Sukh Mhanje Nakki Kay Asta : अखेर निरोपाची वेळ आलीच, 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; शुटींगच्या शेवटच्या दिवशी कलाकार भावुक
Sukh Mhanje Nakki Kay Asta : स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
Sukh Mhanje Nakki Kay Asta : मागील अनेक वर्षांपासून स्टार प्रवाह वाहिनीवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं!' (Sukh Mhanje Nakki Kay Asta) ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. नुकताच या मालिकेच्या शेवटच्या भागाचं शुटींग पूर्ण झालं. स्टार प्रवाह वाहिनीवर सध्या अनेक नव्या मालिकांचा ओघ सुरु आहे. त्यामुळे जुन्या मालिका या प्रेक्षकांचा निरोप घेतायत. याआधी पाच वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करुन आई कुठे काय करते ही मालिका संपली. त्यानंतर आता सुख म्हणजे काय असतं ही मालिकाही लवकरच ऑफ एअर जाणार आहे.
तु ही रे माझा मितवा, लग्नानंतर होईलच प्रेम आणि आईबाबा रिटायर होत आहेत! या तीन नव्या मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाल्यात. मालिकेतील कलाकारांनीही प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. गौरी आणि जयदीपची ही गोष्ट सुरुवातीला प्रेक्षकांना फारच भावली. त्यानंतर या मालिकेचा ट्रॅक बदलण्यात आला. मालिकेने जवळपास सात वर्षांचा लीप घेतला. तेव्हा प्रेक्षकांनी मात्र बरीच नाराजी व्यक्त केली होती.
चार वर्षांनंतर 'सुख म्हणजे नक्की काय असतं' बंद होणार
'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asta) ही स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. चार वर्षानंतर आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 2020 मध्ये ही मालिका सुरु झाली होती. कोठारे व्हिजन निर्मित ही मालिका सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. मालिकेसह यातील कलाकारांनाही प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिका सुरुवातीपासून टीआरपीच्या शर्यतीत होती. सुरुवातीला ही मालिका टॉप 5 मध्ये होती, आताही या मालिकेचं टॉप 10 मधील स्थान कायम आहे. आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
View this post on Instagram