सारंगच्या आयुष्यात अस्मीची पुन्हा झालेली एन्ट्री आणि दुसरीकडे सावलीसोबतची फुलणारी मैत्री, मालिकेत कोणता ट्वीस्ट येणार? अस्मी कोणतं नवं वादळ घेऊन आली आहे? सावलीनं कोणत्या गोष्टीची कबुली सारंगला दिली आहे? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























