Tuzech Mi Geet Gaat Aahe: निरंजनने क्षमा,विजय आणि आजीला सांगितलं वैदही सारख्या दिसणाऱ्या बाईविषयी; पाहा 'तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेचा प्रोमो
तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe) या मालिकेच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, निरंजनने क्षमा,विजय आणि आजी यांना वैदही सारख्या दिसणाऱ्या बाईविषयी सांगितलं आहे.
Tuzech Mi Geet Gaat Aahe: छोट्या पडद्यावरील तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe) मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. नुकताच जुझेतुझेच मी गीत गात आहे या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, निरंजनने क्षमा,विजय आणि आजी यांना वैदही सारख्या दिसणाऱ्या बाईविषयी सांगितलं आहे.
काही दिवसांपूर्वी तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत मंजुळाची एन्ट्री झाली आहे. मंजुळा ही वैदेही सारखी दिसते. स्वराज आणि मंजुळा यांना काही गुंडांनी पकडले होते. त्यावेळी निरंजन आणि मल्हार हे स्वराजला वाचवायला गेले होते. गेल्या काही दिवसांपासून स्वराजचा आवाज खराब झाला आहे. पण जेव्हा मल्हार स्वराजला गुंडांपासून वाचवायला जातो, तेव्हा स्वराजच्या तोंडून बाबा हा शब्द निघतो. त्यावेळी निरंजन हा मंजुळाला पाहतो.
तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, निरंजनने क्षमा,विजय आणि आजी हे सर्व स्वराजच्या जवळ बसले आहेत. यावेळी क्षमा निरंजनला म्हणते, 'निरंजन दादा तुम्हाला असं नाही वाटतं की, स्वराजच्या आईचा आशीर्वाद तिच्या पाठिशी असल्यामुळे तिचा आवाज परत आला. ' यावर निरंजन म्हणतो, 'फक्त स्वराजचा आवाजचं नाही. तर वैदेही सुद्धा परत आली आहे.'
पाहा प्रोमो:
View this post on Instagram
'तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेतील कलाकार
मल्हार कामत ही भूमिका अभिनेता अभिजीत खांडकेकर हा साकारतो तर स्वरा उर्फ स्वराज ही भूमिका अवनी तायवाडे ही साकारते. तसेच या मालिकेमध्ये मोनिका मल्हार कामत ही भूमिका प्रिया मराठे ही साकारते आणि स्वराची आई म्हणजेच वैदेही मल्हार कामत ही भूमिका अभिनेत्री ऊर्मिला कानेटकर ही साकारते. मंजुळा हे भूमिका देखील ऊर्मिला साकारते. 'तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या मालिकेमधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: