एक्स्प्लोर

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : गोकुळधाम सोसायटीत नक्की कोण परतणार? निर्माते असित कुमार मोदींने दिले संकेत!

TMKOC : ‘टप्पू’, ‘तारक मेहता’, ‘दया बेन’, ‘बावरी’ ही पात्र सध्या मालिकेत दिसत नाहीयेत. प्रेक्षकांना आणि चाहत्यांना आता या पात्रांची आठवण येऊ लागली आहे.

TMKOC : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका गेल्या 14 वर्षांपासून प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करत आहे. या मालिकेने प्रेक्षकांना खळखळवून हसवले आहे. मात्र, सध्या ही मालिका वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आली आहे. या मालिकेतील बऱ्याच कलाकारांनी सध्या मालिकेला रामराम ठोकला आहे. मात्र, आता यातील काही पात्र आता मालिकेत परत येणार आहेत. याचे संकेत स्वतः निर्माते असित कुमार मोदी यांनी दिले आहेत.

‘टप्पू’, ‘तारक मेहता’, ‘दया बेन’, ‘बावरी’ ही पात्र सध्या मालिकेत दिसत नाहीयेत. प्रेक्षकांना आणि चाहत्यांना आता या पात्रांची आठवण येऊ लागली आहे. सध्या प्रेक्षकांकडून सातत्याने होणारी मागणी ऐकून निर्मात्यांनी देखील या पात्रांना मालिकेत परत आणण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात पात्र तीच असली, तरी कलाकार मात्र नवे असणार आहेत.

असित कुमार मोदींने दिले नव्या सदस्याच्या आगमनाचे संकेत!

नुकतेचे गोकुळधाम सोसायटीमध्ये गणपती बाप्पाचे झाले आहे. यावेळी निर्माते असित कुमार मोदी प्रेक्षकांशी संवाद साधताना दिसले. यावेळी असित कुमार मोदी म्हणाले की, ‘आपल्या लाडक्या गोकुळधाम सोसायटीत गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. आता सोनेरी पहाट झाली आहे, अंधार दूर झाला आहे. आज गणपती बाप्पाच्या आगमनाने आपल्या गोकुळधामवासीयांमध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्यावरची सर्व संकटे अंधारासारखी दूर व्हावीत हीच माझी देवाकडे प्रार्थना आहे. गणपती बाप्पाने असेच दरवर्षी यावे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. केवळ आमच्यासाठीच नाही, तर तुम्हा प्रेक्षकांसाठीही गणपती बाप्पा सर्व अडथळे दूर करून सर्वांना आनंद देवो हीच माझी प्रार्थना आहे. या गोकुळधाम सोसायटीच्या महागणपती, विघ्नहर्ता, मंगलमूर्ती गणपती बाप्पाला, एकच प्रार्थना आहे की हे गणपती, तू आमच्या तारक मेहता का उल्टा चष्माच्या संपूर्ण टीमला बुद्धी आणि शक्ती दे.’

पुढे असित कुमार मोदी म्हणाले की, 'गोकुळधाम सोसायटीत आता गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे, आता आणखी कोणीतरी येणार आहे. ज्या पात्राची तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहात, जो तुमच्या कुटुंबाचा एक भाग बनला आहे, त्या पात्राचे आगमन होणार आहे.’ अर्थात आता गोकुळधाममध्ये नक्कीच कुणाची तरी पुन्हा एन्ट्री होणार आहे.

शैलेश लोढांऐवजी ‘या’ अभिनेत्यांची नावे चर्चेत!

काही महिन्यांपूर्वी ‘तारक मेहता’ अर्थात अभिनेते शैलेश लोढा यांनी या मालिकेला अलविदा म्हटले होते. त्यांच्या एक्झिटमुळे प्रेक्षक प्रचंड नाराज झाले होते. मात्र, आता मालिकेत पुन्हा एकदा तारक मेहताची एन्ट्री होणार असल्याचे बोलले जात आहे. या पात्रासाठी सध्या दोन अभिनेत्यांची नावे चर्चेत आहेत. ‘तारक मेहता’च्या भूमिकेसाठी अभिनेते जयनीरज राजपुरोहित (Jaineeraj Rajpurohit) आणि सचिन श्रॉफ (Sachin Shroff)  यांची नावे चर्चेत आहेत.

हेही वाचा :

Shailesh Lodha : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ सोडल्यानंतर ‘या’ कार्यक्रमात दिसणार शैलेश लोढा, प्रोमो व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला!

TMKOC : ‘अरेच्चा! हे तर मला माहितच नव्हतं!’, शैलेश लोढांच्या शो सोडण्याच्या चर्चेवर ‘तारक मेहता..’च्या निर्मात्यांची पहिली प्रतिक्रिया

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वरVarsha Bunglow Meeting : शपथविधीआधी महत्वाच्या खात्यासंदर्भात ठोस निर्णय? 'वर्षा'वर खलबतंDevendra Fadnavis Maharashtra Vidhansabha : भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी निवड, देवेंद्र फडणवीस पुन्हा आलेABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 04 December 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Embed widget