एक्स्प्लोर

Subodh Bhave :  छोट्या पडद्यावर व्यक्तीरेखेसाठी पहिल्यांदाच होणार AI चा वापर; सुबोध भावेचे मालिका विश्वात कमबॅक

Subodh Bhave :  छोट्या पडद्यावर मालिकेतील व्यक्तीरेखेसाठी AI चा वापर करण्यात येणार आहे. मालिकेतील एखाद्या व्यक्तीरेखेसाठी पहिल्यांदाच AI चा वापर करण्यात येणार आहे.

Subodh Bhave :  सध्या सगळीकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची (Artificial Intelligence) चर्चा सुरू आहे. या AI च्या वापराबाबत अनेक मतमतांतरे समोर येत असतात. अनेकजण त्याच्या सकारात्मक पैलूबाबतही बोलताना दिसतात. आता, छोट्या पडद्यावर मालिकेतील व्यक्तीरेखेसाठी AI चा वापर करण्यात येणार आहे. मालिकेतील एखाद्या व्यक्तीरेखेसाठी पहिल्यांदाच AI चा  वापर करण्यात येणार आहे. सोनी मराठीवरील आगामी 'तू भेटशी नव्याने’ या मालिकेत एआयचा वापर होणार आहे. या मालिकेतून अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) हा बऱ्याच कालावधीनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे.  सोनी मराठी वाहिनीवर नुकतंच 'तू भेटशी नव्याने’ या मालिकेचा प्रोमो आऊट करण्यात आला आहे. 

अभिनेता सुबोध भावे याने याआधी चित्रपटात, मालिकेत विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. या भूमिकांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सुबोध भावे टीव्ही मालिकेत पुनगरामन करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यामुळे कोणत्या मालिकेतून सुबोध भावे छोट्या पडद्यावर येणार याची उत्सुकता होती. सोनी मराठी वाहिनीवरील ‘तू भेटशी नव्याने’ मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर प्रेक्षकांना याचे उत्तर मिळाले आहे. सुबोध भावे या 'तू भेटशी नव्याने’ मालिकेत प्रमुख भूमिकेत असून अभिनेत्री शिवानी सोनारसोबत त्याची जोडी दिसणार आहे. शिवानीने आजवर निरनिराळ्या भूमिका साकारल्या आहेत आणि ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आता ती सोनी मराठी वाहिनीवरील  ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत झळकणार आहे. ‘तू भेटशी नव्याने’ ही मालिका लवकरच सोनी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. .

एआयची कमाल, सुबोध भावे दिसणार दुहेरी भूमिकेत

'तू भेटशी नव्याने’ या मालिकेत सुबोध भावे हा दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. मात्र, या दोन्ही व्यक्तीरेखांमध्ये जवळपास 20-25 वर्षांचे अंतर असणार आहे. अभिमन्यू आणि माही अशी त्या व्यक्तिरेखांची नावे आहेत. ऐन चाळिशीतील अभिमन्यू सर कॉलेज प्रोफेसरच्या भूमिकेत दिसणार आहेत तर ऐन विशितला तरुण सुबोधही या मालिकेत दिसणार आहे. त्या व्यक्तिरेखेचं नाव माही आहे आणि AI च्या माध्यमातून हा तरुण सुबोध दाखविला जाणार आहे. अशा प्रकारे साकारलेली एक व्यक्तिरेखा टीव्ही मालिकेत पहिल्यांदाच सादर केली जाणार आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेच्या प्रोमोमध्ये 25  वर्षांपूर्वीच्या कॉलेजमधल्या आठवणी जाग्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सुबोध भावे हा अतिशय तरुण दिसतो आहे. तो माही या तरुण मुलाच्या भूमिकेतही दिसणार आहे आणि एका शिक्षकाच्याही भूमिकेत आहे. AI चा वापर करून ह्या मालिकेतील व्यक्तिरेखा साकारली जाणार असल्याने  ‘तू भेटशी नव्याने’ ह्या मालिकेमुळे मालिका जगतात वेगळीच चर्चा निर्माण झाली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्लाUddhav Thackeray : सत्तारांची गुंडगिरी मोडण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरेंचं आवाहनNitin Gadkari on Forest Officers : माझ्या तावडीत अधिकारी सापडल्यास धुलाई करेन- नितीन गडकरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Embed widget