Tula Japnar Ahe : आणखी एका हिंदी मालिकेचा रिमेक, 'तुला जपणार आहे'च्या प्रोमोवर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया
Tula Japnar Ahe is Hindi Serial Remake : 'तुला जपणार आहे' ही आगामी मालिका हिंदी मालिकेचा रिमेक असल्याची प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली आहे.
Tula Japnar Ahe Tv Series : 'तुला जपणार आहे' मालिकेचा प्रोमो नुकताच समोर आला आहे. प्रोमोसमोर आल्यानंतर ही मालिका हिंदी मालिकेचा रिमेक असल्याची प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली आहे. स्वतःच्या मुलीच्या रक्षणासाठी अग्निदिव्याला सामोरी जाणाऱ्या आईची कथा प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे. झी मराठीवर लवकरच नवी मालिका 'तुला जपणार आहे' सुरु होणार आहे. अभिनेत्री प्रतिक्षा शिवणकर साकारणार झी मराठीवरील आगामी 'तुला जपणार आहे' मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. 'जिवाची होतीया काहिली' मालिकेत अभिनेत्री प्रतिक्षा शिवणकर दिसली होती.
आणखी एका हिंदी मालिकेचा रिमेक
झी मराठीवरील आगामी 'तुला जपणार आहे' मालिकेत अभिनेता महिमा म्हात्रे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेत्री रुचा गायकवाड साकारणार झी मराठी वाहिनीवरील आगामी 'तुला जपणार आहे' मालिकेत मुख्य खलनायिकेची भूमिका साकारणार आहे. 'रंग माझा वेगळा' फेम दीपीका म्हणजेच तनिष्का विषे झी मराठी वाहिनीवरील आगामी 'तुला जपणार आहे' या मालिकेत दिसण्याची दाट शक्यता आहे.
'तुला जपणार आहे' मालिका हिंदी मालिकेचा रिमेक
ज्येष्ठ अभिनेते मिलिंद पाठक आणि 'भाग्य दिले तू मला' फेम अभिनेते निलेश रानडे साकारणार झी मराठीवरील आगामी 'तुला जपणार आहे' मालिकेत महत्वपूर्ण भुमिका साकारताना दिसतील. 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्री पुर्णिमा तळवलकर आणि अभिनेत्री सिद्धीरुपा कर्माकर यादेखील आगामी 'तुला जपणार आहे' मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. याशिवाय अभिनेत्री ॠचा गायकवाड आणि अभिनेत्री महिमा म्हात्रे या देखील 'तुला जपणार आहे' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसतील. सुप्रसिध्द पार्श्वगायिका सावनी रविंद्र हिच्या सुमधूर आवाजात या मालिकेचं शीर्षकगीत ऐकायला मिळणार आहे.
'तुला जपणार आहे'च्या प्रोमोवर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया
दरम्यान, 'तुला जपणार आहे' मालिकेचा प्रोमो समोर आल्यापासूनच प्रेक्षकांना या मालिकेची उत्सुकता लागली आहे. या मालिकेचा प्रोमो समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी या मालिकेची तुलना हिंदी मालिकेसोबत केली आहे. तुला जपणार आहे' मालिका हिंदी मालिकेचा रिमेक असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. मालिकेच्या प्रोमोवर कमेंट करताना नेटकऱ्यांनी म्हटलं की, "ही मालिकी राधा मोहनसारखीच आहे". आणखी एकाने लिहिलंय, "हा तर राधामोहनचा रिमेक आहे".