Premachi Goshta Serial Update : मुक्ताने सावनीच्या कानाखाली लगावली, गुंगीत असलेल्या सागरला वाचवले
Premachi Goshta Serial Update : सावनीच्या कृत्याने चिडून मुक्ता तिच्या कानशिलात लगावणार आहे. संसार उद्धवस्त करण्याचा सावनीचा डाव मुक्ता उधळून लावणार आहे.
Premachi Goshta Serial Update : 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) मालिकेत आज मोठी नाट्यमय घडामोड घडणार आहे. आजच्या एपिसोडमध्ये मुक्ता गुंगीत असलेल्या सागरला वाचवणार आहे. तर, सावनीच्या कृत्याने चिडून मुक्ता तिच्या कानशिलात लगावणार आहे. संसार उद्धवस्त करण्याचा सावनीचा डाव मुक्ता उधळून लावणार आहे.
हर्षवर्धनला वैतागून मुक्ता होणार राजी...
हर्षवर्धन हा मुक्ताचे कान भरत असतो. सागरला सावनीला प्रोटेक्ट का करत आहे, असे हर्षवर्धन म्हणतो. त्यावर कोणापासून प्रोटेक्ट करतोय हे व्यवस्थित सांगा असे मुक्ता हर्षवर्धनला विचारते. त्यावर हर्षवर्धन हा तुमच्या आईचा अपघात हा एका महिलेने केला आहे. त्यावर मुक्ताच्या तोंडून सावनीचे नाव येते. त्यावर हर्षवर्धन त्याला होकार दर्शवतो. सगळे पुरावे तुमच्यासमोर आहेत, पण तुम्हाला कधी दिसलेच नाही असे हर्षवर्धन सांगतो. तुम्हाला विश्वास वाटत नसेल तर माझ्या घरी चला असे हर्षवर्धन सांगतो. हर्षवर्धनकडून सतत तगादा सुरू असतो. त्यामुळे शेवटी मुक्ता वैतागून हर्षवर्धनसोबत त्याच्या घरी जाण्यास तयार होते. तुम्ही कसे चुकीचे आहात हे पाहण्यासाठी मी तुमच्यासोबत येते असे मुक्ता म्हणते. मुक्ता गाडी चालवत असताना तिला सागरने दिलेले वचन आठवतं. कोणत्याही परिस्थितीत विश्वास मोडणार नाही असं सागरने मुक्ताला वचन दिलेले असते.
गुंगीत सागरची अवस्था बिकट, सावनीचा डाव साधण्याचा प्रयत्न
इकडे सावनीने दिलेल्या गुंगीचे औषध असलेल्या ज्यूसमुळे सागरची तब्येत बिघडू लागली असते. त्याला चक्कर येत असते. तो बेशुद्धावस्थेत जात असतो. बेशुद्धावस्थेत जात असताना सावनी सागरला जुन्या नात्याची आठवण करून देत असते. सागरला ती आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत असते.
मुक्ता उधळणार सावनीचा डाव, कानशिलात लगावणार
मुक्ता हर्षवर्धनच्या घरी येते. दरवाजा उघडा असल्याने मुक्ता थेट घरात शिरते. त्याच वेळी सावनी सागरशी लगट करत असल्याचे दिसून येते. सागरही गुंगीत असल्याचे दिसते. सावनीचे कारनामे पाहून मुक्ता चिडते. हर्षवर्धन आणि सावनी मुक्ताला सागर कसा चुकीचा आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतात.
चिडलेली मुक्ता सावनीच्या कानाखाली लगावते. मुक्ता सावनीला खूप सुनावते. स्वत:च्या फायद्यासाठी आपले मुल, नाती वापरते. प्रेम हा शब्द तुझ्या तोंडात शोभत नसल्याचे मुक्ता सांगते. मुक्ता म्हणते की मी इतकी मूर्ख नाही... समोर रिकामी ग्लास पाहून माझ्या लक्षात आलेल की तुम्ही या ग्लासात काहीतरी मिसळले आहे.त्या माणसाने तुझ्यावर खूप प्रेम केलं पण तू कधीच त्यांच मन जगू शकली नाहीस. नात्यांचा खेळ करून तू त्यांचे आयुष्य उद्धवस्त करण्यास निघाली आहे. तुम्ही दिवसेंदिवस खालची पातळी गाठत असल्याचे मुक्ता सावनी सांगते. हर्षवर्धनला माझे कान भरायला पाठवशील मग मी इथे येईन आणि माझा सागरवरचा विश्वास उडेल. तुमचा हा डाव न कळण्या इतपत मी मूर्ख नसल्याचे मुक्ता सावनीला सुनावते. गुंगीत असलेल्या सागरला मुक्ता घरी नेण्याचा प्रयत्न करते. गुंगीतील अवस्थेत सागर मुक्ताला मी तुमच्यापासून काही गोष्टी लपवल्याचे सांगत असतो. पण, मुक्ता आपण घरी जाऊन बोलुयात असे सांगते.