एक्स्प्लोर
...म्हणून कपिल शर्मा मनोज वाजपेयीसमोर ढसाढसा रडला?
नवी दिल्ली : प्रसिद्ध विनोदवीर कपिल शर्मा आपल्या चुकांमुळे सध्या चांगल्याच अडचणीत सापडला आहे. विमानात आपल्याच शोमधील सह कलाकाराला मद्यधुंद अवस्थेत केलेल्या मारहाणीनं त्याच्या मागे संकटांचे शुक्लकाष्ट सुरु झालं आहे. या घटनेनंतर त्याचा सहकलाकारांनी कपिलवर बहिष्कार टाकल्याने, त्यांच्या विना कपिलला त्याचा शो करावा लागला. त्यातच कपिलसोबत 106 कोटींच्या कराराचं नूतनीकरण करण्यास सोनी वाहिनीने नकार दिल्याचं वृत्त आहे. यामुळे अडचणीत सापडलेला कपिल या शोनंतर मनोज वाजपेयीसमोर ढसाढसा रडल्याचं समजतं.
एका रिपोर्टनुसार, नुकतेच कपिलच्या शोमध्ये 'नाम शबाना'ची टीम आपल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आली होती. यावेळी मनोज वाजपेयी, तापसी पन्नू यांच्यासोबत कपिलला शो करायचा होता. पण या शोमध्ये काम करण्यास सुनील ग्रोवर आणि चंदन प्रभाकर यांनी नकार दिल्याने कपिलला हा शो त्यांच्याशिवाय करावा लागला.
मेलबर्नहून परतताना विमान प्रवासात कपिलने दारुच्या नशेत सुनील ग्रोवरला मारहाण केल्यानंतर सुनीलने कपिलच्या शोमध्ये काम करणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यातच त्याचे सहकलाकार अली असगर, चंदन प्रभाकर यांनीही कपिलवर बहिष्कार टाकला.
तर दुसरीकडे सोनी टीव्हीनेही कपिल शर्मासोबतचा 106 कोटींचा कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करणार नसल्याची चर्चा आहे. सध्याचा करार पुढच्या महिन्यात संपणार असल्याने चॅनेल तो वाढवण्याच्या विचारात नाही. त्यामुळे कपिलच्या अडचणी वाढल्या आहेत.
त्यातच सोमवारी शूट झालेल्या या कार्यक्रमात कपिलला सुनील ग्रोवर आणि चंदन प्रभाकर यांची साथ मिळाली नाही. यामुळे कपिलला त्यांच्या शिवाय या शोचं शूटिंग करावं लागलं. त्यामुळे आपले सहकलाकार नसलेल्या या शोच्या शूटिंगनंतर कपिल शर्मा मनोज वाजपेयीसमोर ढसाढसा रडल्याचे समजते.
दरम्यान, डॉ. महशूर गुलाटी ही व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता सुनील ग्रोव्हर आपला नवा शो घेऊन येत आहे. त्याच्या सोबत आहे बंपर म्हणजेच अभिनेता किकू शारदा. सुनील ग्रोव्हरने ही माहिती ट्विटर अकाऊण्टवरुन दिली आहे.
संबंधित बातम्या
'द कपिल शर्मा शो' बंद होण्याची चिन्हं, सुनील ग्रोव्हरचा नवा शो?
…म्हणून कपिल शर्मानं विमानातचं सुनिल ग्रोवरला धुतलं
सुनिल ग्रोव्हरसोबतच्या भांडणावर कपिल शर्माची फेसबुक पोस्ट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement