एक्स्प्लोर

Sukh Mhanje Nakki Kay Asta : 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत हर्षदा खानविलकरची धमाकेदार एन्ट्री; साकारणार सरपंच वसुंधरादेवीची भूमिका

Sukh Mhanje Nakki Kay Asta : 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत अभिनेत्री हर्षदा खानविलकरची (Harshada Khanvilkar) एन्ट्री होणार आहे.

Sukh Mhanje Nakki Kay Asta Marathi Serial Latest Update : 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asta) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही दिवसांपासून ही मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. आता या मालिकेत अभिनेत्री हर्षदा खानविलकरची (Harshada Khanvilkar) धमाकेदार एन्ट्री होणार आहे.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मध्ये जयदीप-गौरीच्या प्रेमकहाणीचा नवा अध्याय सुरु होणार आहे. मालिकेचं कथानक 25 वर्षांनी पुढे सरकलं असून गौरी-जयदीच्या पुनर्जन्माची उत्कंठावर्धक गोष्ट नित्या आणि अधिराजच्या रुपात पाहायला मिळणार आहे. या नव्या पर्वात नित्या-अभिराजची प्रेमकहाणी कशी फुलणार? कोणती नवी पात्र असणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हर्षदा खानविलकर मालिकेत साकारणार सरपंच वसुंधरादेवी अहिरराव

अभिनेत्री हर्षदा खानविलकरची 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत धमाकेदार एण्ट्री होणार आहे. हर्षदाताई मालिकेत सरपंचाच्या भूमिकेत दिसणार आहे. सौ. वसुंधरादेवी अहिरराव असं तिच्या भूमिकेचं नाव असून आतापर्यंत त्यांनी साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळी आणि हटके अशी ही भूमिका असेल.

हर्षदा खानविलकर आपल्या भूमिकेबद्दल बोलताना म्हणाल्या,"सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत मी साकारत असलेली वसुंधरादेवी ही व्यक्तिरेखा खूपच वेगळी आहे. आतापर्यंत मी ज्या भूमिका साकारल्या त्यांच्या पेहरावाची नेहमीच प्रशंसा झालीय. भरजरी साड्या, दागिने ही माझ्या भूमिकेची प्रमुख ओळख बनली असं म्हण्टलं तरी वावगं ठरणार नाही. मात्र मी आता साकारत असलेली वसुंधरादेवी हे पात्र याच्या पूर्ण वेगळं आहे".

हर्षदा खानविलकर पुढे म्हणाल्या,"अत्यंत साधी रहाणी असलेल्या वसुंधरादेवीचा गावात मात्र दबदबा आहे. या भूमिकेचं वेगळेपण म्हणजे मी आत्मसात केलेली कोल्हापुरी भाषा. कोल्हापुरवर माझं विशेष प्रेम आहे. प्रेक्षकांनी आजवर माझ्या प्रत्येक भूमिकेवर भरभरुन प्रेम केलं आहे. हेच प्रेम वसुंधरादेवींनाही मिळेल याची खात्री आहे".

आता नव्या वेळेत पाहा 'सुख म्हणजे नक्की काय असतं'

'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका 20 नोव्हेंबरपासून प्रेक्षकांना नव्या वेळेत पाहायला मिळणार आहे. 20 नोव्हेंबरपासून रात्री 10 वाजता प्रेक्षक ही मालिका पाहू शकतात. टीआरपीच्या शर्यतीतदेखील ही मालिका पहिल्या पाचमध्ये आहे. दिवसेंदिवस या मालिकेची क्रेझ वाढत चालली आहे.

संबंधित बातम्या

Sukh Mhanje Nakki Kay Asta: 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत 25 वर्षांच्या लीप; मालिकेत येणार रंजक वळण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आनंदाची बातमी! फेंगल चक्रीवादळचा इफेक्ट संपला, राज्यात गुलाबी थंडी पुन्हा परतणार, कुठे काय स्थिती?
आनंदाची बातमी! फेंगल चक्रीवादळचा इफेक्ट संपला, राज्यात गुलाबी थंडी पुन्हा परतणार, कुठे काय स्थिती?
JP Duminy : दुसऱ्या कसोटीदरम्यान संघाला मोठा धक्का! कोचने अचानक दिला राजीनामा, जाणून घ्या कारण
दुसऱ्या कसोटीदरम्यान संघाला मोठा धक्का! कोचने अचानक दिला राजीनामा, जाणून घ्या कारण
मुंबईकरांनो... रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, रविवारी मध्य आणि हार्बरवर मेगाब्लॉक
मुंबईकरांनो... रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, रविवारी मध्य आणि हार्बरवर मेगाब्लॉक
Ind vs Ban U19 Asia Cup 2024 Final : आशिया कपचा 'फायनल' थरार, टीम इंडिया बांगलादेशला भिडणार; रणसंग्राम कुठे पाहणार? LIVE सामन्याची वेळ काय?
आशिया कपचा 'फायनल' थरार, टीम इंडिया बांगलादेशला भिडणार; रणसंग्राम कुठे पाहणार? LIVE सामन्याची वेळ काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar on Madhukar Pichad Demise : जुना सहकारी हरपला, मधुकर पिचडांच्या निधनावर शरद पवार भावूकChandrashekhar Bawankule : Raj Thackeray आणि आमचे विचार जुळतात, बावनकुळेंचं सूचक वक्तव्यDevendra Fadnavis on Raj Thackeray : पालिका निवडणुकीत जिथं शक्य तिथं राज ठाकरेंना सोबत घेणार :फडणवीसCongress Rajya Sabha : राज्यसभेत काँग्रेस खासदारांच्या बाकाखाली 500 च्या नोटा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आनंदाची बातमी! फेंगल चक्रीवादळचा इफेक्ट संपला, राज्यात गुलाबी थंडी पुन्हा परतणार, कुठे काय स्थिती?
आनंदाची बातमी! फेंगल चक्रीवादळचा इफेक्ट संपला, राज्यात गुलाबी थंडी पुन्हा परतणार, कुठे काय स्थिती?
JP Duminy : दुसऱ्या कसोटीदरम्यान संघाला मोठा धक्का! कोचने अचानक दिला राजीनामा, जाणून घ्या कारण
दुसऱ्या कसोटीदरम्यान संघाला मोठा धक्का! कोचने अचानक दिला राजीनामा, जाणून घ्या कारण
मुंबईकरांनो... रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, रविवारी मध्य आणि हार्बरवर मेगाब्लॉक
मुंबईकरांनो... रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, रविवारी मध्य आणि हार्बरवर मेगाब्लॉक
Ind vs Ban U19 Asia Cup 2024 Final : आशिया कपचा 'फायनल' थरार, टीम इंडिया बांगलादेशला भिडणार; रणसंग्राम कुठे पाहणार? LIVE सामन्याची वेळ काय?
आशिया कपचा 'फायनल' थरार, टीम इंडिया बांगलादेशला भिडणार; रणसंग्राम कुठे पाहणार? LIVE सामन्याची वेळ काय?
मुंबईकरांची ऐपत कायच्या काय वाढली, 2 कोटी रुपयांच्या घरांची खटाखट विक्री, टू बीएचकेला अधिक पसंती
मुंबईकरांची ऐपत कायच्या काय वाढली, 2 कोटी रुपयांच्या घरांची खटाखट विक्री, टू बीएचकेला अधिक पसंती
Devendra Fadnavis & Raj Thackeray: भाजप राज ठाकरेंच्या मनसेला सत्तेत वाटा देणार का? खातेवाटपापूर्वी देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य
भाजप राज ठाकरेंच्या मनसेला सत्तेत वाटा देणार का? खातेवाटपापूर्वी देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य
आई झाल्यानंतर पहिल्यांदाच दिसली, दिलजितच्या कार्यक्रमात दीपिका पादुकोणने धरला ठेका; व्हिडीओ समोर!
आई झाल्यानंतर पहिल्यांदाच दिसली, दिलजितच्या कार्यक्रमात दीपिका पादुकोणने धरला ठेका; व्हिडीओ समोर!
'जुमलेबाजीचा गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात आणू नका', ठाकरे गटाच्या आमदाराचे सोयाबीन खरेदीवरून मुख्यमंत्र्यांना खरमरीत ट्विट म्हणाले..
'जुमलेबाजीचा गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात आणू नका', ठाकरे गटाच्या आमदाराचे सोयाबीन खरेदीवरून मुख्यमंत्र्यांना खरमरीत ट्विट म्हणाले..
Embed widget