Sharad Ponkshe : शरद पोंक्षेंचा 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेला रामराम; म्हणाले,"आता माझ्या जागी..."
Sharad Ponkshe : अभिनेते शरद पोंक्षे यांनी 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेला रामराम ठोकला आहे.
Sharad Ponkshe Exit Thipkyanchi Rangoli : 'ठिपक्यांची रांगोळी' (Thipkyanchi Rangoli) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. 'ठिपक्यांची रांगोळी' ही मालिका कानिटकर कुटुंबाभोवती फिरणारी आहे. या मालिकेत शरद पोंक्षे यांनी 'दादा काका' ही भूमिका साकारली होती. पण आता शरद पोंक्षे यांनी 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेतून एक्झिट घेतली आहे. सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर करत त्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
शरद पोंक्षे व्हिडीओ शेअर करत म्हणाले,"ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेतील विनायक कानिटकर म्हणजेच अभिनेते शरद पोंक्षे यांची विनायक ही व्यक्तिरेखा यापुढे अभिनेते उदय टिकेकर (Uday Tikekar) साकारणार आहेत. तुमच्या आवडत्या मालिकेतील या व्यक्तिरेखेवर असलेलं तुमचं प्रेम या बदलाने अजिबात कमी होणार नाही. याची आम्हाला खात्री आहे आणि म्हणूनच उदय टिकेकर यांचे आपण मनापासून स्वागत करूया".
उदय टिकेकर दिसणार दादा काकांच्या भूमिकेत!
शरद पोंक्षे यांच्या या पोस्टवरुन स्पष्ट होत आहे की, विनायक कानिटकर यांच्या भूमिकेत आता अभिनेते उदय टिकेकर दिसणार आहेत. त्यांच्या या पोस्टवर दादा काका आम्हाला तुमची आठवण येईल, दादा काकाच्या भूमिकेसाठी तुम्हीच योग्य आहात, दादा काका तुम्ही मालिका सोडायला नको होती, नव्या प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
View this post on Instagram
कानिटकर कुटुंबासाठी आयुष्य म्हणजे, सोहळा आहे आणि घरात घडणारी प्रत्येक छोटी मोठी गोष्ट म्हणजे एखादा सण समारंभ. त्यामुळे 'ठिपक्यांची रांगोळी' ही मालिका प्रत्येकाला आपलीशी वाटते. अल्पावधीतच ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. या मालिकेला टीआरपीच्या शर्यतीत 5.7 रेटिंग मिळाले आहे. शशांक-अप्पूच्या रोमँटिक ट्रॅकला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे.
'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेची शरद पोंक्षे, सुप्रिया पाठारे, सारिका नवाथे, लीना भागवत, मंगेश कदम, अतुल तोडणकर, ज्ञानदा रामतीर्थकर, चेतन वडनेरे, राजन ताम्हाणे, मुग्धा गोडबोले, राधिका हर्षे अशी तगडी स्टारकास्ट आहे. आता मालिकेच्या आगामी भागात दादा काकांच्या भूमिकेत उदय टिकेकर दिसणार आहेत. तर शरद पोंक्षे यांच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या