(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tharla Tar Mag Latest Update : 'ठरलं तर मग' मालिकेत मोठा ट्विस्ट, प्रतिमाची पुन्हा एन्ट्री; मायलेकीची भेट होणार?
Tharala Tar Mag Maha Episode : सायली प्रतिमाला ओळखणार? मायलेकीची भेट होणार? 'ठरलं तर मग' मालिकेचा 21 जुलै रोजी महाएपिसोड आहे.
Tharala Tar Mag New Promo : 'ठरलं तर मग' मालिका महाराष्ट्रातील लाडकी मालिका बनली आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली असून टीआरपीच्या शर्यतीतही आघाडीवर आहे. सध्या या मालिकेत अर्जुन प्रियासोबत प्रेमाचं नाटक करताना दिसत आहे. मधुभाऊंना तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी अर्जुन प्रियाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे, तर सुभेदारांच्या घरची सून व्हायची स्वप्न पाहणारी प्रिया या जाळ्यात सहज अडकत चालली आहे.
'ठरलं तर मग' मालिकेत मोठा ट्विस्ट
मधुभाऊंची तुरुंगातून सुखरुप सुटका करण्यासाठी प्रियाकडून सत्य वदवून पुरावे गोळा करण्याचा अर्जुनचा प्लॅन आहे. मधुभाऊंच्या सुटकेसाठी अर्जुनच्या या नाटकात सायलीही सामील होते. अर्जुनचा डाव सफल होताना दिसत आहे. कारण, प्रिया पुन्हा एकदा अर्जुनची स्वप्न रंगवू लागली आहे. पण, एकीकडे कॉन्ट्र्रॅक मॅरेज असलं तरी, अर्जुनबद्दल सायलीच्या मनात प्रेमाची भावना आहे. यामुळे अर्जुनची प्रियासोबतची जवळीक सायलीसाठी त्रासदायक ठरत आहे.
प्रतिमाची पुन्हा एन्ट्री
अर्जुन प्रियासोबत प्रेमाचं नाटक करत आहे. अर्जुनच्या नाटकात प्रिया अडकत आहे. प्रिया अर्जुनला भेटायला ऑफिसमध्ये जाते, त्याला फूल देते. यानंतर प्रिया अर्जुनसाठी खास डेट प्लॅन करते. दोघे डान्स करतात, मिठी मारतात. मात्र, हे सर्व पाहून सायली अस्वस्थ होते. मधुभाऊंसाठी पुरावे गोळा करण्यासाठी हे सर्व करण्याची काय गरज आहे, असं सायलीला वाटत आहे. अर्जुनची प्रियासोबतची वाढती मैत्री पाहता सायली त्याचावर रागावते. यावेळी अर्जुन तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करतो.
मायलेकीची भेट होणार?
हे सर्व चालू असताना मालिकेत आता एक मोठा ट्विस्ट येणार आहे. मालिकेत प्रतिमाची म्हणजेच सायलीच्या आईची पुन्हा एन्ट्री होणार आहे. मात्र, यावेळी तरी मायलेकीची भेट होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. प्रियामुळे रागावलेल्या सायलीची अर्जुन समजूत काढत रस्त्यावरुन जात असतो. यावेळी समोर एक बाई चालत असते, तिला टेम्पोची टक्कर बसणार इतक्याचं सायली तिला वाचवते. ही बाई म्हणजेच प्रतिमा आहे. सायली प्रतिमाला वाचवते.
पुढे काय होणार?
सायली प्रतिमाला अर्जुनची आत्या म्हणून ओळखते. सायलीच किल्लेदारांची मुलगी आणि खरी तन्वी असल्याचं सत्य फक्त प्रतिमाला ठाऊक आहे. सायली टेम्पोच्या धडकेपासून प्रतिमाला वाचवते. यावेळी प्रतिमाचा चेहरा झाकलेला असतो. पण जीव वाचवल्याबद्दल प्रतिमा सायलीचे आभार मानताना तिचा चेहरा सायलीच्या समोर येतो.
21 जुलैला ठरलं तर मग मालिकेचा महाएपिसोड
महिपतने केलेल्या हल्ल्यामुळे प्रतिमाच्या चेहऱ्यावर जखम झाली असल्याने तिला चेहरा ओळखू येत नाही, पण तिचा चेहरा कुठेतरी पाहिला असल्याचं सायलीला वाटतं आणि ती प्रतिमाला मागून थांबा अशी हाक मारते. यानंतर प्रतिमा थांबणार का? सायली प्रतिमाला ओळखणार? आणि मायलेकींची भेट होणार का? हे तुम्हाला 21 जुलै रोजीच्या विशेष भागात पाहायला मिळणार आहे.
महाएपिसोडचा प्रोमो पाहा
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :