Sukh Mhanje Nakki Kay Asta: मंगल करणार गौरीची मदत'; पाहा 'सुख म्हणजे नक्की काय असतं!' महाएपिसोडचा प्रोमो
लवकरच या मालिकाचा महाएपिसोड प्रेकांच्या भेटीस येणार आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या महाएपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Sukh Mhanje Nakki Kay Asta: सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asta) ही मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. या मालिकेतील जयदीप आणि गौरी यांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या मालिकेत ट्वीस्ट येत असतात. लवकरच या मालिकाचा महाएपिसोड प्रेकांच्या भेटीस येणार आहे. या महाएपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या महाएपिसोडच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की मंगल म्हणते, 'मी ही चावी वाड्याच्या बाहेर लपवणार.' मंगलने लपवलेली चावी ही गौरी आणि शालिनीला शोधावी लागणार आहे. चावी शोधत असताना गौरी एका विहिरीत पडते. गौरीला त्या विहिरीमधून बाहेर काढायला कोणीच नसतं. यावेळी जयदीप म्हणतो, 'मी गौरीशिवाय जगू शकत नाही.' त्यामुळे जयदीपसाठी मंगल ही गौरीची मदत करण्यासाठी विहिरीच्या जवळ जाते.
आता मंगल खरंच गौरीची मदत करते का? गौरीला मंगलनं लपवलेली चावी सापडते का? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी तुम्हाला सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेचा महाएपिसोड बघावा लागेल. हा एपिसोड 23 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रेक्षक या महाएपिसोडची उत्सुकतेने वाट बघत आहेत.
पाहा प्रोमो:
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी मंगलची जेलमधून सुटका झाली. मंगल ही जवळपास 30 वर्ष तुरुंगात होती. तुरुंगातून सुटका होताच मंगल ही शिर्केपाटील कुटुंबाच्या घरात आली आहे. मंगलची शिर्केपाटील कुटुंबाच्या घरात एन्ट्री होताच शालिनीनं वेगवेगळे प्लान करण्यास सुरुवात केली आहे. शालिनीच्या प्लॅनमुळे गौरी आणि जयदीपच्या आयुष्यात अडचणी निर्माण होत असतात.
सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेची स्टार कास्ट
सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री अतिशा नाईक या मंगल ही व्यक्तिरेखा साकारत आहेत. तसेच या मालिकेत गिरिजा प्रभू, मंदार जाधव, माधवी निमकर आणि वर्षा उसगावकर हे कलाकार प्रमुख भूमिका साकारत आहेत. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :