Premachi Goshta Serial Updates : स्वातीच्या मदतीसाठी धडपडणारी मुक्ता सागरपासून दुरावतेय का? 'प्रेमाची गोष्ट' च्या आजच्या एपिसोडमध्ये काय घडणार?
Premachi Goshta Serial Updates : नणंद स्वातीची मदत करण्यासाठी धडपड करत असलेली मुक्ता मात्र सागरपासून दुरावतेय का अशी स्थिती निर्माण झाली आहे.
Premachi Goshta Serial Updates : सावनीने सागरच्या (Sagar Koli Premachi Goshta) मनात मुक्ताबद्दल (Mukta Koli Premachi Goshta) संशयाचे भूत निर्माण केले आहे. तर, दुसरीकडे यापासून मुक्ता अनभिज्ञ आहे. नणंद स्वातीची मदत करण्यासाठी धडपड करत असलेली मुक्ता मात्र सागरपासून दुरावतेय का अशी स्थिती 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) मालिकेत निर्माण झाली आहे.
सागरला घरी आल्यानंतर आपला मुलगा आदित्यचे बोलणे आठवते. आदित्यला आता पासपोर्टवर सागरऐवजी हर्षवर्धनचे नाव हवे असल्याचे सांगतो. सागरच्या मनात हाच विचार घोळत असताना दुसरीकडे घरी सई लवकर येते. सागर तिला प्रेमाने जवळ घेतो. त्यानंतर सई आता पप्पा मला तू आता आवडू लागला असल्याचे सांगते. आनंदी झालेला सागर आणि सई दोघेही मुक्ताला सरप्राईज देण्यासाठी तिच्या क्लिनिकवर जातात. मात्र, ती क्लिनिकवर नसते. आधीच सावनीने डोक्यात संशयाचे भूत निर्माण केल्याने सागरच्या मनात मुक्ताबद्दल संशय निर्माण होतो.
क्लिनिकमधून मुक्ता गेली कुठे?
क्लिनिकमधून मुक्ता तिची नणंद स्वातीकडे गेली असते. मुक्ताने स्वाती आणि तिच्या नवऱ्यासाठी इंद्राने बनवलेले जेवण देते. घरचे जेवण जेऊन दोघेही समाधानी होतात. मुक्ता स्वातीला आईसोबत म्हणजे इंद्रासोबत बोलण्याचा सल्ला देते. स्वातीचा फोन आल्याने आनंदी झालेली इंद्रा लेकीसोबत बोलते. पण, त्याच वेळी ती मुक्ताबद्दल तक्रार करते.
स्वातीच्या संसारातील वादळ शमण्याची चिन्ह दिसत नाहीत. पंधरा लाखांची मागणी केलेली असते. मुक्ता स्वाती आणि तिच्या नवऱ्याला पंधरा लाखांची व्यवस्था करण्याचे वचन देते. स्वातीच्या संसारासाठी धडपडणाऱ्या मुक्ताला आपल्या संसारात काय वादळ येणार याची पुसटशी कल्पनादेखील नाही.
मुक्ता लपवत असलेले सत्य समोर येणार?
मुक्ता घरी आल्यानंतर सई तिला कुठं गेली होतीस असे सांगते. त्यावर सई मुक्ताला मी आणि पप्पा क्लिनिकला आलो होतो. तू क्लिनिकमध्ये नव्हतीस असे सांगते. त्यावेळी मुक्ताचा चेहरा चिंताक्रांत होतो. मुक्ताच्या उत्तरावर सागरदेखील मुक्ताला तिच्या उशिरा येण्याबद्दल विचारतो. मुक्तालादेखील सागरसोबत बरेच काही शेअर करायचे असते. पण, ती सागरला सगळं काही सांगणार का, सागरच्या मनात मुक्ताबद्दलचा संशय वाढणार की सत्य माहिती पडेल, अशी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.