(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Premachi Goshta Serial Update : कार्तिकला आमंत्रण देऊन इंद्रा घेणार विषाची परीक्षा? सईसाठी मुक्ता सावनीला सुनावणार
Premachi Goshta Serial Update : इंद्रा कार्तिकला बारशाचे आमंत्रण देते. आता कार्तिकला पाहून सागरची प्रतिक्रिया काय असेल? बारशावरून कोळी कुटुंबात नवा वाद निर्माण होईल का हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
Premachi Goshta Serial Update : 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) मालिकेत कोळी कुटुंबात सध्या स्वातीच्या मुलीच्या बारशाची तयारी सुरू आहे. मुलीच्या बारशासाठी तिचे वडील कार्तिक आले पाहिजे असे स्वाती इंद्राला सांगते.त्यानंतर इंद्रा कार्तिकला आमंत्रण देते. आता कार्तिकला पाहून सागरची प्रतिक्रिया काय असेल? बारशावरून कोळी कुटुंबात नवा वाद निर्माण होईल का हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
स्वातीच्या मुलीच्या बारशाची उत्साहाने तयारी सुरू होते. पण सईच्या एका निरागस प्रश्नाने घरातील वातावरण बदलते. स्वाती त्यावरून रडते आणि बारशाला बाळाचे वडील येऊ शकत नाही, ना सासरचे मंडळी येऊ शकत असे स्वाती म्हणते. त्यावर बापू धीर देत तिला म्हणतात की काळजी नको करुस आम्ही सगळी जबाबदारी घेतो.
स्वाती रडणार, इंद्रा कार्तिकला बोलवणार
इंद्रा स्वातीच्या खोलीत जाते तेव्हा ती रडत असते. हे पाहून इंद्राला वेदना होतात. त्यावर स्वाती माझ्या मुलीच्या बारशाला कार्तिक हवाच, माझ्या मुलीचे वडील बारशाला हवाच. माझ्यासाठी माझं घरंच परकं झाले असल्याचे सांगत मी माझ्या बाळाला घेऊन जात होते पण तू मला जबरदस्ती इथे थांबवून घेत आहेस असे सांगते. स्वातीचे हे टोकदार बोलणं ऐकून इंद्राला वाईट वाटते. स्वातीला धीर देत आपल्या हातात काहीच नाही असे इंद्रा स्वातीला सांगते. तुझे बापू आणि भाई दोघेही त्या मुक्ताच्या तालावर नाचतात. लकी आणि कोमल दिवसभर घराबाहेर असतात. तू पण गेलीस तर माझं कसं होईल असे इंद्रा विचारते. बाळाच्या बारशाला कार्तिक येणारच असे इंद्रा सांगते.
इंद्रा कार्तिकला बारशासाठी बोलावते. बाळाचे बारसं असून तुम्ही यायला हवे असे इंद्रा सांगते. त्यावर कार्तिक ज्या घरात माझ्यावर एवढे घाणेरडे आरोप झालेत त्या घरात मी येणार नाही असे सांगतो. मला स्वाती आणि बाळाची आठवण येते. पण, त्यांना भेटणं माझ्या नशिबात नाही असे सांगतो. त्यावर इंद्रा कार्तिकला मी तुमची माफी मागते असे म्हणते. कार्तिकही तुम्ही माफी मागायची गरज नाही असे म्हणतो. यावर इंद्रा, तुमच्या बाळाचं बारसं आहे. हे सोनेरी क्षण परत येत नाही. तुम्ही दोघांनी पूजेला बसले पाहिजे असे म्हणते. त्यावर मी बारशाला येणार असे कार्तिक सांगतो.
माधवीसमोर सागर रडणार
सासू माधवीच्या प्रकृतीकडे पाहून सागरला रडू कोसळते. त्यावर माधवी सागरला काय झाले,असे विचारते. त्यावर सागर तुम्ही एवढी नेहमी धावपळ करत असता. मात्र, असे पाहून मला वाईट वाटत असल्याचे सागर सांगतो. माधवी सागरला धीर देत माझ्या प्रकृतीत सुधारणा असल्याचे सांगते. सागर आणि माधवीमध्ये मुक्ता किती आणि कशी काळजी घेते यावर बोलणं होतं. दोघांमध्ये बोलणं सुरू असताना दुसरीकडे मुक्ता येते आणि दोघांचे काही प्रमाणात बोलणं ऐकते. माधवी मोठ्याने हसते त्यावर मुक्ता माधवीला एवढ्या मोठ्याने हसू नको असे सांगते. मी दोघांचे बोलणं ऐकले असल्याचे मुक्ता सांगते.
सई माझीच मुलगी, मुक्ताने सावनीला ठणकावले
मुक्ता आणि सई शाळेतून येत असताना समोर आदित्य आणि सावनी येतात. आदित्यला पाहून सई त्याला स्वातीच्या बाळाच्या बारशाचा आमंत्रण देते. आदित्य लगेचच सावनीला म्हणतो की बारशाला जायचं तर आपल्याला गिफ्ट घ्यावे लागेल. पण, सई त्याला तू गिफ्ट नाही आणलं तरी चालेल पण तू यायला हवं असे सांगते. त्यानंतर सई आणि आदित्य बाजूला जाऊन गप्पा मारतात. तर, इकडं सावनी मुक्ताला डिवचते. सावनी आदित्य आणि सई ही माझी मुलं असल्याचे सांगते. त्यावर मुक्ता सई ही माझी मुलगी आहे. नशिबाने आम्हाला एकत्र आणलं आहे. तू आमचं नशीब आणि नातं हिरावून नेऊ शकत नाही असे मुक्ता सावनीला सुनावते.