आत्माराम भिडे काय करायचे? अभिनय नाही तर या क्षेत्रात काम करायचे मंदार चंदवादकर, अभिनयासाठी सोडली चांगली नोकरी
अभिनेते मंदार चंदवादकर (Mandar Chandwadkar) हे तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत 'आत्माराम भिडे' ही भूमिका साकारतात.
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका गेली 14 वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील गोकुलधाम सोसायटीचे सेक्रेटरी 'आत्माराम भिडे' या भूमिकेला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. ही भूमिका अभिनेते मंदार चंदवादकर (Mandar Chandwadkar) हे साकारतात. मंदार हे अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण करण्या आधी मेकॅनिकल इंजिनियर होते. जाणून घेऊयात मंदार यांच्याबाबत...
मंदार चंदावादकर हे दुबईमधील एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये नोकरी करत होते. त्यांना अभिनयाची आवड होती. आपण दुबईमध्ये नोकरी करण्यापेक्षा अभिनय क्षेत्रात काम केले पाहिजे, असा विचार त्यांनी केला. 2000मध्ये दुबईमधील नोकरी सोडून ते भारतात आले. भारतात आल्यानंतर त्यांनी नाटकांमध्ये काम केले. 2008 मध्ये त्यांना 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेची ऑफर आली.
28 जुलै 2008 रोजी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या मालिकेतील जेठालाल, सोढी, अंजली भाभी, दयाबेन, डॉ. हाथी आणि भिडे या भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.
View this post on Instagram
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील सोढी ही भूमिका साकारणारा कलाकार गुरुचरण सिंह तसेच सोनु भिडेचे ही भूमिका साकारणारी झील मेहता आणि टप्पू ही भूमिका साकारणारा भव्य गांधी या कलाकरांनी ही मालिका सोडण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेलता होता.
संबंधित बातम्या
Lata Mangeshkar : बचपन के दिन भी क्या दिन थे...; लता दीदींच्या आठवणीत रमल्या आशाताई
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah मालिकेच्या सेटचं रहस्य, गोकुलधाम सोसायटीचे दोन भाग, काय आहे प्रकरण?