एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Premachi Goshta Serial Update : सईच्या कस्टडीसाठी सावनीने रचला नवा कट, सागर-मुक्ता येणार का एकत्र?

Premachi Goshta Serial Update : सईचा ताबा मिळवण्यासाठी सावनी नवा डाव टाकते. सागर-मुक्ता हा सावनीचा डाव उधळणार का, सईचा ताबा सावनीकडे जाणार का?

Premachi Goshta Serial Update :  'प्रेमाची गोष्ट'  (Premachi Goshta) मालिकेत सध्या वेगळं वळण आले आहे. मुक्ताला घराबाहेर काढल्याने आता सावनीला सागरचा संसार मोडण्यासाठी एक मोठी संधी मिळालेली असते. त्याचा फायदा घेत सईचा ताबा मिळवण्यासाठी सावनी नवा डाव टाकते. सागर-मुक्ता हा सावनीचा डाव उधळणार का, सईचा ताबा सावनीकडे जाणार का, हे प्रेक्षकांना आजच्या एपिसोडमध्ये समजणार आहे. 

सागरवर इंद्रा-स्वाती चिडणार...


सईला मुक्ताकडे पाठवल्यामुळे इंद्रा सागरवर चिडते. स्वातीदेखील इंद्राला साथ देत सागरच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करते. सागर इंद्राला समजावण्याचा प्रयत्न करतो. पण, इंद्राची चिडचिड होत असते. सई लहान आहे, तिला या भांडणात कशाला आणताय असे सागर विचारतो. अजूनही सागरला त्याची बायकोच खरी वाटते असे म्हणत इंद्रा आई एकवीरा देवीला साकडे घालते. 

सागर करणार आरतीला फोन कॉल...

इकडं सागर मुक्ताचे निर्दोषत्व कसे सिद्ध करायचे याचा विचार करतो. सागर मुक्ताच्या क्लिनिकमधून आरतीचा फोन नंबर मिळवतो आणि तिला कॉल करतो. आरती सागरचा फोन कॉल घेते पण मध्येच फोन कॉल कट करते. त्यामुळे सागरचा संशय बळावतो. 

सावनीचा डाव, फॅमिली कोर्टाचे न्यायाधीश सागरच्या घरी... 

सावनीने  फॅमिली कोर्टाच्या न्यायाधीशांना भेटून सईच्या कस्टडी देण्याची मागणी करते. मुक्ता आणि सागरचे लग्न हे नाटक होते. सईला माझ्यापासून हिरवण्यासाठी त्यांनी हे नाटक रचलं. सागर आणि मुक्ताने माझ्यापासून सईला दूरवण्यासाठी हे नाटक केले असून आता दोघेही एकत्र राहत नाही. त्यामुळे मला माझ्या मुलीची कस्टडी द्यावी अशी विनंती करते. 

सावनी न्यायाधीशांना घेऊन सागरच्या घरी येते. न्यायाधीशांना पाहून सागरला धक्का बसतो. न्यायाधीश अचानक आलेले पाहून सागर विचारात पडतो. न्यायाधीश हे मला मुक्ता कोळींना भेटायचे आहे असे म्हणतात. त्यावर घरातले सगळे शांत बसतात. मुक्ता घरात नसल्याचे पाहून सईच्या कस्टडीबाबत मला माझ्या निर्णयाचा पुनर्विचार करावा लागेल असे न्यायाधीश म्हणतात. 

घरात सगळी परिस्थिती सामान्य आहे, सावनीने तुम्हाला काय सांगितले हे मला माहित नसल्याचे सागर सांगतो. इकडं स्वाती ही मुक्ताला बोलाववे लागेल असे इंद्राला बाजूला नेऊन सांगते. तर, दुसरीकडे न्यायाधीश हे मला मुक्ता कोळीला भेटायचे आहे, असे वारंवार सांगतात. सागरही त्यांच्या बोलण्यापुढे निरुत्तर झालेला असतो. 

मुक्ता येणार सागरच्या घरी...

अचानकच मुक्ता घरात श्रीखंड-पुरी घेऊन येते. आईने घरातील सगळ्यांना श्रीखंड पुरी पाठवली असल्याचे सांगते. मुक्ताला पाहून सावनीच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो.  न्यायाधीशांना पाहून मुक्ता आश्चर्य व्यक्त करते. 

मु्क्ताला अचानक पाहून सावनीची चिडचिड व्यक्त करते. हे सगळे जण नाटकं करत आहेत असे सावनी सांगते. त्यावर मुक्ता तिला तुम्हाला त्रास होतोय तर पाणी घेताय का असे म्हणते. मुक्ता न्यायाधीशांना सांगते की, माझे माहेर समोरच्या घरात आहे, तर माझी माहेरी-सासरी ये-जा होणारच असे सांगते. तुम्हाला कोणीतरी खोटी माहिती दिली असल्याचे मुक्ता सांगते. त्यानंतर सागरही आम्ही एकत्र राहत नाही हे सिद्ध करण्यासाठी न्यायाधीशांना इथे घेऊन आलीस का, असे सावनीला उद्देशून म्हणतो. त्यावर सागर सावनी खोटं बोलते असे सांगतो.

पुरू-माधवी येणार मदतीला...

तुम्ही इथं आलात तेव्हा सगळे का घाबरलात असे सावनी विचारते. त्यावरही न्यायाधीशही तुम्ही का घाबरलात असे विचारतात. सावनी, कोळी कुटुंबीय आणि मुक्तामध्ये जोरदार भांडण झाल्याचे सांगते. मु्क्ताची आईनेच तिला माहेरी नेले. त्यांनाच, माधवी गोखलेंना बोलवा अशी मागणी करते. न्यायाधीशही माधवी गोखलेंना फोन करून बोलवा असे सांगतात. तेवढ्यात माधवी-पुरू सागरच्या घरी येतात. आजचे जेवण आमच्याकडे असल्याचे इंद्राताईंना आणि घरच्या लोकांना सांगितले नाही का? असे माधवी मुक्ताला विचारते. 

पुरू-माधवी सागरच्या घरी येत परिस्थिती सांभाळून घेतात. घरातल्या लोकांचे वागणे पाहून सावनीची आणखी चिडचिड होते. सावनी अजूनही न्यायाधीशांना सांगते की हे सगळे खोटं बोलत आहेत. यावर इंद्राही चिडते. 
न्यायाधीश इथं काय करतात, हे माधवी विचारते. 

त्यावर सावनी माधवींना तुमच्या मुलीच्या भवितव्यासाठी खरं बोला असे सांगा असे म्हणते. न्यायाधीशही माधवीला खरं बोलण्याचा आग्रह करतात. 

आता, माधवी काय सांगणार? सईला न्यायाधीशांसमोर बोलवणार का,  सईची कस्टडी सावनीकडे जाणार का? या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना मिळणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 24 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMaitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रीजी यांच्या प्रवचनाची पर्वणी : 24 NOV 2024Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Koregaon Assembly Elections 2024 : महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election results 2024: ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Embed widget