(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Premachi Goshta Serial Update : अपघात करणाऱ्या कारला पाहणार माधवी, आता समोर येईल का दोषीचे नाव?
Premachi Goshta Serial Update : अपघाताला कारणीभूत असलेल्या कारला माधवी पाहते. आता दोषी समोर येईल का? अपघाताचे सत्य समोर येईल का, आदित्यचे काय होणार?
Premachi Goshta Serial Update : 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) मालिकेत सध्या सुरू असलेल्या कथानक काहीसा वेग पकडत असल्याचे दिसते. कार्तिक हा सागरने केलेल्या अपमानाचा सूड उगवणार असल्याचे मनात ठरवतो. तर, दुसरीकडे आपल्या अपघाताला कारणीभूत असलेल्या कारला माधवी पाहते. आता दोषी समोर येईल का? अपघाताचे सत्य समोर येईल का, आदित्यचे काय होणार? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना मिळणार आहे.
सावनी आणि सागर बोलत असताना मुक्ता तिथे येते. मुक्ताला पाहून सागर आणि सावनी सत्य समोर आल्याने घाबरतात. पण, मुक्ता मी तुमचं काही ऐकले नसल्याचे सांगते. बापूंनी तुम्हाला बोलावले असल्याचे मुक्ता सांगते.
माधवीला भेटायला जाणार आदित्य...
सई आदित्यला घेऊन माधवीकडे येते. आपल्यामुळे अपघात झाला आणि त्यामुळे माधवी या गंभीर जखमी झाल्यामुळे आदित्यच्या मनात अपराधीपणाची भावना असते. माधवी आदित्यची आपुलकीने चौकशी करते. पण, आदित्य तिथून निघून जातो.
अपघात करणाऱ्या कारला माधवी ओळख पटवणार...
माधवी आणि पुरू बारशासाठी मुक्ताच्या घरी जातात. पण, कार्तिकला पाहून माधवी चिडते. हा माणूस इथे आहे तर मी इथे थांबणार नसल्याचे माधवी सांगते आणि तडकाफडकी निघून जाते. पुरु तिची समजूत घालतो आणि मोकळ्या हवेत जाऊयात म्हणून माधवीला बिल्डिंगखाली घेऊन जातो.
बिल्डिंग खाली आल्यानंतर माधवी आणि पुरु बोलत असतात. त्याच वेळी माधवी अपघात करणाऱ्या कारला पाहते आणि ही तीच कार असल्याचे पुरूला सांगते. कार निघून जाते. ही बाब ते मुक्ताला सांगतात. घरातले सगळेजण ती कार कोणाच्या घरी आली याची चौकशी करण्यासाठी वॉचमनकडे जातात. पण, ती कार कोणाची होती याची माहिती समजत नाही. त्याशिवाय, सीसीटीव्ही खराब झाले असल्याचे वॉचमन सांगतो. ती कार कोणाची आहे, याची माहिती घेण्यासाठी बापू आणि पुरू हालचाल करतात. सागर सावनीला फोन करून कार्तिकला कोणती कार दिली, हे विचारतो. सावनी त्यावर आपल्याला काही कल्पना नसल्याचे सांगते. सागर आणि सावनीमध्ये वाद सुरू असतात. इकडं हे सगळं सुरू असताना दुसरीकडे आदित्य दूर राहून काय सुरू आहे हे पाहतो. तेवढ्यात मुक्ता येते आणि सागरला त्या दोषीला शोधून शिक्षा करुयात हे सांगते.
सागरवर सूड उगवणार कार्तिक
इकडं बारसं संपल्यानंतर सागर कार्तिकला घराबाहेर काढतो. सागर त्याला संतापून घरातून निघून जाण्यास सांगतो. त्यावर कार्तिक निघून जातो. पण, सागरने अपमान करून घरातून बाहेर काढलं. आता कार्तिकशी पंगा घेतला आहे, मला दिलेल्या त्रासाची परतफेड करणार असल्याचे कार्तिक मनात ठरवतो. मुक्ताच्या विनंतीवरून आदित्यला कोळी कुटुंबाकडेच ठेवून सावनी घरी निघून जाते.