Me Honar Superstar : 'मी होणार सुपरस्टार...आवाज कुणाचा महाराष्ट्राचा'च्या मंचावर येणार अनन्या सिनेमाची टीम; रंगणार विशेष भाग
Me Honar Superstar : 'अनन्या' सिनेमा 23 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Me Honar Superstar : प्रताप फड (Pratap Fad) दिग्दर्शित 'अनन्या' सिनेमा सध्या चर्चेत आहे. 23 जुलैला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात हृता दुर्गुळे (Hruta Durgule) ‘अनन्या’ ही व्यक्तिरेखा साकारत असून तिची जिद्द आणि जीवनाकडे बघण्याची सकारात्मकता यात पाहायला मिळणार आहे. सध्या या सिनेमाचे प्रमोशन सुरू असून 'मी होणार सुपरस्टार...आवाज कुणाचा महाराष्ट्राचा' या कार्यक्रमाच्या आगामी भागात 'अनन्या' (Ananya) सिनेमाची टीम हजेरी लावणार आहे.
'मी होणार सुपरस्टार...आवाज कुणाचा महाराष्ट्राचा' या कार्यक्रमाचा अनन्या विशेष भाग या आठवड्यात होणार आहे. या आठवड्यात शनिवारी आणि रविवारी रात्री नऊ वाजता प्रेक्षकांना हा विशेष भाग पाहायला मिळणार आहे. या विशेष भागाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 'मी होणार सुपरस्टार...आवाज कुणाचा महाराष्ट्राचा' हा कार्यक्रमाचा आनंद 'अनन्या' सिनेमाची टीम घेणार आहे.
View this post on Instagram
प्रताप फड दिग्दर्शित 'अनन्या' या सिनेमाची निर्मिती एव्हरेस्ट एंटरटेनमेंट, ड्रीमव्हीवर एंटरटेनमेंट आणि रवी जाधव फिल्म्स यांनी केली आहे. या सिनेमाचं लेखन दिग्दर्शक प्रताप फड यांनी केलं आहे. ध्रुव दास, रवी जाधव आणि संजय छाब्रिया यांनी या सिनेमाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे.
एकांकिका, नाटक ते सिनेमा.. असा आहे 'अनन्या'चा प्रवास
अनन्या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांना या सिनेमाची उत्सुकता लागली होती. या सिनेमाच्या माध्यमातून हृता मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. रुईया महाविद्यालयाची 'अनन्या' एकांकिका प्रचंड गाजली होती. या एकांकिकेत स्पृहा जोशी मुख्य भूमिकेत होती. त्यानंतर या एकांकिकेचे नाटकात रुपांतर करण्यात आले. नाटकात ऋतुजा बागवेने अनन्याचे पात्र साकारले होते. याआधी महिला दिनाच्या निमित्ताने 'अनन्या' सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. 'अनन्या' सिनेमात हृता दुर्गुळे अनन्या देशमुख हे पात्र साकारत आहे.
संबंधित बातम्या