एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'राधा प्रेम रंगी रंगली'मध्ये सचित पाटीलचा डबल रोल!
आता कश्यप नांदेच्या येण्याने मालिकेमध्ये काय घडणार ? प्रेम आणि राधाच्या नात्याला कोणते नवे वळण मिळणार ? देवयानी कश्यपला हाती घेऊन कोणते नवे कारस्थान रचणार?
मुंबई : कलर्स मराठीवरील ‘राधा प्रेम रंगी रंगली’ मालिकेमध्ये गेल्या काही दिवसांपासून बरेच खुलासे होताना दिसत आहेत. आता मालिकेमध्ये अजून एक ट्वीस्ट आला असून, कश्यप नांदे कोण आहे ? त्याचा राधाशी खरच काही संबंध होता किंवा आहे का ? असा प्रश्न होते. आता लवकरच प्रेक्षकांचे सगळे प्रश्न सुटणार आहेत. मालिकेमध्ये कश्यप नांदेची एन्ट्री झाली असून ही भूमिका सचित पाटीलच साकारत आहे. म्हणजे सचित पाटील डबल रोल साकारणार आहे. या भूमिकेमध्ये सचित एका वेगळ्या रुपात आणि वेगळ्या ढंगात दिसत आहे.
कश्यप नांदे आणि प्रेम यांच्या दिसण्यात बरेच साम्य आहे. त्यामुळे कश्यपला समोर बघून राधाला खूप मोठा धक्का बसला. सचित पाटील आयुष्यामध्ये पहिल्यांदाच डबल रोल करत आहे त्यावर बोलताना तो म्हणाला, “राधा प्रेम रंगी रंगली मालिकेने आता नवं वळण घेतलं आहे. या मालिकेमध्ये मी आता दुहेरी भुमिकेमध्ये दिसणार आहे. कश्यप नांदेची भूमिका मी साकारणार आहे. मी आयुष्यात पहिल्यांदाच डबल रोल साकारत आहे. प्रेम या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. आता मला डबल रोल करण्याची संधी या मालिकेमुळे मिळत आहे. अप्रतिमरित्या मालिकेचे लिखाण होत आहे. कश्यप नांदे ही भूमिका प्रेम देशमुखच्या भूमिकेपेक्षा खूपच वेगळी आहे. कश्यप आणि प्रेममध्ये अजिबात कुठल्याही प्रकारचे साम्य नाही. कश्यप हा अतिशय रावडी, मवाली असा माणूस आहे. कश्यप नांदे काही महिन्यामध्ये मरणार आहे, ज्याची त्याला अजिबात काळजी नाही. देवयानीमुळे कश्यप राधाच्या आयुष्यात येणार आहे. आता कश्यप नांदे आणि राधा एकत्र येतील, पण पुढे राधाचे काय होईल ? हे बघण्यासारखे असणार आहे. कश्यपचा लूक खूपच वेगळा आहे. लूक वेगळा दिसण्यासाठी कश्यपची वेशभूषा वेगळी आहे आणि वेगळ्या रंगाच्या लेन्स देण्यात आल्या आहेत. अशा दोन वेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारण नक्कीच आव्हान असणार आहे. पण मी आशा करतो की, कश्यप नांदे ही भूमिका देखील प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.”
राधा प्रेमच्या आयुष्यातून निघून गेल्यानंतर तिने अनेक प्रश्न मागे सोडले, घरच्यांसाठी तो एक धक्काच होता. प्रेम त्या धक्क्यामधून कसाबसा सावरत होता की, देवयानी आणि दीपिकाने त्याला त्यांच्या जाळ्यात आणि कारस्थानामध्ये पूर्णत: अडकवले. परंतु जसजसे दिवस सरत गेले गुंता, प्रश्न सगळे सुटत गेले. राधा मेली नसून ती जिवंत आहे, तिच्या पोटात प्रेमचं मूल वाढत आहे, राधा कधीच विपश्यना केंद्रात गेली नसून ती इंदोरमध्ये एका इस्पितळामध्ये परिचारिका म्हणून कार्यरत होती अशा अनेक गोष्टी समोर आल्या. जसाजसा गुंता सुटत गेला प्रेमला राधाविषयीची वाटणारी काळजी वाढत गेली. सगळ्या गोष्टी समोर येत आहेत पण राधा अजूनही भेटली नाही ती कुठे आहे याची माहिती अजूनही मिळाली नाही. परंतु या सगळ्यामागे दीपिका आणि देवयानी आहे हे मात्र प्रेमला कळून चुकले.
आता कश्यप नांदेच्या येण्याने मालिकेमध्ये काय घडणार ? प्रेम आणि राधाच्या नात्याला कोणते नवे वळण मिळणार ? देवयानी कश्यपला हाती घेऊन कोणते नवे कारस्थान रचणार? हे पुढील काही एपिसोडमध्ये पाहायल मिळेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
निवडणूक
Advertisement