Tharla Tar Mag : 'ठरलं तर मग' मालिकेत सुरु होणार प्रेमाचा अध्याय, अर्जुन सायलीला सांगणार का त्याच्या मनातील भावना?
Tharla Tar Mag Today Episode Highlights : ठरलं तर मग या मालिकेत महिपत शिखरेला अटक झाली असून आता सायली आणि अर्जुनच्या प्रेमाच्या प्रवासाला सुरुवात होणार असल्याचं पाहायला मिळणार आहे.
Tharla Tar Mag Today Episode Highlights : स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील ठरलं तर मग (Tharla Tar Mag) ही मालिका टीआरपीमध्ये अव्वल आहेच, पण प्रेक्षकांना देखील ही मालिका चांगलीच पसंतीस पडतेय. या मालिकेत येणाऱ्या रंजक वळणामुळे ही मालिका वाहिनीवरील सध्याची टॉप मालिका आहे. कॉन्ट्रॅक्ट मॅरेजपासून सुरु झालेल्या अर्जुन सायलीच्या प्रेमाचा प्रवास आता सुरु होणार आहे. नुकतच अर्जुनचे वडिल प्रताप सुभेदारला ड्रग्जच्या प्रकरणात अटक झाल्यानंतर सुभेदारांच्या घरात नवं संकट उभं राहिलं होतं.
महिपत शिखरेने प्रताप सुभेदारला ड्रग्जच्या प्ररकणात अडकवून नंतर स्वत:चाच त्यांचा जामीन करुन दिला होती. त्यामुळे सुभेदारांच्या घरात महिपत शिखरे सुभेदारांसाठी खूप चांगला माणूस ठरला. त्यानंतर महिपतने सायलीला देखील किडनॅप केलं. त्यामुळे ऐनवेळी अर्जुनने कोर्टात पुरावे सादर करुन प्रताप सुभेदारची निर्दोष सुटका केली. त्यानंतर सुभेदारांच्या अर्जुनच्या कामगिरीचं कौतुक होत असल्याचं पाहायला मिळतं.
खुलणार अर्जुन-सायलीच्या प्रेमाची गोष्ट
जेव्हा प्रताप सुभेदारला पोलीस अटक करुन घेऊन जात होते, त्यावेळी अर्जुन सायलीला त्याच्या मनातलं सांगणार होता. पण त्याचवेळी त्याच्या वडिलांना अटक होते. त्यामुळे अर्जुन आणि सायलीचं बोलणं अर्धवट राहतं आणि अर्जुन सायलीला काहीच सांगू शकत नाही. त्यानंतर प्रतापला सोडवण्यासाठी सायलीला अर्जुन देखील तितकीच मदत करते. त्यानंतर प्रताप निर्दोष सुटल्यानंतर सायली अर्जुनला फुलं देऊन त्याचं अभिनंदन करते. त्यावेळी अर्जुन देखील तिला थँक्यू म्हणतो.
ही विक्ट्री फक्त माझी नाही, तुमचीसुद्धा आहे. तुम्ही माझ्या सगळ्या माणसांना आपलं मानता म्हणूनच तुम्ही इतकी हिंमत केलीत, असं अर्जुन सायलीला म्हणतो. त्यामुळे आता मालिकेत अर्जुन आणि सायलीच्या नात्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात होणार असल्याचं पाहायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आता या मालिकेतील नवं वळण काय असणार आणि अर्जुन सायलीचं नातं कशाप्रकारे फुलणार याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांना लागून राहिली आहे.
View this post on Instagram