Bigg Boss Marathi : 6 व्या नंबरच्या जान्हवीला 900000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या अभिजीतला फक्त गिफ्ट व्हाउचर; शेवटच्या क्षणी बिग बॉसने काय गेम केला?
Bigg Boss Marathi season 5 : बिग बॉसच्या सिझन 5 मध्ये 6 व्या नंबरवर बाहेर पडलेल्या जान्हवीने 9 लाख रुपये मिळवले आहेत.
Bigg Boss Marathi season 5 : गेल्या 70 दिवसांपासून महाराष्ट्रात बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचीच चर्चा होती. मित्रांच्या कट्ट्यापासून ते गावच्या चावडीपर्यंत फक्त बिग बॉसने स्पर्धकांना दिलेले टाक्स आणि स्पर्धकांमध्ये होत असलेले वाद यावर चर्चा होत होती. दरम्यान, आज (6 ऑक्टोबर) बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाची आज सांगता झाली. आज पार पडलेल्या ग्रँड फिनालेमध्ये गुलिगत धोका हा डायलॉग संबंध महाराष्ट्रात प्रसिद्ध करणारा सूरज चव्हाण विजयी ठरला. सूरज चव्हाणला बक्षीस म्हणून लाखो रुपये मिळाले आहेत. मात्र या सर्व ग्रँड फिनालेमध्ये बिग बॉसची जान्हवी किल्लेकर ही एक स्पर्धक चांगलाच भाव खाऊन गेली आहे. स्पर्धकांमध्ये ती सहाव्या क्रमांकावर होती. मात्र तिला थेट दुसऱ्या क्रमांकाचं बक्षिस मिळालं आहे.
दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अभिजित सावंतला फक्त गिफ्ट व्हाऊचर
बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेमध्ये सुरज चव्हाण आणि अभिजित सावंत हे शेवटचे दोन स्पर्धक होते. या दोन्हीपैकी कोणताही एक स्पर्धक विजेता म्हणून घोषित होणार होता. या दोघांपैकी सूरज चव्हाणने बाजी मारली आणि तो बिग बॉसच्या पचाव्या पर्वाचा विजेता ठरला. तर अभिजित सावंत उपविजेता राहिला. त्याला बक्षिस मिळाले नाही. मात्र त्याला उपविजेता ठरल्यामुळे गिफ्ट व्हाऊचर देण्यात आले.
सहाव्या क्रमांकाच्या जान्हवी किल्लेकरला थेट 9 लाख रुपये
बिग बॉस मराठीच्या गँड फिनालेमध्ये एकूण सहा स्पर्धक होते. यामध्ये जान्हवी किल्लेकरचाही समावेश होता. जान्हवी किल्लेकर ही थेट सहाव्या स्थानावर होती. मात्र तिला थेट 9 लाख रुपये मिळाले. म्हणजेच दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अभिजित सावंतला फक्त गिफ्ट व्हाऊचरवर समाधान मानावं लागलं तर सहाव्या क्रमांकाच्या जान्हवी किल्लेकरला थेट नऊ लाख रुपये मिळाले. म्हणजेच पैशांच्या तुलनेत बघायचं झाल्यास जान्हवी किल्लेकरला सहाव्या क्रमांकावर असूनही थेट दुसऱ्या क्रमांकाचं बक्षिस मिळालं.
बिग बॉसने शेवटच्या क्षणी नेमका काय गेम केला?
बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेमध्ये शेवटचे सहा स्पर्धक बाकी होते. हा फिनाले सुरू झाल्यानंतर बिग बॉसने सहाही स्पर्धकांसमोर एक पर्याय ठेवला. एका पेटीत बिग बॉसने 7 लाख रुपये ठेवले होते. ज्या स्पर्धकाला विजेतेपदाच्या शर्यतीतून माघार घ्यायची असेल त्याला हे सात लाख रुपये घेऊन बाहेर पडाण्याचा पर्याय बिग बॉसने दिला होता. बिग बॉसने स्पर्धकांपुढे एका प्रकारचा टास्कच ठेवला होता. मात्र हे सात लाख रुपये कोणीही घेतले नाही.
त्यानंतर बिग बॉसने आणखी दोन लाख रुपये वाढवून ही रक्कम थेट 9 लाख रुपये केली. त्यानंतर रितेशने सहाही स्पर्धकांना स्वखुशीने या स्पर्धेच्या बाहेर पडण्याचा पर्याय दिला. हीच संधी हेरून जान्हवी किल्लेकरने स्पर्धेच्या बाहेर पडण्याचा निर्णय घेत 9 लाख रुपये घेतले. त्यानंतर जेतेपदाच्या शर्यतीत पाच स्पर्धक शिल्लक राहिले. म्हणजेच जान्हवी किल्लेकरने स्पर्धेच्या बाहेर पडण्याचा निर्णय घेऊन 9 लाख रुपये स्वत:च्या नावावर केले.
दरम्यान, सूरज चव्हाण बिग बॉस मराठीचा विनर ठरल्यामुळे त्याला सर्व स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. तर दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सूरज चव्हाणसोबत थेट चित्रपट करण्याची घोषणा केली आहे. लवकरच सूरज चव्हाण अभिनेता म्हणून या नव्या चित्रपटात दिसणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या