Tharla Tar Mag : सायली-अर्जुनच्या प्रेमाचा बेरंग करण्याचा प्रयत्न, सुभेदारांची सून प्रियाला तिची जागा दाखवत उधळणार डाव
Tharla Tar Mag : ठरलं तर मग या मालिकेत सध्या होळी सणाचा उत्साह आहे. पण प्रिया या सणामध्ये राडा करण्याचा प्रयत्न करते. यावेळी सायली तिला चोख उत्तर देते.
Tharla Tar Mag Episode Update : स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवर 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) या मालिकेत सध्या होळी सणाचा उत्साह पाहायला मिळत आहे. प्रताप सुभेदारांची निर्दोष सुटका झाल्यानंतर सुभेदारांच्या घरी उत्साहाचं वातावरण आहे. त्याचप्रमाणे महिपतचा खरा चेहरा सायली आणि अर्जुनने समोर आणला, त्यामुळे सायलीवरही सगळे खूश आहेत. त्याच प्रमाणे मालिकेत सायली आणि अर्जुनचं प्रेम सध्या खुलत चाललं असल्याचं पाहायला मिळतंय. पण त्यांच्या या प्रेमाचा प्रिया बेरंग करण्याचा करण्याचा प्रयत्न करते. त्यावेळी सायली प्रियाचा हा डाव उधळून लावत तिला तिची जागा दाखवून देते.
सायली जेव्हा किडनॅप होते त्यावेळी अस्मिता आणि प्रिया ती दागिने घेऊन पळून गेल्याचा बनाव रचतात. पण त्यांचा हा डाव देखील फसतो. त्यामुळे अर्जुनची आई अस्मिताला होलिका पूजनाच्या दिवशी सायलीची माफी मागायला लावते. पूर्णाआजी देखील प्रतापला सुखरुप आणि निर्दोष सोडवल्याबद्दल सायलीचे आभार मानते. त्यातच पुन्हा एकदा प्रिया अर्जुन आणि सायलीच्या नात्याचा बेरंग करण्याचा प्रयत्न करते. पण तिचा हा देखील डाव फसतो.
सायली प्रियाला दाखवणार तिची जागा
सुभेदारांच्या घरी धुळवडीचा उत्साह असतो. यावेळी अर्जुन - सायली देखील प्रेमाच्या रंगात रंगतात. त्याचवेळी प्रिया तिथे येते आणि ती अर्जुनला रंग लावते. त्याचप्रमाणे ती अर्जुनचा हात धरुन त्याला देखील स्वत:ला रंग लावायला सांगते. त्यावेळी सायली तिथे येते आणि प्रियाला म्हणते, तो माझा नवरा आहे, उगाच नको तिथे रंग उधळण्याचा प्रयत्न करु नकोस. नाहीतर तुझं थोबाड मिच रंगवेन. त्यामुळे प्रियाच्या मनात पुन्हा एकदा सुडाची भावना निर्माण होते.
खुलणार अर्जुन-सायलीच्या प्रेमाची गोष्ट
जेव्हा प्रताप सुभेदारला पोलीस अटक करुन घेऊन जात होते, त्यावेळी अर्जुन सायलीला त्याच्या मनातलं सांगणार होता. पण त्याचवेळी त्याच्या वडिलांना अटक होते. त्यामुळे अर्जुन आणि सायलीचं बोलणं अर्धवट राहतं आणि अर्जुन सायलीला काहीच सांगू शकत नाही. त्यानंतर प्रतापला सोडवण्यासाठी सायलीला अर्जुन देखील तितकीच मदत करते. त्यानंतर प्रताप निर्दोष सुटल्यानंतर सायली अर्जुनला फुलं देऊन त्याचं अभिनंदन करते. त्यावेळी अर्जुन देखील तिला थँक्यू म्हणतो.