TMKOC : 'तारक मेहता'मधील 'सोनू' बांधणार लग्नगाठ, 'या' दिवशी बॉयफ्रेंडसोबत अडकणार विवाहबंधनात
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : तारक मेहता मालिकेतील सोनू म्हणजेच झील मेहता तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असून तिने लग्नाची तारीख जाहीर केली आहे.
Jheel Mehta Announced Her Wedding Date : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिकांपैकी एक आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिका मागील 16 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहे. ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात आपलं खास स्थान निर्माण केलं आहे. या कलाकारांबाबत जाणून घेण्यासही चाहते फार उत्सुक असतात. आता 'तारक मेहता'मधील सोनू लग्नबंधनात अडकणार असल्याची बातमी समोर आली आहे. तारक मेहता फेम सोनू म्हणजे अभिनेत्री झील मेहता हिने तिच्या लग्नाची तारीख चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
'तारक मेहता'मधील 'सोनू' बांधणार लग्नगाठ
तारक मेहता फेम अभिनेत्री झील मेहता हिने तिच्या लग्नाच्या तारखेची घोषणा (Jheel Mehta Wedding Announcement) केली आहे. झील मेहता 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेमध्ये छोट्या सोनूच्या भूमिकेत झळकली होती. आत्माराम भिडे आणि माधवी भिडे यांची मुलगी सोनू भिडे हिची भूमिका तिने साकारली होती. या मालिकेतील इतर कलाकारांप्रमाणे झील मेहतालाही या मालिकेमुळे प्रसिद्धी आणि चाहत्यांचं प्रेम मिळालं. आता झील मेहताने तिच्या आयुष्यातील गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. झील मेहता तिच्या बॉयफ्रेंडसोबत लवकरच लग्न करणार आहे. या कपलच्या लग्नाची तारीखही ठरली आहे.
'या' दिवशी बॉयफ्रेंडसोबत अडकणार विवाहबंधनात
अभिनेत्री झील मेहता सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. झील मेहता लवकरच तिच्या लाँग टाइम बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार आहे. हे दोघे अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत असून काही महिन्यांपूर्वीच तिचा बॉयफ्रेंड आदित्यने तिला प्रपोझ केलं होतं. तेव्हापासून हे कपल चर्चेत आलं. आता झील मेहतानेही तिच्या लग्नाची तारीख जाहीर केली आहे. झील मेहता 28 डिसेंबरला आदित्य दुबेसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. अलीकडेच टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत झील मेहताही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
अभिनेत्री झील मेहता बॉयफ्रेंडसोबत लवकरच करणार लग्न
झील मेहताने सांगितलं की, ती या दिवसाची खूप दिवसांपासून वाट पाहत होती आणि आता हे सर्व तिला अविश्वसनीय वाटत आहे. हे लग्न परंपरा आणि आधुनिक शैलीचे मिश्रण असणार आहे, असंही तिने सांगितलं. झीलने पुढे म्हटलं की, "हा एक मजेशीर प्रवास होता आणि या टप्प्यावर मी खूप शांत आहे. येत्या नवीन वर्षात आम्ही पती-पत्नी बनणार आहोत. आमचं लग्न हा एक जिव्हाळ्याचा सोहळा असणार आहे आणि कुटुंबाव्यतिरिक्त, फक्त काही जवळचे त्यात मित्र उपस्थित राहतील".
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :