'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेतील अभिनेत्रीची रिल्ससाठी स्टंटबाजी, चालत्या गाडीतून डोकं बाहेर काढताना शेअर केला व्हिडीओ; चाहते भडकले
Akshaya Hindalkar Car Video : 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेतील अभिनेत्री अक्षया हिंदळकरचा गाडीतून डोक बाहेर काढतानाचा रिलमुळे चाहते चांगलेच भडकले आहेत.

मुंबई : अलिकडे रिल्सचं (Reels) क्रेझ मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. अगदी इन्फ्लुएर्न्सपासून ते कलाकार आणि तरुणाईही रिल्स बनवताना आणि शेअर करताना पाहायला मिळतात. काही जण तर रिल्स बनवण्याच्या नादात स्वत:चा जीवही धोक्यात घालतात. सोशल मीडियावरील रिल्ससाठी बहुतेक वेळा इन्फ्लूअन्सर्स स्टंटबाजी करताना दिसतात. जीव धोक्यात घालून रिल बनवणे अनेकांना चांगलंच महागात पडलं आहे, तर काहींनी जीवही गमावला आहे. अशाच प्रकारे रिलसाठी स्टंटबाजी एका अभिनेत्रीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
पुन्हा कर्तव्य आहे मालिकेतील अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल
'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेतील अभिनेत्री अक्षया हिंदळकरने गाडीतून डोक बाहेर काढत लाँग राईडचा आनंद घेतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. अक्षया हिंदळकरच्या या रिलमुळे चाहते चांगलेच भडकले आहेत. रिल्सच्या नादात जीव धोक्यात घालू नकोस, असं म्हणत चाहत्यांनी तिला चांगलंच सुनावलं आहे. अनेकांनी अभिनेत्रीला असे धोकादायक स्टंट न करण्याचा सल्ला दिला आहे.
चालत्या गाडीतून डोकं बाहेर काढताना शेअर केला व्हिडीओ
'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत वसुंधरा या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री अक्षया हिंदळकर हिच्या व्हिडीओवर सध्या चाहत्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. अक्षयाने काही दिवसांपूर्वी मुंबईच्या रस्त्यांवर रात्रीच्या वेळी फिरताना गाडीतून डोकं बाहेर काढत व्हिडीओ शूट केला होता. रिल शेअर करताच नेटकऱ्यांनी तिला धारेवर धरलं आहे.
'रिल्सच्या नादात डोकं सांभाळ'
अक्षयाच्या रिलवर चाहत्यांनी कमेंट्स करत निशाणा साधला आहे. एका युजरने म्हटलं आहे, 'रिल्सच्या नादात डोकं सांभाळ'. तर आणखी काही नेटकऱ्यांनी 'काळजीपूर्वक', 'चालत्या गाडीतून डोकं बाहेर काढू नये', ''
अभिनेत्रीची स्टंटबाजी चाहते भडकले
View this post on Instagram
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
