(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Suraj Chavan : 'सूरज आम्हाला तुझा अभिमान', बिग बॉसच्या विजयानंतर बारामतीच्या लेकाची सुप्रिया सुळेंनी थोपटली पाठ
Suraj Chavan : सूरज चव्हाणने बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर आता राजकीय प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत.
Supriya Sule on Suraj Chavan : बिग बॉसच्या मराठीच्या पाचव्या सीझनच्या (Bigg Boss Marathi Season 5) ट्रॉफीवर सूरज चव्हाणने (Suraj Chavan) नाव कोरलं आणि गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत एकच चर्चा सुरु झालीये. बारामतीच्या या लेकावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय. त्यातच आता राजकीय प्रतिक्रिया देखील समोर येत असल्याचं पाहायला मिळतंय. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया देत सूरजचं अभिनंदन केलं आहे.
बिग बॉसच्या टॉप 6 स्पर्धकांमध्ये निक्की तांबोळी, अभिजीत सावंत,धनंजय पोवार, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर आणि सूरज चव्हाण यांचा समावेश होता. त्यामध्ये जान्हवीने 9 लाख रुपये मिळवत सर्वात आधी घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अंकिता वालावलकर हिने घराचा निरोप घेतला. तिच्या मागोमाग धनंजय पोवार यानेही बिग बॉसचा निरोप घेतला. टॉप 3 स्पर्धकांमधून निक्की तांबोळीही घराबाहेर पडली. या सगळ्यांमध्ये बाजी मारत सूरज चव्हाणने बिग बॉसची ट्रॉफी जिंकली आहे.
सुप्रिया सुळेंनी काय म्हटलं?
सुप्रिया सुळेंनी ट्विट करत म्हटलं की, 'कलर्स मराठी या वाहीनीवर सुरु असलेल्या ‘बिग बॉस’ या रियॅलिटी शो मध्ये आपल्या बारामतीचा रीलस्टार सूरज चव्हाण हा विजेता ठरला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येऊन सूरजने हे यश मिळविले. बिग बॉसच्या घरात सूरजने जनतेच्या हृदयात जागा निर्माण केली. त्याचे या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. सूरज आम्हाला तुझा अभिमान वाटतो.'
कलर्स मराठी या वाहीनीवर सुरु असलेल्या ‘बिग बॉस’ या रियॅलिटी शो मध्ये आपल्या बारामतीचा रीलस्टार सूरज चव्हाण हा विजेता ठरला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येऊन सूरजने हे यश मिळविले. बिग बॉसच्या घरात सूरजने जनतेच्या हृदयात जागा निर्माण केली. त्याचे या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन व… pic.twitter.com/GER9YtVXSF
— Supriya Sule (@supriya_sule) October 6, 2024
जितेंद्र आव्हाडांनी काय म्हटलं?
जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करत म्हटलं की, 'आपल्या पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मोढवे गावचा आई मरी मातेच्या मंदिराबाहेर उभा राहून दिवसातून 3 वेळा डोकावून पाहायचा हा पोरगा.. की नीवद ( नैवद्य ) नारळ आलेत का माझ्या पुढं.. ते आलेले दिसले की तो ते उचलून खायचा.. आपली भूक भागवायचा..'
पुढे त्यांनी म्हटलं की, 'सुप्रसिद्ध रिल्सस्टार सुरज चव्हाण बिग बॉसच्या घरात धुमाकूळ घातला. अखेर त्याने मनाची ट्रॉफी आपल्या पदरात पाडून घेतली. बिग बॉसच्या सुरुवातीपासूनच देशभर सुरजची क्रेझ वाढली होती आणि आता अधिकच वाढली आहे. बिग बॉस सारख्या अवघड रिॲलिटी शोमध्ये 274 लोकांमधून अंतिम 16 मध्ये त्याची निवड होत अखेर विजयी होणं ही अवघ्या महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. जिंकलंस भावा... तुझं करावं तितकं कौतुक कमीच आहे.'
आपल्या पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मोढवे गावचा आई मरी मातेच्या मंदिराबाहेर उभा राहून दिवसातून 3 वेळा डोकावून पाहायचा हा पोरगा.. की नीवद ( नैवद्य ) नारळ आलेत का माझ्या पुढं.. ते आलेले दिसले की तो ते उचलून खायचा.. आपली भूक भागवायचा..
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) October 6, 2024
सुप्रसिद्ध रिल्सस्टार सुरज चव्हाण बिग… pic.twitter.com/mTpRjkJ626