![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Star Pravah New Serial Sadhi Manasa : सुप्रिया पाठारे पुन्हा एकदा सासुबाईंच्या भूमिकेत, झळकणार स्टार प्रवाहवरील 'साधी माणसं' मालिकेत, नवा प्रोमो समोर
Star Pravah New Serial Sadhi Manasa : अभिनेत्री सुप्रिया पाठारे ही पुन्हा स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेत झळकणार आहे. या मालिकेचा नवा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय.
![Star Pravah New Serial Sadhi Manasa : सुप्रिया पाठारे पुन्हा एकदा सासुबाईंच्या भूमिकेत, झळकणार स्टार प्रवाहवरील 'साधी माणसं' मालिकेत, नवा प्रोमो समोर Sadhi Manasa Star Pravah new Marathi Supriya Pathare marathi actor play a Mother in Law role Shivani Baokar Akash Nalawade detail marathi news Star Pravah New Serial Sadhi Manasa : सुप्रिया पाठारे पुन्हा एकदा सासुबाईंच्या भूमिकेत, झळकणार स्टार प्रवाहवरील 'साधी माणसं' मालिकेत, नवा प्रोमो समोर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/10/292b4c5059aa275c8dfd41924d3db7db1710094672849720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Star Pravah New Serial Sadhi Manasa : स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवर लवकरच 'साधी माणसं' (Sadhi Manasa) ही नवी मालिका सुरु होणार आहे. या नव्या मालिकेचा प्रोमो सध्या समोर आलाय. या मालिकेत सुप्रिया पाठारेसह (Supriya Pathare) अभिनेते प्रशांत चौडप्पा (Prashant Chaudappa) हे देखील झळकणार आहेत. या मालिकेतून अभिनेत्री शिवानी बावकर आणि अभिनेता आकाश नलावडे ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत सुप्रिया पाठारे पुन्हा एकदा सासुबाईंच्या भूमिकेत झळकणार आहे.
सध्या अनेक वाहिन्यांवर नव्या मालिका सुरु होणार आहेत. झी मराठी वाहिनीवर येत्या काळामध्ये पाच नव्या मालिका सुरु होतील. या शर्यतीमध्ये स्टार प्रवाह वाहिनीने त्यांच्या दोन नव्या मालिकांची घोषणा केलीये.स्टार प्रवाह वाहिनीवर घरोघरी मातीच्या चुली आणि साधी माणसं या दोन नव्या मालिका सुरु होणार आहेत. साधी माणसं ही मालिका 18 मार्चपासून सुरु होणार आहे. तसेच संध्याकाळी 7 वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
View this post on Instagram
सुप्रिया पाठारे पुन्हा एकदा सासुबाईंच्या भूमिकेत
स्टार प्रवाह वरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत सुप्रिया पाठारे माई या व्यक्तिरेखेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. प्रत्येकाच्या घराघरात सुप्रिया पाठारेंची माई ही व्यक्तिरेखा पोहचलीच पण ती प्रेक्षकांच्या देखील तितकीच पसंतीस पडली. पण साधी माणसं या मालिकेत सुप्रिया पाठारे काष्ट सासुबाईंच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सुप्रिया पाठारेची ही भूमिका प्रेक्षकांच्या कितपत पसंतीस उतरते याची सध्या उत्सुकता आहे.
शिवानी बावकर आणि आकाश नलावडे मुख्य भूमिकेत
साधी माणसं या मालिकेत शिवानी बावकर ही मीराच्या भूमिकेत तर आकाश नलावडे हा सत्याच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. एकाच शहरात राहणाऱ्या या दोघांचे स्वभाव मात्र वेगळे आहेत. त्यामुळे नियती यांच्या भविष्यात काय घडवून आणणार हे या मालिकेत पाहायला मिळणार आहे. सध्या या मालिकेच्या प्रोमोनंतर प्रेक्षकांची उत्सुकताही शिगेला पोहचली आहे.
'कुन्या राजाची गं तू राणी' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?
साधी माणसं ही मालिका 18 मार्चपासून संध्याकाळी 7 वाजता सुरु होणार आहे. सध्या संध्याकाळी 7 वाजता कुण्या राजाची गं तू राणी हा मालिका सुरु आहे. पण ही नवीन सुरु झाल्यानंतर ही मालिका प्रेक्षकांच्या निरोप घेणार ही नव्या वेळेत भेटीला येणार हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)