Premachi Goshta Latest Episode : मुक्ताची समजूत काढण्यासाठी सागरचा आटापिटा, पण कार्तिकची वहिनीवर वाईट नजर!
Premachi Goshta Latest Episode : ज्या मुक्ताने संसार वाचवला, संकटातून बाहेर काढले तिच्यावर कार्तिकची वाईट नजर पडली आहे. तर, सागरला उद्धवस्त करण्यासाठी सावनीने आता नवा डाव टाकण्यासाठी प्लान आखण्यास सुरुवात केली आहे.
Premachi Goshta Latest Episode : 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) मालिकेत आता आणखी ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. नाराज झालेल्या मुक्ताची समजूत काढण्यासाठी सागरचा आटापिटा सुरू आहे. तर, दुसरीकडे ज्या मुक्ताने संसार वाचवला, संकटातून बाहेर काढले तिच्यावर कार्तिकची वाईट नजर पडली आहे. तर, सागरला उद्धवस्त करण्यासाठी सावनीने आता नवा डाव टाकण्यासाठी प्लान आखण्यास सुरुवात केली आहे.
मारहाणीत सागर जखमी, इंद्राने मुक्ताला दिला दोष
सागरला झालेली दुखापत पाहून मुक्ताचे मन द्विधा मनस्थितीत सापडते. सागरला झालेल्या दुखापतीवर इंद्रा मुक्ताला दोष देते. तुझ्यामुळेच सागरने दारू प्यायली आणि त्याला दुखापत झाली असल्याचे इंद्रा म्हणते. तू सागरसोबत भांडल्याने तो नाराज झाला आणि दारू प्यायला असल्याचे इंद्रा सांगते. सागरचे वडील इंद्राची समजूत काढतात आणि मुक्ताला धीर देतात.
सागर मागतोय मुक्ताची माफी
सागर मुक्ताची माफी मागतो. तुम्हाला दुखावल्याने देवाने मला शिक्षा दिली असल्याचे सागर मुक्ताला सांगतो. माझ्यासोबत बोला, चिडा, ओरडा पण तुमची शांतता मला सहन होत नाही असे सागर सांगतो. मुक्ता त्यावर काहीही बोलत नाही. मुक्ताने बॅग भरली असल्याचे पाहून सागरला वाईट वाटते. सागरची अवस्था पाहून मुक्ताला वाईट वाटत असते. सागरला कपडे चेंज करण्यास ती मदत करते पण त्याच्यासोबत काहीही बोलत नाही. जखमी असलेल्या सागरची मुक्ता देखभाल करते.
सकाळी नाश्ताच्या टेबलवर सगळेजण सागरच्या प्रकृतीची विचारपूस करतात. स्वाती आणि तिचा नवरा कार्तिक देखील सागरची विचारपूस करतात. आपण चूक केली की त्रास होणारच असे सागर म्हणतो.
मुक्तावर कार्तिक वाईट नजर
स्वातीचा नवरा कार्तिक मुक्ताच्या हातावर हात ठेवून तुम्हाला काही होणार नाही असे सांगतो. मात्र, मुक्ताला वेगळे संकेत मिळतात. कार्तिक जाणीवपूर्वक मुक्ताला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. कार्तिकच्या मनात वाईट भावना असल्याचे मुक्ताच्या लक्षात येते.
सावनी कोणता डाव टाकणार?
हर्षवर्धन सावनीवर नाराज असतो. सावनी-आदित्यने त्याचा कट पूर्णत्वास न नेल्याने हर्षवर्धन नाराज असतो. आदित्यने पेपर फाडल्याने सावनी हर्षवर्धनची माफी मागते. सागरला मी कायमचे उद्वस्त करणार असून सागरला आता जेलवारी घडवणार असल्याचे सावनी सांगते.
मुक्ताकडे सागरची विनवणी
जेवताना सागर मुक्ताला एक संधी देण्याबाबत विनवणी करतो. आपण मैत्रीपासून पुन्हा नव्याने सुरुवात करुयात, असे मुक्ताला सांगतो. पण, मुक्ता सागरला एवढी नाटकं का करताय असे सांगते. एक चूक माफ करा असे मुक्ताला सागर म्हणतो. मी तुमची पत्नी जगतेय हीच माझ्यासाठी शिक्षा आहे, मुक्ता सागरला म्हणते.