एक्स्प्लोर

Tu Chal Pudha : 'तू चाल पुढं' रोमांचक वळणावर; सुरू होतोय अश्विनीचा ग्लॅमरस प्रवास!

Tu Chal Pudha : 'तू चाल पुढं' या मालिकेत अश्विनीच्या ग्लॅमरस प्रवासाला सुरुवात होणार आहे.

Tu Chal Pudha : 'तू चाल पुढं' (Tu Chal Pudha) या मालिकेच्या माध्यमातून दीपा परबने 14 वर्षानंतर पुन्हा एकदा मालिकाविश्वात कमबॅक केलं आहे. एका गृहिणीने पाहिलेल्या मोठ्या स्वप्नांची गोष्ट या मालिकेत दाखवण्यात आली आहे. आता ही मालिका रोमांचक वळणावर आली असून मालिकेत आता अश्विनीचा ग्लॅमरस प्रवासाला सुरुवात होणार आहे. 

'तू चाल पुढं' या मालिकेचा प्रोमो आऊट झाला असून प्रोमोमध्ये प्रेक्षकांनी अश्विनीचा ग्लॅमरस लूक पाहिला आहे. प्रोमोमध्ये सगळ्यांनी ग्लॅमरस अश्विनीला पाहिलं, अश्विनीची ही भूमिका सर्वसमावेशक आहे. कुटुंबातील सदस्य त्यांचे स्वभाव, तिचं घराप्रती कर्तव्य या सर्व गोष्टींची सांगड घालून समंजसपणे घरातील नाती सांभाळून घेणाऱ्या अश्विनीचा नवीन प्रवास सुरू होत आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

अश्विनी 'मिस. इंडिया 2023' मध्ये भाग घेऊन एका नवीन प्रवासाकडे वळणार आहे. अश्विनीला या नवीन रूपात पाहणे रोमांचक असणार आहे. अश्विनीलादेखील त्यांच्या नवीन घरासाठी आणि कुटुंबासाठी खारीचा वाटा उचलण्याची  इच्छा आहे. त्यामुळे ती वेगवेगळे प्रयत्न करत आहे. ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी ठरत आहे. 

'तू चाल पुढं'चा रंगणार 1 तासाचा विशेष भाग!

'तू चाल पुढं' या मालिकेचा आता एक तासाचा विशेष भाग रंगणार आहे. येत्या रविवारी म्हणजेच 29 जानेवारी 2023 रोजी या मालिकेचा संध्याकाळी सात वाजता झी मराठी विशेष भाग रंगणार आहे. मालिका विश्वात गेल्या काही दिवसांत वेगवेगळे प्रयोग होत आहेत. 'तू चाल पुढं' या मालिकेच्या माध्यमातून एक वेगळा विषय मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

दीपा परबचं पुनरागमन!

‘दामिनी’ या सुप्रसिद्ध मालिकेतील दीपाच्या अविस्मरणीय भूमिकेनंतर ती पुन्हा एकदा मराठी मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत दिसतआहे. दीपाने मधल्या काळात अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं. पण, बऱ्याच वर्षांनी दीपा आता मराठी टेलिव्हिजनवर प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. ‘तू चाल पुढं’ या मालिकेत दीपा परब (Deepa Parab) प्रमुख भूमिकेत दिसत आहे. दीपा ही अभिनेता अंकुश चौधरीची पत्नी आहे.

संबंधित बातम्या

Tu Chal Pudha : पुन्हा एकदा नकारात्मक भूमिकेत दिसणार धनश्री काडगावकर, 'तू चाल पुढं'मध्ये दिसणार ‘या’ भूमिकेत!

