Sunil Grover: प्रसिद्ध कॉमेडियन बाजारात विकतोय लसूण; शेअर केला व्हिडीओ, नेटकरी म्हणाले, 'भावा, लसूण विकून...'
सुनील ग्रोव्हर (Sunil Grover) हा सोशल मीडियावर वेगवेगळ्या रिल्स आणि फोटो शेअर करतो.
Sunil Grover: अभिनेता आणि कॉमेडियन सुनील ग्रोव्हरने (Sunil Grover) अनेक चित्रपटांमध्ये तसेच शोमध्ये काम केले आहे.सुनील ग्रोव्हर हा द कपिल शर्मा शोच्या (The Kapil Sharma Show) माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत होता. या कार्यक्रमात त्यानं डॉ. मशूर गुलाटी आणि गुत्थी या भूमिका साकारल्या होत्या. सुनीलनं द कपिल शर्मा शो सोडला. तो सोशल मीडियावर वेगवेगळ्या रिल्स आणि फोटो शेअर करतो. त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये तो कधी छत्री विकताना दिसतो तर कधी कणीस विकताना दिसतो. आता नुकताच सुनीलनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो लसूण विकताना दिसत आहे.
सुनील ग्रोव्हरनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो मार्केटमध्ये बसलेली दिसत आहे. सुनील या व्हिडीओमध्ये बाजारात बसून लसूण विकताना दिसत आहे. या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला 'हमरी अटरिया आओ सांवरिया' हे गाणं ऐकू येत आहे. 'हमारी अटरिया' असं कॅप्शन सुनीलनं या व्हिडीओला दिलं आहे.
नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स
सुनीलच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्यानं सुनीलच्या व्हिडीओवर कमेंट केली, भावा तुझा, लसूण विकून करोडपती होण्याचा हेतू आहे, असं वाटत आहे.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'कपिल शर्मा पुन्हा जॉइन कर'
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी सुनीलनं मार्केटमध्ये बसून छत्री विकतानाचा फोटो शेअर केला होता. या व्हिडीओला त्यानं कमेंट केली,'इतनी बारिश, मेरा अपना छाता भी बिक गया'
View this post on Instagram
सुनील ग्रोव्हरचे चित्रपट
सुनील ग्रोव्हरनं गुडबाय या गेल्या वर्षी रिलीज झालेल्या चित्रपटामध्ये काम केलं. आता तो शाहरुख खानच्या जवान या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'द लीजेंड ऑफ भगत सिंग', 'फकिरा', 'जिला गाझियाबाद', 'गब्बर इज बॅक', 'गजनी' या चित्रपटांमध्ये सुनील ग्रोव्हरनं काम केलं.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: