एक्स्प्लोर

'मराठी बिग बॉस'च्या घरात कोण जाणार?

एबीपी माझाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश श्रुंगारपुरे, पुष्कर जोग, उषा नाडकर्णी, मेघा धाडे, सुशांत शेलार, रेशम टिपणीस, अास्ताद काळे ही मराठीतली प्रसिद्ध नावं या मालिकेत असण्याची शक्यता आहे.

मुंबई : बिग बॉस…भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासातला सगळ्यात वादग्रस्त शो…हाच शो आता मराठीत येत आहे. महेश मांजरेकर बिग बॉसच्या भूमिकेत आहेत, हे आतापर्यंत तुम्हाला समजलंच असेल. आता त्यात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची यादी एबीपी माझाच्या हाती लागली आहे. या घरात जाणारी पहिल्या स्पर्धक आहेत उषा नाडकर्णी… उषा नाडकर्णी त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी जरा जास्तच प्रसिद्ध आहेत. जे मनात तेच तोंडात असा त्यांचा स्वभाव कधी कधी इतरांना चांगलाच अडचणीत आणतो. त्यांच्या असण्याने घरातलं वातावरण गरम राहाणार यात शंका नाही. या यादीतलं दुसरं नाव आहे अभिनेता राजेश श्रृंगारपुरे. राजेश नुकताच डॅडी या बॉलिवूडपटात झळकला होता. त्याच्या कामाचं कौतुकही झालं होतं. हाच राजेश बिग बॉसच्या घरात काय करामत करतोय ते लवकरच कळेल. बिग बॉसच्या घरात जाणारी तिसरी व्यक्ती आहे सुशांत शेलार. मनोरंजन विश्वात जिथे जिथे राजकारण असतं तिथे तिथे सुशांत शेलार हे नाव असतंच असतं आणि बिग बॉसचं घर म्हणजे तर राजकाराणाचा महाआखाडा. कदाचित म्हणूनच बिग बॉसने सुशांतची निवड केली असावी. स्पर्धकांच्या यादीतलं आणखी एक नाव म्हणजे अभिनेत्री रेशम टिपणीस. बोल्ड अँड बिनधास्त अशी रेशमची ओळख. त्याचा फायदा तिला या शोमध्ये कसा होतो ते 15 एप्रिलनंतर कळेल. आजवर अनेक मालिकांमधून घराघरात पोहोचलेला आस्ताद काळे आता बिग बॉसच्या घरात जायला सज्ज झाला आहे. मालिकेच्या शूटिंगमधून ब्रेक घेत आस्तादने बिग बॉसच्या घराचा रस्ता धरला आहे. मराठी बिग बॉसच्या घरात दिसणारी आणखी एक तारका आहे  मेघा धाडे. अभिनेत्री म्हणून मेघाने आजवर छाप पाडण्यासारखं काही केलेलं नाही. मराठी बिग बॉस तिच्यासाठी सर्वोत्तम संधी असू शकते. याशिवाय शेफ विष्णू मनोहर आणि शेफ पराग कान्हेरे यांच्या नावाचीही चर्चा आहे. या शोमध्ये 15 स्पर्धक असतील त्यातल्या या सात स्पर्धकांची नावं एबीपी माझाच्या हाती लागलेली आहेत. उर्वरीत नावांमध्ये आणखी काय काय सरप्राईजेस असतील ते लवकरच कळेल. 15 एप्रिलपासून मराठी बिग बॉसच्या पर्वाला सुरुवात वादग्रस्त कार्यक्रमांच्या यादीत अग्रस्थानी येणाऱ्या ‘बिग बॉस’ची लोकप्रियता अनेकांना माहित आहे. हिंदीमध्ये या ‘बिग बॉस’ची अनेक पर्व पार पडली. त्यानंतर ‘बिग बॉस’च्या दाक्षिणात्य अवतारालाही चांगला प्रतिसाद मिळाला. आता याच ‘बिग बॉस’चा मराठी अवतार येत्या 15 एप्रिलपासून ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर सुरु होत आहे. नियम मोडल्यास हिंदी बिग बॉसमध्ये 50 लाख रुपये दंड होता. मात्र मराठीत तो तब्बल दोन कोटी रुपये ठेवण्यात आला आहे. त्यामुळे स्पर्धक सहभाग घेण्यापूर्वी विचार करुनच निर्णय घेतील हे मात्र नक्की. हिंदी बिग बॉसमध्ये टोकाचे वाद, शिवीगाळ अशा प्रकारांमुळे ही मालिका नेहमीच वादात राहिली. मात्र मराठी कलाकारांची संस्कृती वेगळी आहे. त्यामुळे या पहिल्याच पर्वात काय होतं, याबाबत प्रेक्षकांना मोठी उत्सुकता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Gashmeer Mahajani Post Viral: 'माझा आवडता प्राणी- माझे बाबा'; गश्मीर महाजनीची 'ती' इन्स्टा पोस्ट चर्चेत
'माझा आवडता प्राणी- माझे बाबा'; गश्मीर महाजनीची 'ती' इन्स्टा पोस्ट चर्चेत
Nana Patekar Comment On Madhuri Dixit: 'तुला खूप मिळाले असतील मला एकच...'; पुरस्कार सोहळ्यात सर्वांसमोर नाना पाटेकरांचा माधुरीला 'तो' प्रश्न, नेमकं काय घडलं?
'तुला खूप मिळाले असतील मला एकच...'; पुरस्कार सोहळ्यात सर्वांसमोर नाना पाटेकरांचा माधुरीला 'तो' प्रश्न, अन्...
Pranit More Comeback After Controversy: 370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
The Alliance Season 1: 'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?
'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
Rekha Fitness Transformation:'रेखा आधी जाड होती, पण नंतर..' रेखाच्या भावोजींनी सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा; म्हणाले..
'रेखा आधी जाड होती, पण नंतर..' रेखाच्या भावोजींनी सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा; म्हणाले..
Mumbai Local Train Marathi News: लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
Multibagger Stock : संरक्षण क्षेत्रातील मल्टीबॅगर स्टॉकमध्ये घसरण, कंपनी लाभांश देणार, रेकॉर्ड डेट घोषित
संरक्षण क्षेत्रातील मल्टीबॅगर स्टॉकमध्ये घसरण, कंपनी लाभांश देणार, रेकॉर्ड डेट घोषित
दुचाकीला वाचवण्याचा प्रयत्न, चालकाचं नियंत्रण सुटलं, कार थेट विहीरीत कोसळली, दोन महिलांचा मृत्यू
दुचाकीला वाचवण्याचा प्रयत्न, चालकाचं नियंत्रण सुटलं, कार थेट विहीरीत कोसळली, दोन महिलांचा मृत्यू
Embed widget