महत्त्वाच्या बातम्या

Kushal Badrike On Rahul Deshpande: भाऊ कदमांनी 'तो' प्रश्न विचारताच राहुल देशपाडेंना राग अनावर, अन्...; कुशल बद्रिकेनं सांगितला 'चला हवा येऊ द्या'चा 'तो' किस्सा
भाऊ कदमांनी 'तो' प्रश्न विचारताच राहुल देशपाडेंना राग अनावर, अन्...; कुशल बद्रिकेनं सांगितला 'चला हवा येऊ द्या'चा 'तो' किस्सा
Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad khandekar: 'खांड्या... हे खूपच झालं', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकर कुणावर संतापला? कमेंटवर रिप्लाय देत म्हणाला...
'खांड्या... हे खूपच झालं', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकर कुणावर संतापला? कमेंटवर रिप्लाय देत म्हणाला...
Amchya Ladkya Naik Bai Star Pravah Serial Track: प्रसिद्ध अभिनेत्रीचं 8 वर्षांनी स्टार प्रवाहवर कमबॅक; 'आमच्या लाडक्या नाईक बाई' नव्या मालिकेत साकारणार मुख्य भूमिका
प्रसिद्ध अभिनेत्रीचं 8 वर्षांनी स्टार प्रवाहवर कमबॅक; 'आमच्या लाडक्या नाईक बाई' नव्या मालिकेत साकारणार मुख्य भूमिका
Riteish Deshmukh, Genelia Deshmukh Supports CJP Student Protest: महाराष्ट्राचे दादा-वहिनी तरुणांसाठी मैदानात, रितेश-जेनेलियाचा आंदोलक विद्यार्थ्यांना उघड पाठिंबा, म्हणाले, 'चला आपण...'
महाराष्ट्राचे दादा-वहिनी तरुणांसाठी मैदानात, रितेश-जेनेलियाचा आंदोलक विद्यार्थ्यांना उघड पाठिंबा, म्हणाले, 'चला आपण...'

व्हिडीओ

Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rain Update: पुढील 4 ते 5 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर कोकण, विदर्भाला ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात 'पाणीबाणी', पुणे वेधशाळेचा अंदाज
पुढील 4 ते 5 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर कोकण, विदर्भाला ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात 'पाणीबाणी', पुणे वेधशाळेचा अंदाज
Sharad Pawar : एकीकडे राहुल गांधींनी मोंदींना निवासस्थानी घेरलं, दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी शरद पवार मैदानात, थेट जंतम मंतर गाठलं आणि...
एकीकडे राहुल गांधींनी मोंदींना निवासस्थानी घेरलं, दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी शरद पवार मैदानात, थेट जंतम मंतर गाठलं आणि...
Sonam Wangchuk: मोठी बातमी: सोनम वांगचूक यांच्याबाबत दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, मेदांता रुग्णालयात हलवण्याचे आदेश
मोठी बातमी: सोनम वांगचूक यांच्याबाबत दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, मेदांता रुग्णालयात हलवण्याचे आदेश
Maharashtra Weather Update: मुंबईसह पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट; पुढील पाच दिवस जोरदार पावसाचे इशारे; IMD चा महत्वाचा अंदाज 
मुंबईसह पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट; पुढील पाच दिवस जोरदार पावसाचे इशारे; IMD चा महत्वाचा अंदाज 
CJP Protest in Mumbai : CJP आंदोलनावर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; 8 पोलीस ठाण्यांत गुन्हे, 900 हून अधिक आंदोलकांवर FIR दाखल
CJP आंदोलनावर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; 8 पोलीस ठाण्यांत गुन्हे, 900 हून अधिक आंदोलकांवर FIR दाखल
Narendra Modi : CJP च्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,'युवकांच्या भविष्याशी खेळ खपवून घेणार नाही...'
CJP च्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,'युवकांच्या भविष्याशी खेळ खपवून घेणार नाही...'
Mumbai Crime News: पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलल्याचा राग; पतीने थेट पत्नीचं आयुष्य संपवलं, घटनेनं मुंबईत खळबळ
पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलल्याचा राग; पतीने थेट पत्नीचं आयुष्य संपवलं, घटनेनं मुंबईत खळबळ
Raj Thackeray on Delhi LathiCharge: दिल्लीत पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं, पंतप्रधान मोदींबाबत महत्त्वाची टिप्पणी
दिल्लीत पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं, पंतप्रधान मोदींबाबत महत्त्वाची टिप्पणी
Embed widget