एक्स्प्लोर

Shiv Thakare : मला बॉयफ्रेंड शोधून दे...; इंस्टाग्राम लाईव्हदरम्यान शिव ठाकरेच्या चाहतीची विचित्र मागणी

Shiv Thakare : 'बिग बॉस' फेम शिव ठाकरेने इंस्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संवाद साधला आहे. त्यावेळी त्याच्या चाहतीनं त्याच्याकडे विचित्र मागणी केली आहे.

Shiv Thakare On Bigg Boss 16 : 'बिग बॉस' (Bigg Boss) फेम शिव ठाकरे (Shiv Thakare) सध्या चर्चेत आहे. मराठी 'बिग बॉस' नंतर भाईजानचा 'बिग बॉस' गाजवणाऱ्या मराठमोळ्या शिव ठाकरेनं नुकताच इंस्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संवाद साधत त्यांचे आभार मानले आहेत. या लाईव्हदरम्यान शिवने लवकरच एका बिग बजेट सिनेमात झळकणार असल्याची घोषणा केली आहे. 

सलमान खानच्या सिनेमात शिव ठाकरे झळकणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. यासंदर्भात माहिती देत शिव म्हणाला, "मी लवकरच एका बिग बजेट सिनेमात झळकणार आहे. तसेच, या सिनेमात मी एका सुपरस्टार सोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे". आता शिवचा आगामी सिनेमा कोणता असेल आणि या सिनेमात शिवसोबत कोणते कलाकार असतील, याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. 

शिव ठाकरे का लाजला? 

शिव ठाकरेच्या लाईव्हदरम्यान त्याच्या एका चाहतीने त्याच्याकडे 'मला बॉयफ्रेंड शोधून दे', अशी मागणी केली आहे. चाहतीच्या या मागणीनंतर शिव निशब्द झाला. त्याला काय बोलावं ते सुचेनासं झालं. लाजत तो चाहतीला म्हणाला, "मी हे काम नाही करू शकत". 

शिव ठाकरेने चाहत्यांचे मानले आभार!

इंस्टाग्राम लाईव्हदरम्यान शिव ठाकरेने चाहत्यांचेदेखील आभार मानले आहेत. चाहत्यांचे आभार मानत तो म्हणाला, "बिग बॉसच्या घरात मी प्रामाणिकपणे खेळण्याचा प्रयत्न केला. मी कसा खेळतो आहे याचा घरात असताना मला अंदाज नव्हता. पण बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर तुम्हा सर्वांचं प्रेम अनुभवलं. तुम्ही माझ्यावर केलेलं भरभरुन प्रेम आणि पाठिंब्यामुळे मी भारावून गेलो आहे. माझ्या सारख्या सर्वसामान्य माणसाला अर्थात आपल्या माणसाला पाठिंबा दिल्याबद्दल खूप-खूप आभार. या लाईव्हदरम्यान मी वचन देतो की, जिवंत असेपर्यंत कायम तुमच्यासोबत असेन". 

शिव ठाकरेची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम

'बिग बॉस मराठी'च्या माध्यमातून शिव ठाकरे हे नाव घराघरांत पोहोचलं होतं. शिव प्रामाणिकपणे खेळत असल्याने तो या पर्वाचा विजेतादेखील झाला होता. त्यानंतर शिव हिंदी बिग बॉसमध्ये सहभागी झाला. त्यातही त्याची खेळी चाहत्यांच्या पसंतीस उतरली. शिवचा मोठा चाहतावर्ग असून ते त्यांच्या लाडक्या शिवच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत. एकंदरीतच चाहत्यांमध्ये शिवची क्रेझ कायम आहे. शिवने इंस्टाग्रामवर नुकताच 2 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Shiv Thakare : वृत्तपत्र विक्रेता, दुधवाला ते 'बिग बॉस'चा विजेता; वाचा शिव ठाकरेच्या संघर्षाची कहानी...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Star Pravah Upcoming Serial Suna Yeti Ghara Promo: स्टार प्रवाहवर आणखी एक नवी मालिका; नात्यांची भावस्पर्शी गोष्ट 'सुना येती घरा', दिग्गजांची मांदियाळी, Promo पाहिलात?
स्टार प्रवाहवर आणखी एक नवी मालिका; नात्यांची भावस्पर्शी गोष्ट 'सुना येती घरा', दिग्गजांची मांदियाळी, Promo पाहिलात?
Tula Pahata Teaser Launch: वेळ बदलते, पण भावना... तरल प्रेमाची अनवट कहाणी; 'तुला पाहता' सिनेमाचा रंजक टीजर लाँच
वेळ बदलते, पण भावना... तरल प्रेमाची अनवट कहाणी; 'तुला पाहता' सिनेमाचा रंजक टीजर लाँच
Onkar Raut Share Fans Incident: अर्धांगवायूमुळे अंथरुणाला खिळलेल्या व्यक्तीसाठी 'हास्यजत्रे'तले समीर चौगुले, विशाखा सुभेदार देवदूत; ओंकार राऊतचा 'तो' हृदयस्पर्शी अनुभव
अर्धांगवायूमुळे अंथरुणाला खिळलेल्या व्यक्तीसाठी 'हास्यजत्रे'तले समीर चौगुले, विशाखा सुभेदार देवदूत; ओंकार राऊतचा 'तो' हृदयस्पर्शी अनुभव
Vivek Oberoi Shares Post On Sunetra Pawar: 'सूर्य दिसत नसला तरी चंद्राच्या पाठीशी असतो...'; बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयची सुनेत्रा पवार यांच्यासाठी मराठीतून पोस्ट
'सूर्य दिसत नसला तरी चंद्राच्या पाठीशी असतो...'; विवेक ओबेरॉयची सुनेत्रा पवार यांच्यासाठी मराठीतून पोस्ट

