प्रेमाची गोष्ट मालिकेतून अभिनेत्री तेजश्री प्रधानची एक्झिट, सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाली, "तुमची किंमत..."
Premachi Gosht : अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने प्रेमाची गोष्ट मालिका सोडली आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना नवी मुक्ता पाहायला मिळणार आहे.
Tejashri Pradhan Exit From Premachi Gosht : स्टार प्रवाहवरील 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका सध्याच्या आघाडीच्या टीव्ही शोपैकी एक आहे. ही मालिका अवघ्या काही दिवसांतच लोकप्रिय झाली. ही मालिका आणि यातील कलाकारांची प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. या टीव्ही शोचा मोठा चाहतावर्ग आहे. या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील मुक्ताची भूमिका साकारणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने ही मालिका सोडली आहे. तेजश्री प्रधानने या मालिकेला राम-राम केला असून त्या जागी आता दुसरी अभिनेत्री मुक्ताची भूमिका साकारताना दिसणार आहे.
'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून अभिनेत्री तेजश्री प्रधानची एक्झिट
अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने प्रेमाची गोष्ट मालिका सोडल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. तेजश्रीच्या या पोस्ट आणि त्याच्या कॅप्शनने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. तेजश्री प्रधानची ही पोस्ट काहीशी खोचक असल्याचं दिसत आहे. तेजश्री प्रधानने इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय, 'कधी कधी तुम्हाला बाहेर पडावं लागतं! तुमची किंमत जाणून घ्या आणि तुमच्या अस्तित्वाचा आदर करा'.
View this post on Instagram
तेजश्रीने आणखी एका पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, "मला माहित आहे की तू तिथून मला पाहत आहेस आणि तू माझ्यासाठी सर्व काही ठीक करशील, या विश्वासाने मी माझे आयुष्य पूर्ण जगत राहणार आहे." दरम्यामन, अभिनेत्री तेजश्री प्रधानने मालिका सोडण्यामागचं कारण समोर आलेलं नाही.
View this post on Instagram
'ही' अभिनेत्री साकारणार मुक्ताची भूमिका
अभिनेत्री तेजश्री प्रधान हीने स्टार प्रवाहवरील 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका सोडल्यामुळे अभिनेत्री स्वरदा ठिगळे ही मुक्ताच्या भुमिकेत दिसणार असल्याचं समोर येत आहे. अभिनेत्री स्वरदा ठिगळे ही प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. ती मराठीसह अनेक हिंदी मालिकांमध्येही झळकली आहे. आता स्वरदा ठिगळे तेजश्री प्रधानच्या जागी मुक्ताची भूमिका साकारणार आहे.
कोण आहे स्वरदा ठिगळे?
अभिनेत्री स्वरदा ठिगळे 2013 आलेल्या 'माझे मन तुझे झाले' मालिकेतून अभिनयाला सुरुवात केली. त्यानंतर ती 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' या मालिकेतही झळकली. तिने मराठीसह हिंदी मालिकेतही काम केलं आहे. 'सावित्री देवी कॉलेज' आणि 'प्यार के पापड' या हिंदी मालिकांमध्ये स्वरदाने काम केलं आहे. यानंतर ती पुन्हा एकदा मराठी मालिकांमध्ये झळकणार आहे.