एक्स्प्लोर
Sushant Singh Biopic | सुशांतची भूमिका पाकिस्तानी कलाकार साकारणार?
एकीकडे भारतात सुशांतच्या मृत्यूवरून जोरदार वाद निर्माण झाला असताना सुशांतवर वेबसीरीजही येत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. यामध्ये पाकिस्तानी कलाकार हसन खान सुशांतची भूमिका साकारणार असल्याचं बोललं जात आहे.
![Sushant Singh Biopic | सुशांतची भूमिका पाकिस्तानी कलाकार साकारणार? Sushant Singh Rajput Biopic Webseries Pakistan Actor Hasan Khan Confirms will play the character of Late Actor Sushant Singh Biopic | सुशांतची भूमिका पाकिस्तानी कलाकार साकारणार?](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/08/19193403/Sushant-Singh-Rajpur-Hasan-khan01.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूचं गूढ जसं वाढू लागलं आहे, त्याचा तपास जसा लांबू लागला आहे, तसं यात येणारं नाट्यमय वळण पाहता अनेकांना सुशांतच्या जगण्यावर चित्रकृती बनवण्याचा मोह होऊ लागला आहे. यापूर्वी 'सुसाईड ऑर मर्डर' अशा नावाच्या सिनेमाची जोरदार तयारी भारतात चालू आहे. आता सुशांतवर वेबसीरीजही येत असल्याच्या बातम्या आल्या आहेत. विशेष बाब अशी की पाकिस्तानी कलाकार हसन खान यात सुशांतसिंहची भूमिका करणार आहे.
एकिकडे भारतात सुशांतच्या मृत्यूवरून जोरदार वाद निर्माण झाला असताना एक पाकिस्तानी कलाकार सुशांतवर बनणाऱ्या चित्रकृतीत सुशांतची भूमिका करणं हे सुशांतच्या चाहत्यांना आवडलेलं नाही. पाकिस्तानी कलाकार हसन खान हा पाकिस्तानात नाटक आणि सिनेमात काम करतो. त्यानेच ट्वीट करून ही माहिती दिल्यानंतर हा वाद निर्माण झाला.
![Sushant Singh Biopic | सुशांतची भूमिका पाकिस्तानी कलाकार साकारणार?](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/08/19192736/Hasan-Khan-SSR-Case-580x395.jpg)
यावर अशोक पंडित यांनी तातडीने प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले, 'भारत-पाकिस्तान यांच्या दरम्यानचे सांस्कृतिक संबंध सध्या ठप्प आहेत. या दोन देशांदरम्यान कोणतंही आदानप्रदान सध्या नाही. अशावेळी अशा पद्धतीने काही कलाकृती बनणं अयोग्य आहे.'
अभिनेते शेखर सुमन यांनीही या वेबसीरीजबद्दल नापसंती दर्शवली. सुशांतबद्दल देशात मोठी सहानुभूती आहे. त्याचा तपास अद्याप चालू आहे. अशावेळी त्याच्यावर कोणतीही कलाकृती बनू नये. पाकिस्तानी कलाकार घेऊन वेबसीरीज असंणं ही दूरची बात आहे, असंतही ते म्हणाले.
![Sushant Singh Biopic | सुशांतची भूमिका पाकिस्तानी कलाकार साकारणार?](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/08/19194346/Sushant-Singh-Rajpur-Hasan-khan02-300x231.jpg)
हा वाद निर्माण झाल्यानंतर अमेझॉन प्राईमने यात खुलासा केला आहे. ट्विटरवरून उत्तर देताना ते म्हणतात, 'असा कोणताही प्रोजेक्ट अद्याप आम्ही घेतलेला नाही. त्यामुळे त्यात हसन खान असण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.' यावरून हसन खानने मात्र जोरदार फुटेज मिळवल्याचं चित्र आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- SSR Case SC Verdict | सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
- सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करणार, सुप्रीम कोर्टाचा निकाल
- अन्यायाविरुद्धचा विजय, बिहार डीजीपींची प्रतिक्रिया, कुटुंबियांकडूनही निर्णयाचं स्वागत
- सत्यमेव जयते! सुशांत सिंह प्रकरणावर पार्थ पवार यांची प्रतिक्रिया
- SSR Case SC Verdict | सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे म्हणते...
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)