व्हिडीओ

Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे
Shivsena BJP Marathi Credit War Special Report : अमराठी नेते मैदानात, मराठीवरून दोन पक्षातच श्रेयवादाची लढाई सुरु | ABP Majha
Modi On Gold Special Report : मोदींचं आवाहन, भारतीय स्वतःला वर्षभर सोनं खरेदीपासून दूर ठेवू शकतात? | ABP Majha
PM Modi Appeal to Nation : काटकसरीचं पाऊल,संकटाची चाहूल Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane Politics: अंबरनाथ नगरपरिषदेतील सत्तासंघर्षाला नवं वळण, शिवसेना-भाजप युतीच्या चर्चेत ट्विस्ट, 3 विरुद्ध 2 वर्षांचा फॉर्म्युला?
अंबरनाथ नगरपरिषदेतील सत्तासंघर्षाला नवं वळण, शिवसेना-भाजप युतीच्या चर्चेत ट्विस्ट, 3 विरुद्ध 2 वर्षांचा फॉर्म्युला?
Singer Accused on Trisha Krishnan: थलपती विजय यांच्या शपथविधीसोहळ्यात मिरवणाऱ्या तृषा कृष्णनवर भडकली प्रसिद्ध गायिका; म्हणाली, 'त्याची पत्नी अन् मुलांचा...'
थलपती विजय यांच्या शपथविधीसोहळ्यात मिरवणाऱ्या तृषा कृष्णनवर भडकली प्रसिद्ध गायिका; म्हणाली, 'त्याची पत्नी अन् मुलांचा...'
Devendra Fadnavis मोठी बातमी: मुख्यमंत्री फडणवीसांच्या मंजूरी शिवाय मंत्र्यांना विमान वापरता येणार नाही; नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर अंमलबजावणी सुरु
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मंजूरी शिवाय मंत्र्यांना विमान वापरता येणार नाही; नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर अंमलबजावणी सुरु
मोठी बातमी! केंद्राकडून 2026 मध्ये घेण्यात आलेली NEET परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या घटनेनंतर शासनाचा निर्णय
मोठी बातमी! केंद्राकडून 2026 मध्ये घेण्यात आलेली NEET परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या घटनेनंतर शासनाचा निर्णय
Rahul Dravid News : क्रिकेटविश्वात मोठा ट्विस्ट! राहुल द्रविड बनला नव्या टीमचा मालक, T20 लीगमध्ये जगभरातील स्टार खेळाडूंचा जलवा
क्रिकेटविश्वात मोठा ट्विस्ट! राहुल द्रविड बनला नव्या टीमचा मालक, T20 लीगमध्ये जगभरातील स्टार खेळाडूंचा जलवा
Tamil Nadu CM Thalapathy Vijay: 'गरीबी वगैरे काही नाही, त्याचे वडील फिल्ममेकर...'; तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय पहिल्याच भाषणात खोटं बोलले? वर्गमित्राच्या दाव्यानं खळबळ
'गरीबी वगैरे काही नाही...'; तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय पहिल्याच भाषणात खोटं बोलले? वर्गमित्राच्या दाव्यानं खळबळ
Narendra Modi On Gold Petrol Diesel: सलग दोन दिवस नरेंद्र मोदींकडून सोनं न खरेदी करण्याचं आवाहन; आंतरराष्ट्रीय विषयाच्या अभ्यासकांनी सांगितलं मुख्य कारण!
सलग 2 दिवस PM मोदींकडून सोनं न खरेदी करण्याचं आवाहन; आंतरराष्ट्रीय विषयाच्या अभ्यासकांनी सांगितलं कारण!
पंतप्रधानांच्या आवाहनानंतर 'वर्क फ्रॉम होम'ची मागणी जोरात, Work From Home ला कायदेशीर मान्यता द्या, IT कर्मचारी संघटनेचं पत्र
पंतप्रधानांच्या आवाहनानंतर 'वर्क फ्रॉम होम'ची मागणी जोरात, Work From Home ला कायदेशीर मान्यता द्या, IT कर्मचारी संघटनेचं पत्र
Embed widget