एक्स्प्लोर

Priyadarshini Indalkar : 'त्या' पोस्टनंतर धमक्या, भयंकर मेसेज...; प्रियदर्शनी इंदलकरने सांगितले अनुभव

Priyadarshini Indalkar : ललित कला केंद्रावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ केलेल्या या पोस्टनंतर आपल्याला भयंकर अनुभवातून जावे लागले असल्याचे प्रियदर्शनीने म्हटले. प्रियदर्शनीने एक पोस्ट शेअर करत भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

Priyadarshini Indalkar :  पुणे विद्यापीठातील (Pune University) ललित कला केंद्राकडून (Lalit Kala Kendra) काही दिवसांपूर्वी 'जब वी मेट' हे नाटक सादर करण्यात आले होते. या नाटकावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (ABVP) आक्षेप घेत कलाकारांना मारहाण केली. त्याशिवाय, ललित कला केंद्राची तोडफोड केली. कलाकार विद्यार्थ्यांवर झालेल्या मारहाणीचा निषेध सगळीकडून करण्यात आला. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रियदर्शनी इंदलकरने (Priyadarshini Indalkar) देखील हल्ल्याचा निषेध केला होता. तशी तिने एक पोस्ट इन्स्टा स्टोरीवर लिहिली होती. मात्र, या पोस्टनंतर आपल्याला भयंकर अनुभवातून जावे लागले असल्याचे प्रियदर्शनीने म्हटले. 

ललित कला केंद्रावर हल्ला झाल्यानंतर प्रियदर्शनीने  आपल्या पहिल्या पोस्टमध्ये “ललित कला केंद्र, पुणे येथील विद्यार्थी कलावंतांवर हल्ला करुन नाटक बंद पाडणाऱ्या दहशतवादी कृत्याचा तीव्र निषेध…”, अशी स्टोरी तिने पोस्ट केली होती. त्यानंतर तिला ट्रोलिंग, धमकीला सामोरे जावे लागले असल्याचे प्रियदर्शनीने म्हटले. प्रियदर्शनीने इन्स्टा स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. ललित कला केंद्रावरील हल्ला का चुकीचा आहे, असे सांगणारी पोस्ट लेखक-अभिनेता हितेश पोर्जे यांनी लिहिली आहे. 

प्रियदर्शनीने शेअर केलेल्या त्या पोस्टमध्ये काय म्हटले?

मी काही ललित कला केंद्राचा विद्यार्थी नाही. नाटक अथवा फिल्मशी संबंधित कुठल्याच इंस्टिट्यूटचा पार्ट नाही. पण गेल्या आठवड्यात झालेल्या ललित कला केंद्राच्या वादानिमित्त काही गोष्टी मनात आल्या त्या इथे मांडत असल्याचे हितेश यांनी म्हटले. 

विदर्भापासून ते कोकणापर्यंतच्या कित्येक छोट्या छोट्या गावांतून अनेक मुलं-मुली इथे शिकायला येतात. पुणे शहरात आपसूकपणे अंगावर येणारे सामाजिक-सांस्कृतिक गुंते मोकळे करत कष्टाने नाटकं उभी करतात, प्रयोग करतात. लोककला आणि पाश्चात्य नाट्यकलेचे प्रशिक्षण घेत खऱ्या अर्थाने संस्कृती जपण्याचा प्रयत्न करत असल्याचे हितेश पोर्जे यांनी म्हटले.

त्यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे  म्हटले की,  संपूर्ण प्रकरण ज्या नाटकाभोवती फिरतंय, त्याचा संपूर्ण प्रयोग हल्लेखोरांनी पाहिलेला नाही. नाटकाचा जो फॉर्म वापरला गेलाय तो समजून घेऊन त्याबद्दल त्यांनी चर्चा करण्याची, वाद घालण्याची हिंमत दाखवली नाही. सो कॉल्ड धर्म-संस्कृतीरक्षक हे असे असतांना देशाला आणि संस्कृतीला कोण कुठे पोहोचवतंय ह्यात कंफ्यूजन व्हायलाच नको असा मुद्दाही त्यांनी मांडला. 

View this post on Instagram
 
A post shared by Hitesh Porje (@hiteshporje)

प्रकरण इतकं मोठं झाल्यावर पुढच्या वर्षी एखादा पालक आपल्या मुला-मुलीला ललितमध्ये प्रवेश घ्यायला लगेचंच परवानगी देईल का? नाही दिली परवानगी तर नुकसान कुणाचं? तर अगदी आत्मियतेने नाटक-अभिनय शिकू पाहणाऱ्या निमशहरी, खेड्यातल्या मुलांचं. नाटक-फिल्मद्वारे जातीय आणि धार्मिक वर्चस्वाला आव्हान देण्याची गरज असतांना ही पॅरेलेल सोशल सेंसरशिप आपली मुळं आतवर रुजवणार. हे असंच वाढत राहिलं तर नुकसान कुणाचं!? असा सवालही पोर्जे यांनी उपस्थित केला आहे. 

इतर संबंधित बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Rinku Singh and MP Priya Saroj: रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Property : वाल्मिक कराडची करोडोंची प्रॉपर्टी; दोन पत्नींच्या नावे किती फ्लॅट्स? पाहा A TO Z सगळी माहितीABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6 PM 17 January 2025TOP 50 | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha : Superfast News : Saif Ali Khan AttackedABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5 PM 17 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Rinku Singh and MP Priya Saroj: रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
Santosh Deshmukh Case : CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा
नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा
Embed widget